मंगेश !
नका स्वतःला वृथा त्रास करुन घेऊ... हिंदी माध्यमांनी आता महाराष्ट्राला व पर्यायाने मराठी माणसाला फक्त देशद्रोही व अतिरेकी घोषित करण्याचेच शिल्लक ठेवले आहे......पण याच प्रकारच्या सवंग व उथळ पत्रकारितेत आणि वृत्तांकन करण्यात धन्यता मानणार्या काही महाराष्ट्रातील स्वतःला मराठी म्हणवणार्या वृत्तवाहिन्या देखिल आघाडीवर आहेत्...अर्थात त्याला त्यांचा काही इलाज नाही....कारण शेवटि त्या बिचार्यांचे मालक तिथे दिल्लीतच बसले आहेत.....तत्वासाठी अथवा स्वाभिमानासाठी मराठी म्हणवणारे स्वतःच्या पोटावर पाय कसा येऊ देतील?
फार फार तर तुमचे हे लेखन मनसे अध्यक्षांपर्यंत पोहोचवता येत का ते बघा.....कारण सध्या फक्त तेच मराठी आणि महाराष्ट्रासाठी लढत आहेत( :? )...दिल्लीश्वरांना जाब विचारण्याची आणि फाट्यावर मारण्याची धमक फक्त आणि फक्त त्यांच्यातच आहे...बाकी कुणामधे दम नाही... 8>
आणि म्हणतात ना "मारणार्याचा हात धरता येतो बोलणार्याचे तोंड नाही"
पण आताशा ती देखिल सोय राहिली नाही .कारण हल्ली कुणी राहुलबाबासारखा टिनपाट येतो आणि मराठी माणसाला टपली मारुन जातो....आणि मग हा सगळा स्टंट आधिच ठरलेला असल्याची माहिती मिळाली (वा हेतुपुरस्सर दिली गेली)असल्याने व आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या एका पक्षाची आयती फजीती कशी होते हे बघण्यासाठी म्हणुन आंम्ही ती टपली देखिल खाऊन मराठी माणसाचा अपमान उघड्या डोळ्यांनी पहात बसतो.केवळ स्वतःची खुंटी बळकट करण्यासाठी.
अवांतर-लवकरच मनसे स्वतःची वैयक्तिक महाराष्ट्राला व मराठीला वाहिलेली वाहिनी सुरु करणार असे ऐकुन आहोत..
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
मुळ धागाचा विषय हा दिल्लीपतींच्या महाराष्ट्रावर असलेल्या द्वेषा बद्द्ल आहे. त्यात राज ठाकरेंना खेचण्याचे काहिच कारण नाही. विषेशतः आपण ठळक केलेल्या वाक्यांचा हेतु आणि टाकलेली व्यंग चित्रे आपला राज वरचा रागच अधिरेखित करतात... (बहुतेक आपण राज मुळे बेकार झालेल्या कार्याध्यक्शांच्या हितचिंतक आहात...)
हिंदी न्यूज़ चॅनेल वाल्यांच्या बातम्या म्हणजे मूर्खपणाचा कळस असतो...ते कधी काय सांगतिल आणि कुणाचा संबंध कोणाशी लावतील ह्याचा नेम नाही......खालील उदाहरणच घ्या ........
१) प्रत्येक हिंदी न्यूज़ चॅनेल वर एका वेळी सेम बातमी असते तरी पण त्यांच्या मते ती एक्सक्लूसिव्ली त्यांच्याच चॅनेल वर दाखवली जाते....
२) सचिन तेंडुलकर च्या दुखपतिच्या बातमीतील वीडियो मधे हे सचिन च्या तोंडावर गोल काढतात किंवा बाण दाखवून हा सचिन आहे असे सुचवितात....
३) महाराष्ट्रात परप्रांतीयांना झालेल्या मारहाणीची बातमी आठवडाभर.....आणि झारखंड मधे मराठी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीची बातमीच नाही....
४) प्रत्येक चॅनेल ने १ क्रिकेटर आणि १ बाबा पाळलेला असतो....जे स्वतः किती मूर्ख आहेत ह्याची माहिती देत असतात...
५) कुठल्यातरी फटकळ अवॉर्ड शो मधे मिळालेल्या अवॉर्ड च्या जोरावर हे लोक आपला चॅनेल हा देशातील सर्वात श्रेष्ठ चॅनेल आहे अश्या बोंबा मारत असतात.....
एक सूचना मराठी न्यूज़ चॅनेल साठी पण:
आगळे वागळे कपडे घालून दाढी मिश्या वाढवून हाताने रोबाटिक डान्स करणार्या न्यूज़ आंकर ने जरा आरडा ओरड कमी केले तर बर होईल....बातम्या चांगल्या असतात पण तुमच्या आरडाओरडी मुळे लोकांना त्रास होतो ( मग लोकांच मत तुम्हाला कळत नाही अस वाटत)...
प्रतिक्रिया
लेखाशी व
मंगेश !
वड्याचं तेल....
आपले
सहमत
संताप आवरत
मूर्खपणाचा कळस