आहे की पुढील साहित्य मराठीत येऊ द्यात.
'आकाश गळण्या'चा नक्की अर्थ कळला नाही. पुढील जाणकार प्रतिसादावरून कळेलच.
विचारांनी झोप न लागण्याचा अनुभव मला नाही. त्यामुळे 'माईंड' ही कविता मी समजू शकत नाही.
'द स्काय' ही कविता हुकूमशाहीविरोधि वाटली. याच्या देखील प्रतिसादाच्या प्रतीक्षेत अहे.
शेख महंमदी स्वप्ने मात्र आवडली. मी पण येतो सूर्य स्पर्शायला.
तुम्ही इंग्रजीतही लिहिण्याचा सराव जरूर करा, जमल्यास उत्तमोत्तम इंग्रजी कविता वाचा. इंग्रजीत काव्यात्म भाषेची प्रगती वेगळ्या दिशेने झालेली आहे, त्यामुळे त्यातली वेगळ्या तर्हेची नजाकत वाचकांना आवडू लागली आहे. सरावाने तुमच्या कवितांत तितकेच कौशल्य दिसू लागेल यात शंका नाही. तुमच्या अनुदिनीवर इंग्रजी कविता लिहून येथे त्यांचा दुवा दिल्यास, आम्हाला तुमच्या काव्यलेखनाच्या प्रगतीकडे बघत राहाता येईल.
वरील कवितांतल्या भाषेत मराठी लकबींचा प्रभाव दिसतो. याच कवितांचे तुम्ही मराठीत पुनर्लेखन करावे, तुम्हाला उत्तम जमेल, असे वाटते.
शंका १ : वरील कवितांची शैली अशी आहे, की या बालकवितांच्या दिशेने झुकलेल्या वाटतात. हा तुमचा हेतू आहे काय? असल्यास ते मनात ठेवून पुन्हा वाचून बघीन.
शंका २ : शब्दांची तिहाई करणे ही तुमची खास आवड दिसते. माझ्या मते त्याने रसभंग होतो. तुम्हाला कळकळीने वाटत असेल की रसपोष होतो, तर पुन्हा वाचून बघीन...
And On… And On… And On…
Oh! My… My… My…
Why! Why! Why!
(इथे दोहराई, पण त्याच दिशेने जाते...)
Except Me And Me
फुग्याचा आदेश .......
पाऊस पडतो हो!
मी पण बुद्दू नाही बुबै साहेब.......
मराठीत लिहिण्यास प्रोत्साहन