ठेव

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
27 Nov 2009 - 8:23 pm

:) नमस्कार मंडळी. मध्यंतरी अगदी ध्यानी-मनी नसताना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं. त्या अवघ्या ७-८ मिनिटांच्या कालावधीत जे आणि जसं सुचलं, तसंच अगदी अक्षराचाही बदल न करता इथं मांडलंय.

काळोखाच्या गर्तेत मी भोवंडत होते जेव्हा,
खुले होत गेले तेव्हा अंतर्मनाचे झरोके

दृष्टीहीनतेचे होते काही मोजकेच क्षण
अनुभव विलक्षण, अंतःचक्षु उघडले

मनावेगळ्या मनात शांत, कृतज्ञसे भाव,
खोल अंधाराचा ठाव घेता वृत्ती प्रकाशल्या

काळोखाशी माझे नाते होते निमिषभराचे,
तुझ्या प्रकाशघराचे दार खुले जन्मासाठी

हळूहळू फाके तेज, आणि लोपला अंधार
जसा स्वयंभू गंधार मूर्तरूप दृष्टीपुढे !

तुझ्या दिव्य देणगीचे कळो आले मोठेपण
देवा, माझे खुजेपण फुका देई दोष तुला

हळुवार अलगद जपल्यास नेत्रज्योती,
तुझ्या प्रसादाचे मोती पापण्यांच्या शिंपल्यांत

माझ्यापाशी तुझी ठेव, तिची काळजी वाहीन
नेत्ररूपाने राहीन माझ्या माघारी इथेच!

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

27 Nov 2009 - 8:29 pm | मदनबाण

सुंदरच... :)
काळोखाशी माझे नाते होते निमिषभराचे,
तुझ्या प्रकाशघराचे दार खुले जन्मासाठी

व्वा.
तुझ्या दिव्य देणगीचे कळो आले मोठेपण
देवा, माझे खुजेपण फुका देई दोष तुला

क्लासच... :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

धनंजय's picture

27 Nov 2009 - 9:45 pm | धनंजय

शस्त्रक्रियेच्या वेळी सुचलेल्या ओळी खूपच अर्थपूर्ण आहेत.

jaypal's picture

27 Nov 2009 - 9:59 pm | jaypal

"दृष्टीहीनतेचे होते काही मोजकेच क्षण
अनुभव विलक्षण, अंतःचक्षु उघडले"
छान पैकी २०/२५ मिनीटं शांत पणे विपसना करुन मग ही प्रतीक्रिया.
धन्यवाद क्रंतीतै.

चन्द्रशेखर गोखले's picture

27 Nov 2009 - 10:31 pm | चन्द्रशेखर गोखले

अनमोल ठेव !

प्राजु's picture

28 Nov 2009 - 9:12 am | प्राजु

सुरेख!!

हळुवार अलगद जपल्यास नेत्रज्योती,
तुझ्या प्रसादाचे मोती पापण्यांच्या शिंपल्यांत

फार सुंदर!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/