✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आरं आरं आबा आता वर्डप्रेस डॉट कॉमवर

ब
बाबुराव यांनी
Mon, 07/12/2010 - 20:19  ·  लेख
लेख
सामान्य जनतेपर्यंत पोचायचा मार्ग महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी निवडला हाये. जनतेशी संवाद साधता यावा म्हून त्यायनी आबा पाटील्स ब्लॉग या नावाने ते वर्डप्रेस डॉट कॉमवर हजर झाले हायेत. ही एक चांगली सुरुवात झाली हाय असे वाट्टे. आबा म्हणत्यात ''जनतेपर्यंत पोचण्याचा सोपा आणि कोणतेही हितसंबंध नसलेला, आणि गटबाजीला वाव नसलेला मार्ग म्हणून मी हे आधुनिक तंत्रज्ञान आता निवडले आहे. याच भावनेतून आज हा ब्लॉग मी तुमच्यासमोर आणतो आहे.'' मिपाकरांना आबाच्या नव्या धोरणाबद्दल काय वाट्टे ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2720 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

क माहाती

शानबा५१२
Mon, 07/12/2010 - 20:24 नवीन
क माहाती नही पण विश्वास नाही बसत की हे ते पाटील आहेत! त्यांच्याकडून अशी साइट व तीही वर्डप्रेसवर??????
माझ्या कार्यालयाचा पत्ता : गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय , पहिला मजला , रूम नंबर - १०८, विस्तारित इमारत , मंत्रालय - मुंबई – ३२. माझ्या कार्यालयाचे दूरध्वनी: ०२२ - २२०२७१७४ माझ्या घराचा पत्ता: ’चित्रकुट’, रतिलाल ठक्कर मार्ग , मलबार हिल, मुंबई. माझ्या घराचे दूरध्वनी: ०२२ – २३६३१५०५ पण हे वाचल्यावर विश्वास व्हायला सुरवात होतेय.
_________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments

वर्डप्रेस

बाबुराव
Mon, 07/12/2010 - 20:27 नवीन
वर्डप्रेसडॉट कॉम म्हणल्यावर माहाबी इस्वास नै बसला. पण वरच्या पत्यामुळंच इस्वास बसला. त्यायला मिपाचं आमंत्रण द्यायला पाह्यजेन काय म्हणता ? बाबुराव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

मी

शिल्पा ब
Mon, 07/12/2010 - 20:32 नवीन
मी लोकसत्तात का इसकाळ कुठेतरी वाचलं होतं कि त्यांनी ब्लॉग सुरु केलाय म्हणून...ठीक आहे. यामुळे काय समस्या सुटणार आहेत का? चालायचच. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

शरद

अविनाशकुलकर्णी
Mon, 07/12/2010 - 21:09 नवीन
शरद रावांना पाटिल साहेब व यशवंतरावा समवेत दाखवुन आबा काय सुचवु पहातात?
  • Log in or register to post comments

महत्त्वाच

आळश्यांचा राजा
Mon, 07/12/2010 - 21:54 नवीन
महत्त्वाची गोष्ट आहे. कदाचित ते स्वतः ब्लॉग लिहित वाचत नसतीलही. पण एखादा सहायक ठेवला असेल. लोकांचा फीडबॅक त्यांना थेट मिळू शकतो. दुसर्‍या कुठल्याही माध्यमात हे शक्य नाही. येत्या काही वर्षांमध्ये ब्लॉगिंग हे केवळ शहरी भागात मर्यादित राहील असे वाटत नाही. इंटरनेट हे मोबाइल फोनसारखे स्वस्त आणि सर्वव्यापी व्हायला फार काळ वाट बघायची गरज नाही. या परिस्थितीत हे पाउल उचलणारा हा महाराष्ट्रातला पहिलाच मंत्री. त्यांचे अभिनंदन आणि ब्लॉगविश्वात स्वागत! लोकांच्या प्रतिसादांवर ते काय ऍक्शन घेतात यावरुन अर्थातच त्यांची सिन्सीरिटी दिसून येईल. तोपर्यंत अभिनंदन करायला कुणाचीच हरकत नसावी! आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

+१

महेश हतोळकर
Tue, 07/13/2010 - 16:54 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

+२

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/13/2010 - 17:52 नवीन
राजेसाहेबांचा उत्तम प्रतिसाद. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

बडे

चिरोटा
Mon, 07/12/2010 - 22:44 नवीन
मराठी नेते जागे होता आहेत म्हणायचे.राज्य सरकारने स्वतःची ब्लॉग साइट बनवून मंत्र्यांनी त्यावर ब्लॉग बनवले असते तर काही अर्थ होता.आता ट्विटरवर एक उघडा खाते.आणि तंबाखूचा बार भरला की ट्वीट करा सगळ्याना. P = NP
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा