लॉरेल हार्डीचे जुने चित्रपट हवे आहेत
लहानपण ज्या विविध कलाकारांनी समृद्ध केलं त्यात चार्ली चॅपलिन पाठोपाठ लॉरेल हार्डी ह्या अफलातून
जोडीचा नंबर लागतो. साधारणत: १९९३-९५ च्या सुमारास दूरदर्शनवर लॉरेल-हार्डीचे मूकपट दाखवित असत. त्यातल्या बहुतेक सर्व फिल्म्स फारच विनोदी होत्या. हसून हसून अगदी लोळायची वेळ येत असे; लहानांचीच नाही तर मोठ्यांचीसुद्धा हसून हसून मुरकुंडी वळत असे. म्युझिकही मस्त असे, ती टिपिकल ट्यून माझ्या अजून
लक्षात आहे.
त्यातली एक फिल्म काहीशी आठवते; हे दोघे मिलिटरी कॅम्पला ट्रेनने जातात, वाटेतही बर्याच गंमती करतात, त्यांच्या (बर्याच जाड्या-रड्या फिल्म्स मध्ये दिसणार्या) मुच्छड टकल्या सार्जंट्चा अंत बघतात..तिकडे कॅम्पला सगळे तलावावर आंघोळीला (विवस्त्र) जातात, रड्याला कपड्यांच्या राखणीला ठेवतात. त्याची जळती सिगरेट पडून सगळे कपडे जळतात. बाकी सगळे बंबे पाण्याबाहेर आल्यावर मारामारी होते अन चुकून मधमाश्यांच्या पोळ्याला दगड लागतो अन बुडं सुजेस्तोवर सगळ्यांना माश्या चावतात! सगळ्यात शेवटी ह्या सगळ्यांची सुजीर पुठ्ठे घेऊन परेड निघते तेव्हाची कॅप्शन भारी आहे.. ऑल वेल दॅट् एन्ड्स स्वेल!!
अजून एका भयंकर विनोदी फिल्ममधे हे दोघे बॅन्ड पथकात नोटेशन समोर लावून बॅन्ड वाजवित असतात..आता लॉरेल-हार्डी असल्यावर बॅन्डचा
बोर्या वाजणार हे साहाजिकच आहे.. त्यांचे लाफिंग ट्वेन्टीज ह्या नावानेसुद्धा एक अप्रतिम कलेक्शन होतं. त्यांचाच दी लाईव्ह घोस्ट नावाचा एक विनोदी चित्रपटही आठवतो.
अश्या अनेक सुंदर फिल्म्स होत्या ज्या मला (तरी) सहजी मिळत नाहीत. मध्यंतरी माझ्या एका नातेवाईकाने अमेरिकेहून माझ्यासाठी लॉरेल-हार्डी
सायलेंट अॅन्ड म्युझिकल असे लेबल असलेल्या सीडींचा सेट आणला होता पण साफ फसवणूक झाली; त्यात लॉरेल हार्डी नव्हतेच! इथे पुण्यात मी अनेकवेळा
असा फसलो आहे..कधी काहीसे रटाळ पिक्चर गळ्यात पडतात तर कधी भलतेच काही तरी निघते.
कुणा मिपाकराकडे असे काही वेचक कलेक्शन आहे काय.. असल्यास शेअर कराल काय?
प्रतिक्रिया
'अॅमेझॉन'
मला असाच द
डॉ..साहेब...
बरोब्बर isohunt