एक विचित्र अनुभव ...
नमस्कार मिपाकरांनो,
गेले अनेक दिवस मिपावर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा वाचत होतो. त्या अनुशंगाने मला आलेला एक विचित्र अनुभव शेअर करवासा वाटतो.
साधारण २००३-४ च्या सुमाराची गोष्ट आहे. मी आणि माझे काही मित्र अनेक रविवारी फर्ग्युसनमागील हनुमान टेकडीवर पहाटे पहाटे जायचो आणि नंतर एफ. सी. रोडवरील 'वैशाली' हॉटेल मधे नाश्ता करत असू. त्यावेळेस वैशाली हॉटेलमधे एक म्हातारा कन्नड भाषिक माणूस येत असे. बहुदा त्याची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नसावी. कारण तो अनेकदा येणार्या जाणार्यांकडे ५-१० रुपये मागत असे, आणि नंतर हॉटेलमधे काहितरी खात असे.
माझा आणि माझ्या मित्रांपैकी कोणाचाही त्याच्याशी थोडादेखील परिचय नव्हता. शिवाय तो माणूस अनेकदा असंबद्ध बड्बडत असे, त्यामुळे कोणी सामान्य माणूस त्याच्याशी बोलायला देखील जात नसे.
एकदा रात्री मी एफ. सी. रोडवरील आय्.डी.बी.आय. च्या ए.टी.एममधऊन पैसे काढायला गेलो होतो. सालाबादप्रमाणे रस्यावरील दिवे गेलेलेच होते. पण ए.टी.एम आणि कोरिडॉर्मधे एक ट्यूब चालू होती.
कार अंधारातच उभी करायला लागली होती. पैसे काढून परत येतो तर तोच म्हातारा माणूस ५-१० रुपये मागू लागला. पण माझ्याकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे (१०० आणि ५०० च्या नोटा) मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून तसाच निघालो होतो. पण गम्मत म्हणजे त्याने मला माझ्या व माझ्या तीर्थरुपांच्या नावाने हाक मारून परस्पर सांगू लागला कि तुम्ही इन्ग्लंड अमेरीकेत जाल, असं कराल तसं कराल. थोड्क्यात माझं थोडंफार भविष्य सांगू लागला. व म्हणाला की भरपूर पैसे मिळवाल पण मला गरीबाला ५-१० रुपये तरी द्याच.
पण माझ्याकडे खरोखरीच सुट्टे पैसे नसल्यामुळे मी त्याला म्हणालो कि नंतर कधीतरी देतो. त्यावर तो म्हणाला की नंतर कधी आणि कुठे भेटणार, आताच द्या. तर मी त्याला सांगितले की मी तुम्हाला 'वैशाली'पाशी अनेअकदा पाहिले आहे. तेव्हा परत तिथे भेट्लात की देइन. त्यावर तोसुद्धा समजूत पटल्यासारखा गप्प बसला. आणि माझी एकदाची सुटका झाली.
त्यानंतर अनेकदा 'वैशाली'त जाणे झाले पण 'तो' काही भेटला नाही.
मला आणि त्यावेळी माझ्या बरोबर असणार्यांना एक दोन प्रश्न पडले, की ह्या माणसाचा परीचय देखील नसताना त्याला माझे नाव कसे समजले? बरं मित्रांनी हाका मारताना ऐकले असेल तर मग माझ्या तीर्थरुपांचं नाव त्याला कसं समजलं असावं? बरं मुद्दम्हून माहीती मिळवून लक्षात ठेवायचं म्हटलं तरी केवळ ५-१० रुपयांसाठी एव्हढे उपद्व्याप कोण करेल? शिवाय माझ्या कोणत्याच मित्राशी तो कधी बोलल्याचं ऐकलं नव्हतं. परत तो थोडासा वेडसर व असंबद्धं बड्बड करणारा असा असल्यानं त्याला फारसं कोणी एंटर्टेन करत नसे.
ज्यावेळी त्याने माझ्या अमेरीकेला जाण्याबद्दल भाकीत केलं त्यावेळी माझं करीयर आणि एकूण परिस्थिती अशी होती की ते ऐकून मला तर हसायलाच आलं होतं. पण नंतर खरोखरच अमेरीकेच्या तीन वार्या होवून गेल्या.
ह्याबद्दल काही परिचितांशी बोलल्यावर थोड्याशा अंधश्रद्धेच्या वाटतील अशा प्रतिक्रिया ऐकू येवू लागल्या, ज्याबद्दल मला फारसा विश्वास ठेवता येत नाही.
पण मग परत त्या प्रश्नांना काय उत्तरं देता येतील? इतर कोणत्या शक्यता असतील?
हा निव्वळ एक 'इल्लॉजिकल' अनुभव म्हणून शेअर करत आहे, कोण्त्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा स्वतःच महत्व वाढवण्याचा प्रयत्न समजू नये.
प्रतिक्रिया
असे येतात कधी कधी अनुभव.......
योगायोग
हे एवड्ज
असाच अनुभव
:-)
तुम्ही
उंचीबद्दल आणि इतर प्रतिसादांबद्दल धन्यवाद
अस आहे
सागर,'पॉवर
होते असे
असच...
असच ...
ह्त