Skip to main content

(शेवट)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 03/12/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा बेसनलाडू यांची सुंदर गझल शेवट भात मी असा हाती घ्यावा..खाता खाता ओघळ अन तेव्हाच गळावा..खाता खाता सोबत घेतो तूप वरण अन लिंबू मी ही असा रोज सहभोज घडावा..खाता खाता रोज असा हा पंगतीमध्ये बेत बनावा बोटांवरती स्वाद उरावा..खाता खाता एक घास ही पुढे मला खाता ना यावे अग्रह हा इतका न करावा..खाता खाता खूप वाढले अग्रह अन, भरपेट जेवलो मुखशुद्धीला विडा मिळावा..खाता खाता तृप जेवला "केश्या" आता पडतो क्षणभर डुलकीने या शेवट व्हावा..खाता खाता
लेखनविषय:

वाचने 2952
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

अगदी तृप्त करणारं वाफाळलेल्या गरम गरम वरणभातासारखं विडंबन! एकदम झक्कास! :) क्रान्ति अग्निसखा

मस्त अजून येऊ द्या...! -दिलीप बिरुटे

खूप वाढले अग्रह अन, भरपेट जेवलो मुखशुद्धीला विडा मिळावा..खाता खाता तृप जेवला "केश्या" आता पडतो क्षणभर डुलकीने या शेवट व्हावा..खाता खाता
ए केश्या सुंदर लिहिलं आहेस रे! :) (विडाप्रेमी) तात्या.

शेवट प्रेषक बेसनलाडू ( गुरू, 12/03/2009 - 11:41) . (शेवट) प्रेषक केशवसुमार ( गुरू, 12/03/2009 - 11:43) . मोजुन दोन मिनिटांत विडंबन....!!!! :O --------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

मंग गुर्जी हायत्याची पोचलेलं. हा आवांतर प्रतिसाद तर न्हवे :? याला म्हणतात विडंबन. मस्तच. -माझी खादाडी.

हा हा! मस्त रुचकर विडंबन :) ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

मस्त ! मजा आली :) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

गुर्जींचे फार दिवस्सा नि दर्शन..... निवांत डुलकी (नादावलेला खुळा)

मस्त लिव्हलेस "केश्या" आता गुंगतो क्षणभर या प्रतिसादाने शेवट व्हावा.. जाता जाता. आमचा उगाच प्रयत्न --टुकुल

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार