मी शाहरुखचा प्रशंसक आहे, त्याची योग्यता त्याची अदाकारी ह्या बद्दल मला यत्किंचित ही शंका नाही . मला माय नेम इज खान हा चित्रपट देखील आवडला.
अभिनय आणि शाहरुख यांचा दुरान्वयानेही संबध असावा असे आजतागायत वाट्ले नाही ....अपवाद फक्त स्वदेश,चक दे या चित्रपटांचा आहे..
काल वाचलेल्या बातमीनुसार शाहरुखने काल कलकत्ता येथे "लक्स कोझी "सोबतचा आपला करार मोडित काढला....सदरची कंपनी ही रिझवान उर रेहमान याच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असणार्या अशोक टोडी याच्या मालकिची आहे व शाहरुख त्या कंपनीचा ब्रँड अँबेसेडर होता.पण पश्चिम बंगाल मधिल मुसलमानांनी शाहरुखच्या या भुमिकेला आक्षेप घेतल्यावर त्याने लगेच आपला करार मोडीत काढला.....निधर्मीवादाचा पुरस्कर्ता असलेल्या शाहरुखचे हे वागणे किती दुट्टपी आहे हे लक्षात येते...........यावर एकच प्रश्न मनात येतो..."आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडूंना न घेऊन त्यांच्यावर अन्याय झाल्याची बोंब मारणार्या शाहरुखने आपल्या नाईट रायडर्स च्या संघ सदस्यांना त्यांचे पाकिस्तानी खेळाडूंच्या बाबतीतले मत विचारात घेण्याचा उदारपणा दाखवला होता का?"२६/११च्या पार्श्वभुमीवर कुणीही सच्चा भारतिय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंच्या विरोधातच बोलला असता.....कारण पाकिस्तानी खेळाडूंना न घेतल्यावर पाक खेळाडूंच्या प्रतिक्रिया पाहता त्यांच्या भारताबद्दलच्या भुमिकेत किती विखार भरला आहे हे लगेच लक्षात येते.
http://www.youtube.com/watch?v=_2IL-6YaCk0
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
प्रतिक्रिया
अभिनय आणि शाहरुख यांचा दुरान्वयानेही