प्राँस् पालक

Primary tabs

गणपा's picture
गणपा in पाककृती
25 Jan 2010 - 12:18 pm

पालक पनीर हा प्रत्येक हॉटेलमध्ये मिळणारा आणि सर्वत्र आवडीने खल्ला जाणार पदार्थ.
पण मला स्वत:ला पनीर जास्त आवडत नाही त्यामुळे आज यात थोडा फेरफार करुन याची नॉनव्हेज आवृत्ती केलेली.

साहित्य :
१ जुडी पालक
१५ - २० मोठ्या कोलंब्या
२ चमचे आल+लसुण पेस्ट
१ चमचा मालवणी मसाला
१ मोठा कांदा बारीक चौकोनी चिरलेला
२ चमचे गरम मसाला
मीठ चवी नुसार
२-३ चमचे तेल
लिंबाचा रस

कृती :


पालक नीट धुऊन घ्यावी. एका मोठ्या भांड्यात पाणी घालून त्यात २-३ चम्चे लिंबाचा रस टाकुन पालक शिजवून घ्या.
(शिजताना वर झाकण ठेवु नये. पालकचा हिरवा रंग काळपट होतो.)
पालक ७-८ मिनीटात शीजते. थोडया वेळाने गार झालेली पालक मीक्सर मध्ये घालून पेस्ट करा.


पालक शिजतेय तोवर कोळंबिला आल+लसुण पेस्ट, मालवणी मसाला, मीठ, लिंबाचा रस लावुन मुरत ठेवा.

एका भांड्यात २-३ चम्चे तेल घेउन त्यात कोळंबी २-३ मिनिटे परतवुन अर्धवट शिजवुन घ्यावी. आणि वेगळी काढुन ठेवावी.


त्याच भांड्यात नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतवावा.
कांदा गुलाबी झाला की त्यात २ चमचे गरम मसाला टकुन चांगला परतुन घ्यावा.
खाली लागत आसल्यास किंचीत पाणी घालाव.


बाजुने तेल सुटुलागल्या वर पालकची पेस्ट त्यात टाकावी.
मध्यम आचेवर २-३ मिनिटे शिजवल्यावर त्यात कोळंबी टाकावी.
मीठ चवी नुसार घालाव . ( मीठ जरा बेताने घालाव कारण पालक मध्ये क्षारांच प्रमाण बरच असत. )
मंद आचेवर ४-५ मिनीट शिजू द्या. शीजताना झाकण ठेउ नये.


गरमा गरम भाता बरोबर किंवा चपाती, भाकरी बरोबर हा प्रकार भन्नाट लागतो.

प्रतिक्रिया

बाबुराव's picture

25 Jan 2010 - 12:36 pm | बाबुराव

काय भारी फोटू दिसून राह्यले भो
तुमाला नमस्कार बाबा.

बाबुराव :)

अश्विनीका's picture

25 Jan 2010 - 1:16 pm | अश्विनीका

काय योगायोग .. मी कालच सेम हीच डिश बनवली होती. आणि आज तुमची रेसिपी बघतेय.
माझ्या रेसिपीत मी मालवणी आणि गरम मसाला न घालता काळा मसाला व धने जिरे पूड घातली होती. आणि पालक शिजताना त्यात एक छोटा टोमॅटो आणि १-२ छोट्या हिरव्या मिरच्या घातल्या होत्या.
अशी प्रॉन्स घातलेली पालक भाजी फार छान लागते .

- अश्विनी

चिरोटा's picture

25 Jan 2010 - 3:51 pm | चिरोटा

भाकरी बरोबर तर मस्तच लागेल. या आठवड्यात नक्की करतोच.

भेंडी
P = NP

सुनील's picture

25 Jan 2010 - 5:07 pm | सुनील

अप्रतिम!!

शिजलेल्या पालकात थोडे आरारूट घातले तर Consistency येईल असे वाटते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विंजिनेर's picture

25 Jan 2010 - 5:29 pm | विंजिनेर

छान दिसतोय पदार्थ अन् सोपाही ... वरती म्ह्टल्याप्रमाणे १ टोमॅटो प्युरी करून घातला तर अजून छान लागावा.

संदीप चित्रे's picture

25 Jan 2010 - 10:18 pm | संदीप चित्रे

प्रॉन्स जोडीला असल्या की पालक, मेथी वगैरे प्रकारही खाणेबल होतात हा माझा अनुभव :)

चित्रा's picture

26 Jan 2010 - 5:15 am | चित्रा

प्रॉन्स जोडीला असल्या की पालक, मेथी वगैरे प्रकारही खाणेबल होतात हा माझा अनुभव.

असहमत. यातून कृपया मेथीला वगळावे. :)

मेथी कशीही चांगलीच लागते. माझी सर्वात आवडती भाजी.

अक्षय पुर्णपात्रे's picture

25 Jan 2010 - 11:37 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री गणपा, मस्त पाकृ. जमण्यासारखी दिसतेय.
........................
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.

बंडू बावळट's picture

26 Jan 2010 - 9:01 am | बंडू बावळट

छान पाककृती!

धनंजय's picture

26 Jan 2010 - 10:59 pm | धनंजय

मस्त दिसते आहे!

प्रभो's picture

26 Jan 2010 - 11:20 pm | प्रभो

भूक लागली...बाकी विकांती प्रॉन्स पुलाव हाणला मैत्रिणीने बनवलेला.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

टुकुल's picture

27 Jan 2010 - 5:33 am | टुकुल

जबरा गणपा शेठ..
तु म्हणजे एकदम कहर आहेस.

--टुकुल