Skip to main content

माझा उपास, माझी आवड..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 20/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1315
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

>>आज माझा दत्तगुरूंकरता गुरुवारचा उपास आहे. बरं! >>मी खालील फराळ करणे पसंद करीन.. मग आम्ही काय करणे अपेक्षित आहे? :) जय गुरुदेव दत्त!

"गरमागरम साबुदाणा खिचडी, सोबत दही किंवा काकडीची कोशिंबीर" ला मत दिले आहे. P = NP

एकच पर्याय का म्हणून निवडायचा? आज माझा उपास आहे. सकाळी मी मसाला दूध प्यालो. आता थोड्या थोड्या वेळाने मी साबुदाणा खिचडी (अर्थात दह्याबरोबर), बटाट्याचा कीस, झाल्यास साबुदाणा वडेही, वर्‍याचे तांदूळ व दाण्याची आमटी मात्र आवर्जून, मग झाल्यास बटाट्याची उपासाची भाजी खाणार. मग मस्तपैकी थंडगार ताक पिणार. रात्री शक्यतो फलाहारच घेईन! =)) =)) उपास म्हटला की साबुदाणा खिचडी ही आलीच म्हणून पर्याय एकला मत दिले आहे! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by मेघवेडा

हाहाहा =)) =)) एकदम बरोबर :)
उपास म्हटला की साबुदाणा खिचडी ही आलीच म्हणून पर्याय एकला मत दिले आहे!
येस्स :) *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता

In reply to by अस्मी

मेघोबांशी पूर्णपणे सहमत्...कारण तेच विचार माझे देखील आहेत... :) मदनबाण..... Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

In reply to by मेघवेडा

एकूणात काय तर 'एकादशी आणि दुप्पट खाशी' कधी कधी माझा सम्पूर्ण दिवसभर "मांसाहारी उपास" असतो. खामगाव खुर्दच्या 'म्हसोबा' चा दिवस म्हणून. त्या दिवशी मला अगदी कणभरसुद्धा 'शाकाहार' चालत नाही. पाणी सुद्धा त्यांतील जलचरांसकटच प्यायचे ... असे कडक पथ्य आहे आमच्या या म्हसोबाचे ... =))

In reply to by मेघवेडा

सहमत आहे. हा कौल चुकिचा आहे. हे सगळे मल्टीचॉईस प्रश्न आहेत. एकच निवड हा उपवासस्वांतत्र्यावर घाला आहे. णिषेध! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

>>>आज माझा दत्तगुरूंकरता गुरुवारचा उपास आहे. उपास स्वतः करता असावा, दत्तगुरूंकरता नसावा. संजा

उपवास तुमचा आणि फराळही तुमचा आहे, तेव्हा वाटेल ते खा. :) भगरीपासून बनवलेले काही नाही चालत का तुम्हाला ? मला तर वाटेल तेव्हा खाण्यासाठी भगरीची खीर आवडते :) कौलाला मत द्यायचे म्हणून 'फलाहाराला' मत टाकले. -दिलीप बिरुटे [फक्त चतुर्थीचा निरंकार उपवास करणारा ]

आम्ही उपास असला की सुक्के मटन दात न लावता खातो. उपासाच्या कोंबड्या (साबुदाण्यावर पोसलेल्या) खातो. व नवटाक टाकून बसतो भजन करीत. तो पर्याय कुठे दिसत नाहीये. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

मी उपास करत नाही तरी पण साबुदाणा खिचडी ला मत दिले आहे, अवांतरः उपास हा बरोबर शब्द कि उपवास? --टुकुल

पहिल्या पर्यायाला मत दिले आहे, कारण बाकी काही नाही मिळाले तरी साबुदाणा खिचडीशिवाय उपवासाची कल्पना काही आपल्याला पचत नाही! मला भगर ही आवडते, पण शेंगदाण्याची आमटी असेल तरच. एक तरी शेंगदाण्याचा लाडूही पाहिजेच. उकडलेली रताळी पण मस्त लागतात दुधाबरोबर :)

'काही नाही' प्रमाणेच 'वरिल सर्व काही' असा पर्याय का नाही हो दिला?

वर्‍याचे तांदूळ, लिंबू लोणचे आई ग यम यम :) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

तात्या, तुमचं वाढलेलं वजन पाहता समजवण्याचा शेवटचा पर्याय म्हणून शेवटच्या पर्यायाला मत दिले आहे ;) इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)