भिगवण भटकंती भाग २
भिगवण भटकंती भाग १
दुपारी १.३०/१.४० पर्यंत हे फ़ोटोग्राफ़ी चालु होती. आता पोटात पण कावकाव चालु झालेली. थंडीचे दिवस असले तरी दुपार रणरणीत तापलेली, सोबत फ़्कत आर्धा लिटरच पाणी उरलेल. तासाभराची बोटीची सफ़र संपल्यावर त्याच नावाड्याला खाण्या विषयी म्हणजे हॊटेल वगैरे आहे का विचरल्यावर परत एकदा निराशा झाली. तळ्या काठाने उन्हात थोडा पुढे भटकत गेल्यावर एका उथळ जाग्यावर भरपुर डुंबुंन घेतल.(चांगल पोहता येत मला तरी पण न पोहता डुंबलो कारण सॆकची काळजी आणि अनोळख्या जागच्या पाण्याची मी कधीच रिस्क घेत नाही) भिगवणच्या तळ्या काठी स्थानिक मच्चीमारांची १०/१२ पाल किंवा शेतातील खोपी असल्यासारखी कुडाची कच्ची घर आहेत. भुक असह्य झाली होती आणि सोबतची बिस्कीटे, खजुर व राजगिरा+शेंगदाणा चिकीचा केव्हांच फ़डशा पडला होता. मनाशी ठरवल त्या मच्छी मारांच्या घरासमोर ओंम भिक्शाम देही म्हणायच. आवाज दिला ..........
मी :"कुणी हाय का घरात ताई ?" आणि आतुन खरोखरीच एक ताई(बाई) आली. तिला सरळ विचारल "मला जेवण हव आहे .पैसे द्यायला तायार आहे. मिळेल का?".
ती : "भाजी संपलीया सायब. मासं तेवढ हाईत. चालत्याल का?"
मी : (मनातल्या मनात आव चालत्याल काय? पळत्याल) चालत्याल की त्यात काय ? खर कशी प्लेट?
ती : आधी खावा अन आवडल तर समजुन द्या काय द्यायच ते?
१० मिनीटाच्या आत माझ्या समोर गरमा गरम तव्यातुन डायरेक ताटात भाकरी सोबत मश्याचा अप्रतिम चुलीवरचा रस्सा , लसुण चटणी, आणि तांब्याभर पाणी हजर. विनंती वरुन कांदा पण आला. काय सांगु त्या जेवणाची चव आहाहा!! आयुष्यात कधिच विसरणार नाही. साताजन्माचा उपाशी असल्यागत नमोजता पोट भरेसतो भाक-या हाणल्या. वट्ट रु.१००/- बील खुषीने देउन त्रुप्तीची ढेकर देत बाहेर आलो. आता कुठे जरा मेंदु चालायला लागला. मी याच झोपडीच्या दाराशी का आलो? त्या झोपडीतुन येणा-या चुलीवरच्या दरवळाने माझे पाय आपोआप तिकडे खेचले गेले होते. मी गेलो नव्हतो.
घड्याळात एव्हाना ३ वाजले होते. जेवण जड झालं होतं आणि वर उन्हाचा तडाखा. सेक उश्याला घेउन एका लिंबच्या झाडा खाली जरा (२५/३० मिनट) डुलका काढला.
अचानक फ़डफ़ड आणि कलकलाट ऐकु आला म्हणुन उठलो तर माझ्या समोर १५०/२०० रोहीत (फ़्लेमिंगो) पक्श्यांचा थवा आकाशात
घिरट्या घालत पाण्यात उतरण्याच्या तयारीत होता. मी आयुष्यात पहिल्यांदाच थक्क होउन फ़्लेमींगो बघत होतो.
त्यांनंतर या पेंटेड स्टॉर्क ने पण दर्शन दिल
एव्हाना उन्ह कलली होती आणि पक्ष्यां ईतकीच माल पण परतीची ओढ लागली होती. परतीचा रस्ता तुडवत तुडवत.......
आ अब लौट चले....
तळ्यातिल पान वनस्पतिंचा गालीचा
या सुर्यास्ताला साक्षि ठेउन
शेकडो पक्ष्यांचा मी आता निरोप घेत होतो.
सोबत सोनेरी खजिना घेउन हा भटक्या भिगवण एसटी स्टँडात परतला.
भिगवण भटकंटी समाप्त
कॅमेरा निकॉन डि९० लेन्स निकॉन ७०-३०० आणि निकॉन १८-५५
त्यांनंतर या पेंटेड स्टॉर्क ने पण दर्शन दिल
एव्हाना उन्ह कलली होती आणि पक्ष्यां ईतकीच माल पण परतीची ओढ लागली होती. परतीचा रस्ता तुडवत तुडवत.......
आ अब लौट चले....
तळ्यातिल पान वनस्पतिंचा गालीचा
या सुर्यास्ताला साक्षि ठेउन
शेकडो पक्ष्यांचा मी आता निरोप घेत होतो.
सोबत सोनेरी खजिना घेउन हा भटक्या भिगवण एसटी स्टँडात परतला.
भिगवण भटकंटी समाप्त
कॅमेरा निकॉन डि९० लेन्स निकॉन ७०-३०० आणि निकॉन १८-५५
लेखनविषय:
याद्या
9097
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
जहबहरा!!!!
_/\_
जयपाल
जियो जैपाल
अप्रतिम!
मस्त!
खलास रे!!
व्वा व्वा व्वा
अहाहा,
रापचिक...
मस्त
सूर्यास्त
सुंदर
सर्व वाचकांचे अणि प्रतिसाद कर्त्यांचे
चित्रबलाकाचा अलारिपु
>>>> चांगल
सूर्यास्त
खल्लास... जय