नटरंग ने किति पैसे कमवले ?

बट्ट्याबोळ's picture
बट्ट्याबोळ in काथ्याकूट
19 Jan 2010 - 11:11 pm
गाभा: 

नटरंग ने किति पैसे कमवले ? कोणाला काही अंदाज ?
"३ मुर्खांनी" ५०० करोड कमवले म्हणतात ..

अधिक्रुत माहिती असेल तर डाकवावी.
किंवा अंदाज बांधावा ...

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

20 Jan 2010 - 7:27 pm | पाषाणभेद

नटरंगने किती अमोल ठेवा दिलाय असा धागा करावा काय? मिळणारा आनंद न मोजता येणारा आहे, भले तो ३ मुर्ख असोत की नटरंगने असो.

बाकी तुम्ही म्हणता तसा कितीचा गल्ला ते बॉक्स ऑफीसात मिळेल.
आपला हा प्रादेशीक चित्रपट आहे. तो राष्ट्रीय पातळीवरचा आहे. विषय भिन्न आहे. तुलना चुकीचीच आहे.

तुम्हालाही दोन्ही चित्रपट आवडलेच असतील.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)

विदेश's picture

20 Jan 2010 - 12:18 pm | विदेश

तमाशा-लावणी चालू पिढीसाठीहि जिवंत ठेवण्याची नटरंग-चमूची धडपड 'अनमोल' आहे. त्यात मिळालेले यश कशातही मोजता येणार नाही.

अभिरत भिरभि-या's picture

20 Jan 2010 - 1:02 pm | अभिरत भिरभि-या

हा चित्रपट गेले ३ आठवडे ( = २१ दिवस ) पन्नासच्या वर थेटरात आहे. प्रत्येक थेटरात किमान २ खेळ मानले ; कमाल प्रेक्षक क्षमता ५०० मानली आणि हाउसफुलचे केवळ १२ दिवस मानले तर ..
50 * 12 * 500 * 2 = 600000 तिकिटे खपली.

प्रत्येक तिकिट ३५ /- चे मानले तर
600000 * 35 = 2 कोटी १० लाख रु

माझ्या गेस्टीमेटनुसार प्रत्यक्ष उत्त्पन्न यापेक्षा जास्त असावे.

याचाच दुसरा अर्थ असा की दहा कोटी मराठी भाषिकांपैकी फक्त दहा लाख = १ टक्का जरी लोक थेटरात आले तरी चांगले यश मिळते. ही संख्या जास्त नाही पण निदान ५ टक्क्यांपर्यत वाढली तरी मराठी भारतातील ४ नंबरची ईंडस्ट्री बनावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2010 - 7:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद...!

बट्ट्याबोळ's picture

20 Jan 2010 - 7:34 pm | बट्ट्याबोळ

पहिले दोघं:
नितळ, देवराई सारखे अनेक सुंदर चित्रपट मी सिनेमाग्रुहात बघितले आहेत. पण पुन्हा तसेच दर्जेदार चित्रपट काढायला पैसा लागतो. देविका दप्तरदार ने खूप सुंदर अभिनय केला अहे नितळ मधे. पण कोण विचारतो?
माझ्या भाषेत लिहिणारा, गाणारा, अभिनय करणारा इ. ना चांगले पैसे मिळावेत हीच सदिच्छा !!

तुम्हाला सद्गुणविक्रुती झाली आहे !!!

पैशे फेकलेत तर ऐश्वर्या देखील लावणी वर नाचेल, आणि लावणी जिवंत ठेवेल !!

भिरभि-या ....
चांगला अंदाज.

पाषाणभेद's picture

22 Jan 2010 - 3:15 am | पाषाणभेद

मुळ पहिला:

आपला काहीतरी गोंधळ होतो आहे.

लक्षात घ्या: आधी तुम्ही चुकीचीच तुलना करत होते. एकतर ३ ईडियटस हा हिंदी चित्रपट आहे. तो गल्लाभरू चित्रपट आहे. (तुमच्या नितळ, देवराई च्या तुलनेत तो कलात्मक व वास्तववादी तर नाहीच नाही.) आता नितळ, देवराई शी तुलना करत आहात.

नितळ, देवराई सारखे चित्रपट कलात्मक चित्रपट आहेत का? (मी बघीतलेले नाहीत.) ज्या अर्थी तुम्ही 'पण कोण विचारतो?' असे विचारता आहात त्यामुळे ते कलात्मकच असावेत.

म्हणजेच आपला राग कलात्मक चित्रपटांकडे प्रेक्षक जात नाहीत पर्यायाने त्या चित्रपटात लिहिणारा, गाणारा, अभिनय करणारा इ. ना चांगले पैसे मिळत नाहीत हा रोख लक्षात येतो. थोडक्यात (मराठी) चित्रपटात कामे करणार्‍यांना जास्त पैसे मिळावेत असे आपल्याला वाटते. एक मराठी माणूस म्हणून मला तर त्या पलिकडे जावून असे वाटते की सगळ्या दुनियेने मराठीच चित्रपट बघीतले पाहिजे मग तो कलात्मक असो किंवा गल्लाभरू . पण ते शक्य नाही. असो.

पैशाचाच मामला असेल तर नटरंगने तुम्ही सांगितलेल्या खेळांपेक्षा जास्तच पैसा कमावलेला आहे. अन ती वस्तुस्थिती आहे.

हां, तुम्ही याला सद्गुणविक्रुती म्हणत असाल तर आम्ही त्याला सद्गुणानंद म्हणतो. त्याने वस्तुस्थितीत फरक पडणार नाही.

अन तुमच्या बोलण्यातुन नटरंग हा नितळ, देवराई सारखे अनेक सुंदर चित्रपटांसारखा नाही (व तो कलात्मकही नाही) असा अर्थ ध्वनीत होतो आहे. नटरंगला तुम्ही गल्लाभरू चित्रपटाचा दर्जा देणे म्हणजे काजव्याने सुर्याला 'काय रे, झोप ना आता, मी दुनियेला प्रकाश देईन ना' असे म्हणण्यासारखे आहे.

>>> पैशे फेकलेत तर ऐश्वर्या देखील लावणी वर नाचेल, आणि लावणी जिवंत ठेवेल !!

हे तर तुम्ही वैश्वीक सत्यच सांगता आहात. तुम्ही फक्त सांगता आहात तर आम्ही तेच प्रॅक्टिकली करतो आहोत नटरंग सारखा चित्रपट पाहून!
जेणे करून नटरंगसारख्या खेळात कामे करणार्‍यांना पैसे मिळावेत.

कलात्मक चित्रपट पाहणारे फारच कमी प्रेक्षक असतात. पुर्ण जगात हिच वागणूक आहे. चित्रपटांना आर्थीकद्र्रृष्ट्या तारतात ते सर्वसामान्य प्रेक्षक ज्यांची संख्या कलात्मक प्रेक्षकांपेक्षा कायमच जास्त असते. ज्याला चित्रपटाचा व्यावसाय करायचा असतो त्याने जास्त प्रेक्षकांचीच मागणी मान्य केली अन त्यातही नटरंगसारखा व्यावसायीक-कलात्मक चित्रपट काढला त्या चित्रपटाने सर्वसामान्य प्रेक्षकांना 'सद्गुणविक्रुती' आनंद दिला तर त्यात वाईट काय?

बाकी 'आता वाजले की बारा' अन् अप्सरा ह्या लावण्या तुमच्या 'कजरा रे' च्या तोंडात मारतील.

मराठी लावणी जिवंत ठेवायची की 'कजराचा' गजर करत डान्स बार बनवायचा भविष्य तुमच्या हातात आहे!

------------------------
मराठी लावणी चा झनझनाट, वाजवी बंदा रुपयाचा खनखनाट.
- लावणीसम्राट पाषाणभेद दगडफोडे

पाषाणाचा भेद झाल्याने थोडा सरकला आहे !!
प्रतिक्रियेवरून तुमच वय ६० च्या आसपास असावे ...

असो !!

माझ्या वक्तव्याला एवढं महत्व दिल्याबद्दल धन्यवाद !!!

पाषाणभेद's picture

22 Jan 2010 - 2:42 pm | पाषाणभेद

हॅ...हॅ...हॅ....
समवयस्कांना बरोबर ओळखतोस तू !
हा असल्या तुलना करून लेखाचा पार बट्ट्याबोळ केलास बाबा तू. नाव सार्थ करतोस नेहमी अं? लुच्चा!
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)

आशिष सुर्वे's picture

21 Jan 2010 - 10:15 pm | आशिष सुर्वे

नटरंग ने किति पैसे कमवले हे माहीत नाही.. पण ह्या बोलपटाने समस्त मराठी माणसांची मने मात्र नक्कीच जिंकली आहेत!!
लावणीला पुर्नजीवन देण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे ह्या बोलपटात..
मला लावणीचे आकर्षण नव्हते.. पण 'आता वाजले की बारा' अन् अप्सरा ह्या लावण्या कितीही वेळा एकल्या तरी मन भरत नाही..
-
कोकणी फणस

मदनबाण's picture

22 Jan 2010 - 6:23 am | मदनबाण

मराठी चित्रपट पैसे मिळवतो आहे याचाच जास्त आनंद आहे...
आकडा कितीही असो तो नेहमी वाढावाच हीच इच्छा. :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

निमीत्त मात्र's picture

22 Jan 2010 - 7:04 am | निमीत्त मात्र

मूळात इतका सुंदर मराठी चित्रपट बनवला आहे त्याचाच जास्त आनंद आहे. मध्यंतरी 'गलगले निघाले' वगैरे जे प्रकार चालले होते त्यामूळे मराठी चित्रपट रसातळाला चालले होते.

नटरंग एख सुखद बदल आहे.

II विकास II's picture

22 Jan 2010 - 8:16 am | II विकास II

अजुन एक 'ह्यांचा काही नेम नाही' नावाचा चित्रपटपण असाच बर्‍याच कमी दर्जाचा होता.

टारझन's picture

22 Jan 2010 - 9:23 am | टारझन

चालायचंच निमित्त मात्र साहेब .. आता मराठी चित्रपट सृष्टीलाही एखाद्या निमित्त मात्र ची गरज आहे हो :) नाही तर ती रसातळास जाईनच !
बाकी बौद्धीक रसातळाला गेलेल्यांनीच मराठी चित्रपटांचा दर्जा कमी झाल्याची चिंता व्यक्त केल्याचे पाहून अंमळ हसू आले =))

- बेशुद्ध छात्र
अध्यक्ष , बौद्धिक विकास मंच

II विकास II's picture

22 Jan 2010 - 9:25 am | II विकास II

>>बाकी बौद्धीक रसातळाला गेलेल्यांनीच मराठी चित्रपटांचा दर्जा कमी झाल्याची चिंता व्यक्त केल्याचे पाहून अंमळ हसू आले Rolling On The Floor

श्री टारझन तुला व्यक्तीगत टिका करण्यापलीकडे काही काम नाही का?

नितिन थत्ते's picture

22 Jan 2010 - 6:45 pm | नितिन थत्ते

(मराठी चित्रपटातील) लावणीचे पुनरुज्जीवन झाले हे चांगलेच.

वास्तवातील लावणी 'टिकून रहावी' असे वाटत नाही.

नितिन थत्ते

बट्ट्याबोळ's picture

23 Jan 2010 - 9:08 am | बट्ट्याबोळ

पॉइंट आहे !!