Skip to main content

पालक बूंदी रायता

लेखक श्रद्धा. यांनी मंगळवार, 01/12/2009 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : धुवुन बारीक चिरलेला पालक १ वाटी , सायीचे फ़ेटलेले दही १ वाटी, १/२ वाटी बुंदी(खारी) , जीरे पुड १ चमचा चवीप्रमाणे मीठ आणि साखर.. कृती : एका छोट्या बाउल मधे चिरलेला पालक घेउन त्यात फ़ेटलेले दही घालावे. बुंदी घालावी, जिरे पुड मीठ साखरपुड घालुन एकत्र करवे आणि खायला घ्यावे... हा पदार्थ जेवायला बसयाच्या थोडा वेळ आधीच तयार करावा नाहीतर बुंदी खुप मऊ होते.

वाचने 6053
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आमच्यकडे पालकाचीच बुंदी मिळते. त्यामुळे आम्ही तिच घालतो दह्यात. आणि वर साखर मीठ घातले की लगेच बुंदी रायता तयार. रंग पण छान दिसतो.

काळे मिठ किंवा चाटमसाला वापरावा. आप्ल्या दोन्ही रेसीपीज भरली वांगी आणि पालक रायता छान आहेत. याच पद्धतिने ईतर पालेभाज्याचा देखील रायता बनविता यीइल उदा.मेथी,मुळ्याची पाने, चाकवत,ई.

छान दिसतेय.. पण पालक कच्चाच घालायचा का? कि थोडी वाफवुन?

In reply to by गणपा

पालक कच्चाच वापरायचा...

छान ! --अवलिया

आताच जाउन पालकाची जुडी घेवुन आलेय. रायत्याची बुन्दी आहेच घरात. आजच करुन पहाते. (निगुतीने संसार करण्यात तरबेज =)) )चुचु

मस्त .. सू हा स...