नाडी नाडी नाडी

आंबोळी's picture
आंबोळी in काथ्याकूट
20 May 2010 - 4:52 pm
गाभा: 

आजकाल मिपावरती नाडी शब्द आला की नाडीवादी आणि नाडी-काफीर लगेच बाह्या सरसावून पुढे होतात...(बाकीचे पॉपकॉर्न घेउन जवळचे झाड पकडतात.)
परवाच कुठल्याश्या धाग्यावर जगातील सगळ्या लोकांच्या नाड्या केंद्रात उपलब्ध आहेत असे कुणीसे लिहिल्याचे वाचून डोक्याची चक्रे फिरायला लागली....

"याचा अर्थ अत्ता पर्यंत मेलेल्या लोकांच्या पण नाड्या असणार......."

आणि मग प्रश्नही निर्माण व्हायला लागले.....

जे लोक मरणपावलेत त्यांच्या नाड्यांचे हे नाडीकेंद्र वाले लोक काय करतात?

कारण एकदा माणूस मेला की त्याच्या नाडीचा काहीच उपयोग नाही. ती नाडी म्हणजे त्या केंद्राला एक प्रकारची अडगळच... मग अश्या निरुपयोगी नाड्यांचे हे लोक काय करतात? माणूस मेला की त्याच्या शरिराबरोबरच त्याच्या अंगठा ही नाहिसा होणार... मग त्याची नाडी शोधणार कशी? त्यामुळेच नाड्यांवर औषधांसारखी एक्स्पायरी डेट असते का? की "अमुक एक नाडीचा मनुष्य अमुक अमुक तारखेला मरणार/मेलेला आहे... त्या नंतर या नाडीचा उपयोग नाही."

मग अश्या नाड्या हे लोक नाडी-काफरांना अभ्यासासाठी का देत नाहीत? तसेही तो माणूस आता येऊ शकणार नाही.... म्हणजे त्या नाडीतून कमाई शुन्य... मग अभ्यासासाठी द्यायला काय हरकत आहे? एक तर नाडी-काफरांची तोंडे बंद होतील... शिवाय नाडीची जाहिरात होईल तो भाग वेगळाच... पण असे कुठलेही केंद्र करताना दिसत नाही...
काय अडचण असेल बर त्यांची?

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 May 2010 - 4:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गपा हो प्राध्यापक आंबोळी! मोठ मोठ्या तपस्वी रुशि मुनिंनी नाड्या लिहील्या आहेत आणि तुम्ही असले कुस्कट प्रश्न का विचारता आहात? तुमचा विष्वास नसेल तर किंवा तुम्ही मेलात तर तुमची नाडी ऑपॉप नश्ट होते ते माहित नाहि का तुम्हाला??

अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

20 May 2010 - 5:06 pm | प्रकाश घाटपांडे

आत्ता जीव नाडीत ही प्रतिक्रिया व क्रिया उमटली असेलच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 May 2010 - 5:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =))
काका, अत्री जीव नाडी म्हणजे "अत्री जीव नाडतात" असं आहे का?

अदिती (अत्रे)

पंगा's picture

21 May 2010 - 7:50 am | पंगा

... हा शब्द हृदयाला भिडला.

- (टारगट्ट) पंडित गागाभट्ट.

परिकथेतील राजकुमार's picture

20 May 2010 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्हाल हो कशाला हव्यात नाड्या ?

कंदिलात वाती म्हणुन वापरायच्या असतील !

©º°¨¨°º© खांडोळी ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रमोद देव's picture

20 May 2010 - 5:25 pm | प्रमोद देव

आंबोळीशेठ आता कुणाला पोचवायची सुपारी मिळालेय....म्हणून कंदीलासाठी नाडी....नाही,नाही...आपलं, वात शोधताय? ;)

योगी९००'s picture

20 May 2010 - 6:21 pm | योगी९००

तुमच्या लेंगा, पायजमा याच्या नाड्या कोठून आल्या असे वाटते..?

माझ्या मते जे जीव नष्ट झाले..त्यांच्याच नाड्या येथे वापरल्या जातात..

खादाडमाऊ

मदनबाण's picture

20 May 2010 - 5:54 pm | मदनबाण

मी आत्ता पण पॉपकॉर्न घेउन बसलोय...हे काय वेगळ सांगायला हव !!! ;)
बाकी अंबोळ्या तू लोकांना पोहचवण्यात उस्ताद झालेला दिसतोयस...किती योग्य प्रश्न विचारलास !!! ;)
असो...चालु द्या. ;)

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger

भडकमकर मास्तर's picture

20 May 2010 - 6:21 pm | भडकमकर मास्तर

अंबोळीराव, तुम्ही पहिले जवळच्या नाडी केंद्रात जा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या...
नुसते इथे ड्वायलाग मारू नका....
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

पांथस्थ's picture

20 May 2010 - 8:12 pm | पांथस्थ

अंबोळीराव, तुम्ही पहिले जवळच्या नाडी केंद्रात जा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या...

नाडी केंद्रात (दुसर्‍याची) नाडी सोडली तर भलताच अनुभव यायचा =))

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

चिरोटा's picture

20 May 2010 - 6:29 pm | चिरोटा

कारण एकदा माणूस मेला की त्याच्या नाडीचा काहीच उपयोग नाही

आत्मा/प्राण ट्रान्स्फर होतो ना एका माणसातून दुसर्‍या माणसात असे म्हणतात तशी नाडी कशावरून ट्रान्स्फर होत नसेल?

P = NP

परिकथेतील राजकुमार's picture

20 May 2010 - 6:37 pm | परिकथेतील राजकुमार

आत्मा/प्राण ट्रान्स्फर होतो ना एका माणसातून दुसर्‍या माणसात असे म्हणतात तशी नाडी कशावरून ट्रान्स्फर होत नसेल?

भेंडी काका, माणसातुन माणसातच ट्रान्सफर होतो कशावरुन ? माणसातुन डुकरात किंवा इतर कुठल्या प्राण्यात होत नसेल कशावरुन ? काही काही माणसांची भुते पण होतात म्हणे, त्यांचे काय ?

=)) =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

आंबोळी's picture

20 May 2010 - 6:42 pm | आंबोळी

नाडी ट्रान्स्फरसाठी साक्षात सर्किट्,मुक्तराव आणि रामदासांनी द्वीतीय क्रमांकानी पुरस्कारलेली आमची लघुकथा वाचा.

नाडी,पट्टी आणि चिंता

योगींचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता.
त्याचे कारण म्हणजे भविष्य विचारायला येणारांची संख्या दिवसागणिक बेसुमार वाढली होती आणि पट्ट्या तर केंव्हाच संपून गेल्या होत्या.
खूप विचार केल्यावर नाड्यांना गाठी मारता मारता त्याना उपाय सापडला आणि योगींच्या चेहर्‍यावर समाधान पसरले.
जुनी तमिळ कुणाच्या बापाला कळतीय?
त्याच त्या पट्ट्या फिरवुन वाचायच्या.
अश्यातर्‍हेने देशाची नसली, तरी स्वतःपुरती वाढत्या लोकसंख्येची समस्या त्यांनी सोडवली होती.

( ™ )आंबोळी

फटू's picture

20 May 2010 - 6:37 pm | फटू

नाडी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आहे !!!

(नाडीवाली हाप चडडी घालणार्‍या शाहीर दादा कोंडकेंचा फ्यान)
- फटू

Nile's picture

20 May 2010 - 7:00 pm | Nile

खुळे की काय तुम्ही!! अहो जिथे साक्षात लोकांचे भविष्य नाडीत असते तर नाड्यांचेच भविष्य नसेल काय? साला काय बी इचारायचा.

अहो एक मनुष्य मेला की त्याची नाडी आपोआप दुसर्‍याला लागु होते. अहो मरायचे सोडा, मनुष्य नाडीकेंद्रातुन बाहेर पडला की लगेच नाडी बदलते. मग जो कोनी नेक्श्ट येणार असेल ( नेक्श्ट कोन येनार हे त्या नाडीकेंद्राच्या नाडीत असतेच) त्याची होउन जाते.

डायनॅमीक मेमरी शब्द ऐकला नाय का तुम्ही? अहो पृथ्वीच्या (हीची पण नाडी आहेच) भविष्यातुन पुढे लोकसंख्येचा प्राब्लेम व्हनार हे नाडी वाल्या रुसी ला कळाले होतेच (त्याच्या नाडीतच लिहले होते!), म्हणुन त्याने अशी डायनॅमीक मेमरी लिहली.

^आता हे वरचं सगळ थेट माझ्या नाडीतुन बरं का, उगाच माझ्या नावाने शंख नको!

-Nile

रामपुरी's picture

20 May 2010 - 8:47 pm | रामपुरी

=)) =))
सगळ्या प्रश्नांवर त्यांचं एकच उत्तर असतं "अनुभव घेऊन या". पण तो का घ्यायचा याचं कारण काही ते सांगत नाहीत.
(स्वगतः नाडीवाल्यांकडून त्यांना काही कमिशन वगैरे मिळत असेल काय??? )

शेखर काळे's picture

20 May 2010 - 11:07 pm | शेखर काळे

अनुभव घेतलेले लोक काय अनुभव आला हे सांगत का नाहीत ?

इतकी जागोजागी मोफत नाडीकेंद्रे असताना, लोक नाडीकेन्द्रांच्या बाहेर रांग लावून
उभे का राहत नाहीत ?

बरं, अनुभव घेतला, ठीक आहे .. पण त्या अनुभवाचे पुढे काय केले ?

आणि नुसता उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा पाहिजे म्हणतात तर मी देतो ना आठ दहा ठसे जमवून .. त्यासाठी प्रत्यक्ष कशाला जायला पाहिजे ?

- शेखर

>काय अडचण असेल बर त्यांची?

काहीही अडचण नाही. जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही असल्या प्रश्न विचारताच कशाला?

खरच शंका असेल भक्तीभावाने शरण जाउन जवळच्या नाडी केंद्रात जा तुमच्या सर्व प्रश्नांची उकल होईल.

अहो देशभर त्या सर्वच्या सर्व नाड्या व्यवस्थित ठेवल्या आहेत "न सापडणार्‍या पट्ट्या" या विभागात नक्की मिळतील.

मग अभ्यासासाठी द्यायला काय हरकत आहे? एक तर नाडी-काफरांची तोंडे बंद होतील.

काही तरीच काय? तुमचा अमुल्य (अगम्य) ठेवा तुम्ही शत्रुच्या हातात द्याल का? काफीरांची तोंड बंद करायला वानरसेना आहेच. अद्वितियानंदास्त्र आहेत. वायुवेगाने ओकुन पडणार्‍या लेखण्या आहेत. तुम्ही काळजी करु नये. पुन्हा सांगतो तुम्ही अनुभव तर घ्या मग बोला.

"काय म्हणालात, अनुभव घेतलेले जे बोलले त्यांचे काय?"

त्यांचे काय, एकजात ते सगळे खोटारडे आहेत. पट्टीत साफ लिहले होते.

(नाडी एजन्सी इच्छुक) सहज

डावखुरा's picture

21 May 2010 - 9:43 am | डावखुरा

चालुद्या तुम्ही आपण मात्र झाडाचा शेंडाच पकडुन बसलोय.. :>
(पॉप्कॉर्न पाठ्वत रहा रे) .... =)) =)) =)) ----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 May 2010 - 9:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाडीवाल्यांच्या नाडीत बहुदा या धाग्यावर बहिष्कार दिसत आहे! ;-)
रामपुरी यांचा मुद्दा एकदम मान्य!

अदिती

आंबोळी's picture

22 May 2010 - 11:18 am | आंबोळी

>>नाडीवाल्यांच्या नाडीत बहुदा या धाग्यावर बहिष्कार दिसत आहे!
होना .... ओक येतायत पण इकडे फिरकत नाहीत....

आंबोळी

ब्रिटिश टिंग्या's picture

21 May 2010 - 4:56 pm | ब्रिटिश टिंग्या

हे नाडी काय असतं?

टारझन's picture

22 May 2010 - 10:10 pm | टारझन

तुम्ही मागे बर्म्युडा (म्हणजे बर्म्युडा देशात नव्हे) मधे होतात तेंव्हा दिसलं नाही का ते ? :)

- ब्रिटिश नाड्या