हॉट & सॉर सुप

Primary tabs

गणपा's picture
गणपा in पाककृती
15 Jan 2010 - 11:03 am

इंडो चायनीजच्या पुढच्या भागात सर्वांच स्वागत.
आपण बाहेर गेलो की मुख्य जेवणा आधी स्टार्टर म्हणुन सुप मागवतो. पण खर तर सुप म्हटल की ते एक संपुर्ण (complete food) अन्न आहे.
तर आज पाहुया असच एक चटपटीत सुप.
यात चिकन च्या ऐवजी भाज्यांचा स्टॉक वापरल्यास हिच कृती शाकाहारी प्रेमींसाठी

चालेल.

साहित्यः


१/२ किलो चिकन १/२ ते ३/४ लिटर पाण्यात १५ मिनिटे मोठ्या आचेवर उकडत ठेवा.
चिकनचा स्टॉक नसल्यास पाणी.
भाज्यांचा स्टॉक बनवण्या साठी चिकन ऐवजी कुठल्याही भाज्या वापरु शकता.


गाजर, भोपळी मिरची, कोबी, हिरवी मिरची, आल, लसुण, पातीकांदा बारीक चिरुन.


१-२ चमचा सोयासॉस, १-२ चमचा चिली सॉस.
१ अंड फेटुन.
१-२ मोठे चमचे मक्याच पीठ. (कॉनफ्लॉवर).
चवीनुसार मीठ.
कृती:


उकडलेल्या चिकनचे लांब लांब तुकडे करुन घ्या.


एका मोठ्या भांड्यात तेलावर हिरवी मिरची आल लसुण आणि चिकन परतुन घ्या.


त्यात २ चमचे सोयासॉस टाकुन बाकीच्या भाज्या मोठ्या आचेवर परतुन घ्या.


जितक सुप बनवायच आसेल त्याप्रमाणात स्टॉक/पाणी टाकाव आणि चवीनुसार मीठ टाकाव.


सुपला एक उकळी आली की मग एक वाटीत थोड पाणी घेउन कॉनफ्लॉवर त्यात मिसळवुन सुप मध्ये टाकाव.
सुपची घनता लगेच वाढते.
परत एक उकळी आली की मग फेटलेले अंड चमच्याने थोड थोड (थेंब थेंब) टाकाव. एकदम टाकु नये.
वाटल्यास चहा गाळणीचा वापर करु शकता.


गरमा गरम सुप जेवणाच्या आधी तयार आहे.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

15 Jan 2010 - 11:14 am | मदनबाण

आ हा...हा... गण्या लेका थंकु रे...
सुप मी अगदी आवडीने पितो...स्वीट कॉर्न,हॉट & सॉर सुप..इं. वेळ मिळेल तसं त्यावर ताव मारतो. :)
गण्या यक प्रश्न हाय... ते साला हाटीलात या सुप बरोबर कडक शेवया पण मिळतात त्यात (सुपात) टाकुन पिण्यासाठी...त्या शेवयांना काय इशेष नावं हाय का ? कारण टॉमॅटो सुप बरोबर बर्‍याच वेळी छोटे,छोटे टोस्ट चे तुकडे पण दिलेले असतात... ते पण मस्त लागतात. :)

(सुप प्रेमी)
मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

गणपा's picture

15 Jan 2010 - 11:28 am | गणपा

>>हाटीलात या सुप बरोबर कडक शेवया पण मिळतात त्यात (सुपात) टाकुन पिण्यासाठी...त्या शेवयांना काय इशेष नावं हाय का ?
त्या शेवायांचा नाव नाही माहित बॉ. पण मी एग न्युडल्स वापततो. पण त्या डिप फ्राय केलेल्या असतात म्हणुन शक्यतो कमीच वापरतो.

>>टॉमॅटो सुप बरोबर बर्‍याच वेळी छोटे,छोटे टोस्ट चे तुकडे पण दिलेले असतात..
हा हे बाकी खरं.

स्वाती२'s picture

15 Jan 2010 - 5:00 pm | स्वाती२

>>कडक शेवया
chow mein noodles
>>टोस्ट चे तुकडे
croutons घरी करता येतात.

मोहन's picture

15 Jan 2010 - 12:40 pm | मोहन

गणपा

शाकाहारी सूप करण्या करता समजा फ्लावरचा स्टॉक वापरला तर स्टॉक काढून राहिलेला फ्लावर चिकन सारखा सूप मधेच वापरता येईल का?. नाहीतर फ्लावरचेच सूप वाटायचे @)

मोहन

गणपा's picture

15 Jan 2010 - 1:26 pm | गणपा

हो, चालेल ना फ्लॉवर. त्याच्या जोडिने फरसबी पण चांगली लागते.
स्टॉक बनवताना कुठल्याही भाज्या वापरल्या तरी चालतील.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jan 2010 - 12:55 pm | परिकथेतील राजकुमार

हुह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह !!!!!!!!!!!!!!!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

खादाड's picture

15 Jan 2010 - 4:17 pm | खादाड

गणपा भाऊ
हॉट & सॉर सुप झक्कास !
चायनीज पर्दाथात मटण नाहि वापरत का?
(कारण मटण सुप छान लागत ट्राय कराव लागेल चायनीज स्टाइलनी!)

स्वाती२'s picture

15 Jan 2010 - 5:10 pm | स्वाती२

मस्त दिसतय सूप. मी कधी इंडो चायनिज ट्राय केलं नाहिये. मी हॉट अ‍ॅन्ड सॉवर इथे मिळते तसे करते. बरेच वेगळे असते.

गणपा's picture

15 Jan 2010 - 5:13 pm | गणपा

स्वाती ताई येउदेकी मग इकडे, आम्ही पण ट्राय करु नविन पद्धतीने.

अविनाशकुलकर्णी's picture

15 Jan 2010 - 5:43 pm | अविनाशकुलकर्णी

ये चिज बडी हौ मस्त मस्त

jaypal's picture

15 Jan 2010 - 6:01 pm | jaypal

हा देखिल खुप आवडीचा पदार्थ. चायनीज खादाडीच्या करीरची सुरवात १९८७/८८ च्या दरम्यान स्वीटकार्न सुप ने झाली. हॉट & सॉर सुप बनवण येवढ सोप आहे हे माहीत नव्ह्त. कदाचीत तुझ्या लिखाणाच्या स्टाईल मुळे पण सोप वाटत असेल. आता वेगवेगळे पदार्थ (मटण, फिश,कोलंबी) वापरुन हे सुप ट्राय करतो.
एका चांगल्या रेसीपीची ओळख करुन दिल्या बद्दल धन्यवाद.
अवांतर :- या सुपची लज्जत आणि पौष्टीकता वाढवण्यासाठी टोफुचा उपयोग करता येइल काय ? आणि कसा?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

स्वाती२'s picture

15 Jan 2010 - 9:39 pm | स्वाती२

>>या सुपची लज्जत आणि पौष्टीकता वाढवण्यासाठी टोफुचा उपयोग करता येइल काय ? आणि कसा?
मी वापरते टोफू. एक्स्ट्रा फर्म टोफू पेपर नॅपकिन वर ड्रेन करुन घ्यायचा. सूप उकळायला लागले की चौकोनी तुकडे कापून टाकायचे.

प्रभो's picture

15 Jan 2010 - 9:47 pm | प्रभो

सुर्ररररररररररर

संपलं रे सुप गण्या....

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2010 - 10:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवा हा माणूस लिहितो काय, चित्र डकवतोय काय, सामान्य वाचकांना जळवतोय काय, हे या 'गणपा' नावाच्या माणसाला कळत नाही. त्यांना क्षमा कर.

-दिलीप बिरुटे

खादाड_बोका's picture

15 Jan 2010 - 11:53 pm | खादाड_बोका

पालकाची भाजी वापरता येईल का स्टॉक करिता ?? :?

मला तर स्वप्नातही भुक लागते....

गणपा's picture

16 Jan 2010 - 8:12 am | गणपा

पालकच सुप करताना पालक वापरला तर छान लागतो.एरव्ही बाकीच्या सुप साठी मी तरी पालक चा स्टॉक वापरला नाही.
तुम्ही जरुर वापरुन पाहा आणि कळवा कस झाल होत. :)

प्राजु's picture

16 Jan 2010 - 2:48 am | प्राजु

क्लास!
गणपा, तुझा पत्ता तेवढा कळव रे जरा.
रेसिपी एकदम सोपी करून सांगितली आहेस.
एक शंका : अंडे का वापरायचे? आणि ते हळू हळूच (थेंब थेंब)का घालायचे?
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

गणपा's picture

16 Jan 2010 - 8:03 am | गणपा

अंड टाकायच अस काही खास कारण नाही पण त्यामुळे एक प्रकारची घनता येते. चवीलाही छान लागत.
उकळी आलेल्या सुपमध्ये अंड ताकल्याने ते पटकन शिजते. थेंब थेंब टकल्याने त्याचा एकच मोठा गोळा न होता अंड व्यवस्थित सगळीकडे समप्रमाणात पसरते.

चतुरंग's picture

16 Jan 2010 - 3:14 am | चतुरंग

भल्याभल्या बल्लवाचार्यांच्या पाककौशल्याचं जिथे 'सूप वाजतं' तिथून आमच्या गणपाचं सूप सुरु होतं!! ;)

(सूप प्रेमी)चतुरंग

गणपा's picture

16 Jan 2010 - 7:58 am | गणपा

रंगाशेठ आपल्या प्रतिसादातुन नेहमीच नाविन्याची आणि 'चतुर'पणाची साक्ष पटते. :)

वेदनयन's picture

16 Jan 2010 - 3:29 am | वेदनयन

झक्कास!

पण एक किडा आहे - सॉर (आंबट) चव नक्कि कशाने येते?

गणपा's picture

16 Jan 2010 - 7:55 am | गणपा

सोयासॉसने थोडा आंबटपणा येतो. जास्त आंबटपणासाठी चमचा भर व्हिनेगर घातल तरी चालेल.

मीनल's picture

16 Jan 2010 - 3:55 am | मीनल

गरमा गरम सुप जेवणाच्या आधी तयार आहे.

चीनी लोक सूप जेवणानंतर पितात. गरम सूप नंतर प्यायल्याने जेवणातील तेलाचे चरबीत रूपांतर होण्याची क्रिया थंडावते.
आम्ही चीन मधे रेस्टॉरंट मधे गेलो की सांगत असू " शिन जान यांव थांग. इ हौ मिफान ये zhai." म्हणजे आत्ता सूप दे. नंतर भात आणि भाज्या.
उत्तर असायच " ख ई"
म्हणजे ओ.के.

मीनल.

गणपा's picture

16 Jan 2010 - 7:52 am | गणपा

अरे वाह मीनल नवीन माहीती आहे ही माझ्यासाठी.
धन्यु.

गणपा's picture

16 Jan 2010 - 8:14 am | गणपा

सर्व वाचक, प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार.

वाहीदा's picture

18 Jan 2010 - 5:25 pm | वाहीदा

गणपा..
आपण Catering Technology. & Applied Nutrition मध्ये काही कोर्स केला आहे का ? एवढ्या कलात्मकतेने कसे काय करू शकता ? मी ताज होटेल मध्ये Revenue Management (मराठी ??) साठी Software अभियांत्रीकी के चे काम करत असताना बहुतेक गोष्टी जवळून पाहील्या आहेत ... तुम्हारी खाना पेश करने की अदा होटेल ईंडस्टीज से काफी मिलती जुलती हैं ! :)

तिथली एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करण्या सारखी मला जाणवली... चव कशी ही असो जिस तरिके से ताज वाले प्लेट सजाते है और पेश करते है... भूक दो गुना बढ जाती है

तुम्हारे लजीज रेसीपी को देखकर एक ही लब्ज ओठोंसे निकलता है -- आफरीन !!आफरीन !! =D>