शाही कुल्फी

गणपा's picture
गणपा in पाककृती
8 Jul 2010 - 5:55 pm

लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत गावालाच मुक्काम असायचा. दुपारी उकाड्याने जिवाची नुसती काहीली काहीली व्हायची (फ्रिज वगैरे लाड तेव्हा गावाला नव्हते) आणि तेव्हा तो देवदुता सारखा यायचा. मगन आईस्फ्रुटवाला. त्याच्या कडे १० पैश्यांपासुन ते १ रुपया पर्यंतची वेगवेगळी आईस्पृटं/ कुल्फ्या असायच्या. लांबुनच त्याच्या सायकलची घंटी (देवळात असते ना तशी घंटा) कानी आली की आम्ही धुम घरात पळायचो. आजीच्या मागे कटकट करुन शेवटी २०-२५ पैसे पदरात पाडुन घ्यायचो. पण तो वर तो पठ्या पुढे निगुन हेलेला असायचा. मग माकडा सारख्या उड्या मारत आम्ही त्याच्या मागावर जात असु. पण एवढ्या कडक उन्हात फक्त एक कुल्फि खाउन कुणाच भागतय. उगाच रसना चाळवायची आपली झालं. परत आजी कडे जायची सोय नसायची. मग मोर्चा मामाच्या घरी (आजोळपण त्याच गावात आहे.) मग आईच्या आईला मस्का मारायचो ;). दुधापेक्षा दुधावरची साय प्रिय असल्याने आजी जास्त आढेवेढे न करता पैसे द्यायची. मग आमची स्वारी थेट मगनभाईच्या पुढ्यात. तो मस्त पैकी पळसाच्या पानावर कुल्फीचे तुकडे कापुन द्यायचा. आहा हा हा काय सुख असायच ते काय सांगु?
बालपण सरलं. जस जसे मोठे होत गेलो तस तसं त्या आईस्फ्रुटाची जागा पेप्सीकोलाने घेतली. कुल्फी मात्र अजुन तग धरुन होती. पुढे पुढे मगनभाईपन यायचा बंद झाला, दुसरा कोणी तरी यायचा पण मगनभाईच्या कुल्फीची सर त्याला नव्हती.

हल्ली बाजारात तर रेडिमेड कुल्फी मिळते, कुल्फी मिक्स् पण मिळते.

तर मग काय करायची का आज कुल्फी ;)
एकदम सोप्पी आणि झटपट कृती आहे. प्रयत्न करुन पहा.

साहित्यः


१५० ग्रॅम कंडेंस मिल्क.
१५० ग्रॅम क्रिम.
१२० ग्रॅम दुधाची भुकटी (मिल्क पावडर).
५० ग्रॅम साखर.
सुका मेवा (काजु बदाम पिस्ता मनुका)
केशर.

कृती:

सुक्या मेव्याचे बारीक तुकडे करुन घ्यावे.
साखर आणि केशर मिक्सर मध्ये वाटुन घ्यावे.


एका मोठ्या भांड्यात कंडेंस मिल्क+ भुकटी + क्रिम + साखर एकत्र करुन चमच्याने फेटुन घ्यावे.


मग त्यात सुका मेवा टाकावा. आणि परत एकदा फेटावं.


तयार मिश्रण लहान कप मध्ये ओतुन वरुन अ‍ॅल्युमिनियमच्या कादगाने बंद करावं.
आणि मग ते कप फ्रिजर मध्ये किमान ४ तास थंड करत ठेवावं.

सर्व्ह करताना वरुन परत थोडासा सुका मेवा टाकावा.

काय मग? करतायना आज :)

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

8 Jul 2010 - 5:58 pm | स्वाती दिनेश

कुल्फी सह्ही दिसतेय!!!
स्वाती

खादाड's picture

8 Jul 2010 - 6:03 pm | खादाड

मस्तच!

प्रियाली's picture

8 Jul 2010 - 6:06 pm | प्रियाली

मस्तच! डोळ्यांची पारणे फिटली.

स्वप्निल..'s picture

8 Jul 2010 - 6:13 pm | स्वप्निल..

करायला सोपी आहे .. मस्त :)

प्रभो's picture

8 Jul 2010 - 6:16 pm | प्रभो

वॉव!!!

सहज's picture

8 Jul 2010 - 6:17 pm | सहज

गणपा तेंडूलकरसाहेबांचा विजय असो!!

अप्रतिम !

टारझन's picture

8 Jul 2010 - 6:20 pm | टारझन

एक टिपाड भरुन पाठवुन द्या !!

- (गुल्फी प्रेमी) टारझन

केशवसुमार's picture

8 Jul 2010 - 6:25 pm | केशवसुमार

**चा *..
(अर्वाच्य)केशवसुमार
अरे मेल्या किती छळशील..
कोण आहे रे तिकडे.. ह्या गणपाच्या पाकृ. वर बंदी आणा बघू ताबडतोप..
(अगतिक)केशवसुमार
इथे ब्राझील मध्ये कुल्फीच्या नावाखाली गोठवलेले दही खाऊन वैतागलोय आणि त्यात हा ***** असले धागे काढतो आहे..
(ब्राझीलीयन कुल्फी ने त्रस्त)केशवसुमार

टारझन's picture

8 Jul 2010 - 6:40 pm | टारझन

ओ केश्याबा, अजून तूम्ही प्रतिसादक आहात वाटतं?! :)

बाकी तुमचा मी संस्थळ बंधू म्हणून उगाचंच प्रतिसाद वाचला होता म्हणा! ;)

पण तुम्हाला काही झडझडून प्रतिसाद देताना मी कधीच पाहिलं नाही! :)

त्या टार्‍या-पर्‍याकडून शिका काहितरी.. त्यांची गद्यांवरची, पद्यांवरची काय प्रतिसादवलं जावं/जावू नये या संबंधीची तळमळ मला वेळोवेळी जाणवली होती..

असो,

प्रतिसाद बाकी मस्तच हो ! :)

नीलकांता, या केश्यांना वाचनमात्र कर रे !!

:) मी टार्‍या भुमकर
संस्थळपिडीया- गद्यपद्य
प्रतिसादचमुचा सदस्य आहे.

केशवसुमार's picture

8 Jul 2010 - 6:48 pm | केशवसुमार

दिवा विजण्यापुर्वी जास्त जोमाने तेवतो असे कुठे तरी वाचल्याचे आठवले...
(स्मरणशील)केशवसुमार

टारझन's picture

8 Jul 2010 - 6:59 pm | टारझन

मला आमच्या गावाकडचा मोत्या आठवला =)) तो बैलगाडीच्या खालुन दोन बैलांमधुन ऐटिने चाले , बैलगाडी पाहिली की लोकं बाजुला सरकत , आणि मोत्याला वाटे आपल्याला पाहुनंच लोकं बाजुला सरत आहेत =)) =)) =))

(ठिकाणासकट गोष्टी आठवणारा) इडलीसांबार

केशवसुमार's picture

8 Jul 2010 - 7:22 pm | केशवसुमार

टाळण्यासाठी खरड केली आहे..
(योग्यवेळी नियमावली आठवणारा)केशवसुमार
पुढील चर्चा तिकडे करू.
(सुचक )केशवसुमार

संदीप चित्रे's picture

8 Jul 2010 - 6:27 pm | संदीप चित्रे

तुझ्या सगळ्या रेसिपीजना हा एकच शब्द पर्फेक्टतो !

चतुरंग's picture

8 Jul 2010 - 6:37 pm | चतुरंग

ए मलैऽऽऽ कुल्फिऽऽऽए.............
गारेग्गार!!
(खुद के साथ बातां : रंगा, पुढल्यावेळी भारतवारीला जाताना एअर नायजेरिआ पक्की! ;) )

चतुरंग

मीनल's picture

8 Jul 2010 - 6:41 pm | मीनल

:P What a presentation!!!!
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

jaypal's picture

8 Jul 2010 - 6:55 pm | jaypal

आज आत्माराम थंडावला
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

रेवती's picture

8 Jul 2010 - 6:57 pm | रेवती

सोप्पी आणि मस्त पाकृ!
अनेक प्रश्न: साखर घेताना पिठीसाखरच घेतली तर?
कि मिक्सरम्ध्ये त्यात केशर बारिक होण्यासाठी म्हणून जाड साखर उपयोगी आहे?
रेवती

गणपा's picture

8 Jul 2010 - 7:07 pm | गणपा

>>कि मिक्सरम्ध्ये त्यात केशर बारिक होण्यासाठी म्हणून जाड साखर उपयोगी आहे?
बरोबर :)

पिठी साखर घेतली तरी चालेलं पण मग केशर नीट वाटता येणार नाही.
साखरे बरोबर वाटलेला केशर छान सुगंध देतो. नुसत्या काड्यांनी तेवढा परिणाम होत नाही.

रेवती's picture

8 Jul 2010 - 7:21 pm | रेवती

धन्यवाद गणपा!

रेवती

किट्टु's picture

8 Jul 2010 - 7:08 pm | किट्टु

यम्मी..... करायला एकदम सोपी आहे ..... :)

ललिता's picture

8 Jul 2010 - 7:14 pm | ललिता

खरंच एकदम सोपी रेसिपी.
फक्त एकच प्रश्न: कंडेन्स्ड मिल्क साखरेचं की बिन साखरेचं घ्यायचं? ५० ग्रॅम साखर सांगितली आहे, कितपत गोडी येईल अंदाज येत नाहीये...

गणपा's picture

8 Jul 2010 - 7:20 pm | गणपा

>>कंडेन्स्ड मिल्क साखरेचं की बिन साखरेचं घ्यायचं?
साखरेच घेतल आहे.
(बीन साखरेच असतं हे आत्ताच तुमच्या प्रतिसादामुळे कळल)

भाऊ पाटील's picture

8 Jul 2010 - 7:37 pm | भाऊ पाटील

_/\_गण्पाभौ .

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jul 2010 - 7:24 pm | परिकथेतील राजकुमार

गणपा अरे........

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

रेवती's picture

8 Jul 2010 - 7:26 pm | रेवती

खीखीखी!

रेवती

सहज's picture

8 Jul 2010 - 7:28 pm | सहज

पराचे काय, फार तर रस्ता क्रॉस केला की शांत होईल. आम्ही म्हणले पाहीजे. नशीब सध्या आईसक्रीमचा स्टॉक आहे. नाहीतर इनो शोधायला लागले असते.

केशवसुमार's picture

8 Jul 2010 - 7:34 pm | केशवसुमार

पराचे काय, फार तर रस्ता क्रॉस केला की शांत होईल...
आणि तुमचे ही बरे आहे .. सध्या आईसक्रीमचा स्टॉक आहे..
इथेदह्याचे आईसक्रीम बनवतात हो..******* :''( ~X(

सहज's picture

8 Jul 2010 - 7:39 pm | सहज

दह्याचे आईसक्रिम असे कोणी म्हणतो नाही हो. फ्रोजन योगर्ट असेच म्हणतात.

फारतर जेलाटो (इटालियन आइस्क्रिम) मधे दही फ्लेव्हर असेल.

इतर फ्लेव्हर मिळत नसतील हे पटत नाही. फार दूर एका खेड्यात आहात की काय?

केशवसुमार's picture

8 Jul 2010 - 7:58 pm | केशवसुमार

रिओ च्या मध्यवर्ती भागात राहतो..
ब्राझील मधील सर्वात मोठ्ठी आईसक्रीम चेन
बाकी फेल्वर मिळतात.. पण ते ऐकूनच खाण्याची हिंमत होत नाही.. चहा,पेरू, काजू फळ,नारळ, लिंबू, डाळींब, किवी फळ.. त्यातल्यात्यात अंबा (तोतापुरी चव) संत्र, कॉफी आणि आम्हाला न आवडणारे चॉकलेट हेच जरा बरे.. असो.. आलिया भोगासी..

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jul 2010 - 7:39 pm | परिकथेतील राजकुमार

फार तर रस्ता क्रॉस केला की शांत होईल

ओ सहजकाका मी रस्ता क्रॉस करुन 'तिकडे' जात नाही हो. मी मुळातच शांत प्रवृत्तीचा आहे.

ह्या गणपाला 'मस्तानीची' पा़कॄ पण टाकायला सांगावे काय ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

नेहमी आनंदी's picture

8 Jul 2010 - 7:37 pm | नेहमी आनंदी

सही.....

आशिष सुर्वे's picture

8 Jul 2010 - 8:34 pm | आशिष सुर्वे

ही कुल्फी पाहून डोळ्यांना आणि मनाला थंडावा मिळाला रे..

आणि 'पीक' चे डब्बे पाहून 'तिथले' दिवस आठवले..
बाकी काय म्हणतेय 'इलिपेजू' अन् 'इकेजा'?

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

Nile's picture

8 Jul 2010 - 8:39 pm | Nile

मस्त! मागल्या विकांताला आमी बी कुल्फी केल ई व्हती.
-वाळवंटवासी

बाकी कुल्फीत ऑक्टोप्स नाही!! ;)

-Nile

विसोबा खेचर's picture

8 Jul 2010 - 9:22 pm | विसोबा खेचर

नेहमीच अश्या जिवघेण्या पाककृती टाकून जळवल्यामुळे गणप्या, तू एक दिवस जाम मार खाणारेस माझ्या हातचा! :)

टारझन's picture

8 Jul 2010 - 9:37 pm | टारझन

तू एक दिवस जाम मार खाणारेस माझ्या हातचा!

त्याला खाऊ घाला , पण इकडे पाकृ टाकायला विसरु णका बरं :)

अविनाशकुलकर्णी's picture

8 Jul 2010 - 10:19 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त...केशर दुधात खलुन घातले तर चालेल का

भाग्यश्री's picture

8 Jul 2010 - 11:45 pm | भाग्यश्री

अफलातून रेसीपी!!!
सगळं साहित्य घरात होते. आत्ताच सेट करायला ठेऊन आले...
संध्याकाळी कुल्फी!!! ढॅन्टॅडॅन!! :)

बहुगुणी's picture

9 Jul 2010 - 5:59 am | बहुगुणी

गणपा: ही कृती या खालील व्हिडिओ च्या जवळपासची आहे, मी गेली २ वर्षे करतो आहे जमेल तेंव्हा (आणि खूप भाव मिळवून जातो लोकांना आवडली की ;))

तुमचं presentation नेहेमीप्रमाणेच आवडलं हेवेसांनल.

मुक्तसुनीत's picture

9 Jul 2010 - 7:27 am | मुक्तसुनीत

शिसानविवि.

स्मिता_१३'s picture

9 Jul 2010 - 7:40 am | स्मिता_१३

स्मिता

दिपक's picture

9 Jul 2010 - 9:14 am | दिपक

का रे का? :S

जागु's picture

9 Jul 2010 - 11:29 am | जागु

गणपा काय मस्त आहे कुल्फी. माझ्याकडे कुल्फीचे साचे आहेत. आता मी करणार ही रेसिपी.

जे.पी.मॉर्गन's picture

9 Jul 2010 - 12:12 pm | जे.पी.मॉर्गन

_/\_

जे पी

स्वाती२'s picture

11 Jul 2010 - 7:01 pm | स्वाती२

मस्त आहे ही पाकृ. मी नेहमी वर बहुगुणीने लिंक दिलेय तशी करते. पण ही जास्त छान दिसतेय. मुख्य म्हणजे कुल व्हीप वापरावे लागत नाही. :)

Madhubala's picture

25 Oct 2012 - 9:28 pm | Madhubala

म्र् रा थि मधे कस लिहाय् च ते सागा

इरसाल's picture

6 May 2013 - 1:49 pm | इरसाल

उन्हाळ्यासाठी म्हणुन वर आणत आहे.

प्रचेतस's picture

6 May 2013 - 2:01 pm | प्रचेतस

अहाहाहाहाहहाह
लाजवाब.

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 2:35 pm | ढालगज भवानी

अरारारारा!!!! आता फक्त उचला रे अन म्हणा "रामनाम सत्य है" =)) =))

गणपा पूर्वीपासूनच दुष्ट आहे. ही रेश्पि हाच पुरावा.

नेहमीप्रमाणे छान पा.कृ.... :)
कुल्फी करून पहायला हवी.

मॄदुला देसाई's picture

6 May 2013 - 5:03 pm | मॄदुला देसाई

गारेगार रेसिपी! एकदम झकास :)

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2013 - 5:14 pm | अत्रुप्त आत्मा

गंपाला इदेशातुण पकडुण भारतात/पुण्यात आणणेत यावे
आशी मी समस्त खादाड कंपू कडून मागनी करत हाये. ;-)