हे तुम्ही कॅमेर्याने काढलेले चित्र आहे का? मस्त आहे.
तुम्हाला उल्कापात दिसला हे चांगले झाले. इथे तर ढगाळ वातावरणच होते आणि रात्री २/३ वाजता पाहणे बहुधा जमलेही नसते. :(
असो. पण ह्या निमित्ताने बहुधा ९८ मध्ये पाहिलेला उल्का वर्षाव आठवला. खरोखरच वर्षावच होता तो. एका मागोमाग एक भरपूर उल्का पडताना दिसत होत्या आणि त्यांचा प्रकाशही चांगलाच होता. :)
हे तुम्ही कॅमेर्याने काढलेले चित्र आहे का? मस्त आहे.
माझ्या छायाचित्रकलेबद्दल तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद. हे मीच काढलेले छायाचित्र आहे. पण क्यामेर्याने नव्हे (जळला तो शब्द कसा टाइप करायचा?) नव्हे, तर माऊसने. गूगल झिंदाबाद!
अरे वा! पहायला गेलात हे उत्तम! अर्थात अश्या गोष्टी ग्रुप मध्ये करण्यात खरच खुप मजा असते. मी इथल्य थंडीत सुमारे एक तास कुडकुडलो पण दोन उल्कांचे दर्शन झाल्याने मात्र 'पावलं' असं झालं आणि मग झोपी गेलो!
मोडक म्हणतात त्याप्रमाणे इतर विनोद, अर्थात अश्या गोष्टी आठवुन लिहिणे फारसे गमतीशीर नसले तरी, किस्से ऐकायला आवडतील.
मोडक म्हणतात त्याप्रमाणे इतर विनोद, अर्थात अश्या गोष्टी आठवुन लिहिणे फारसे गमतीशीर नसले तरी, किस्से ऐकायला आवडतील.
नक्की नक्की. पण इथे चव्हाट्यावर नाही लिहिता येणार. खव/पोहा मध्ये भेटू.
१९९८ च्या जानेवारीमध्ये एका मित्राला घेऊन खानापूरला गेल्याचे आठवते.... ( ९७ नोव्हेंबरमध्ये सिंह राशीतून प्रचंड उल्कावर्षाव झाल्याचे ऐकले होते, बघूया तरी, अशी खूप उत्सुकता होती.)
तिकडे जत्राच होती..
स्लाईड शो, दुर्बिणीतून ग्रह बिह दर्शन, आणि भाषणे, डबेबिबे खाऊन नंतर आडवे पडून उल्का पाहण्याचा कार्यक्रम...
...
तशा रोज जितक्या दिसत असतील तितक्याच दिसल्या ....
उगीच कुठल्या तारकासमूहातून उल्का पडल्याचे भासले इ.इ.नोंद वगैरे ठेवण्याचे भंपक काम करत काही जण खूप उत्साहात करत होते...
मला चांगली डुलकी लागली... ( आठवा शाम मनोहरांची कादंबरी, उत्सुकतेने मी झोपलो")
सगळे जण काहीबाही डायलॉग मारून एकामेकांची करमणूक करत होते... मित्र कोणत्यातरी मुलींच्या ग्रुपमध्ये शिरकाव करत उगीच लाफ्टर काढत होता, असे मध्येच जाग आली तेव्हा कळाले....
परत येताना मित्राची प्रतिक्रिया... मजा आली...उल्काबिल्का जाउदे, आडवं पडून इतक्या मुलींशी एवढ्या गप्पा यापूर्वी कधी मारल्या नव्हत्या....
आता पुढचा उल्कावर्षाव कधी आहे?"
=)) =))
तिथं तुम्ही एक काना जास्तीचा वाचताय का? :D
असो,
अनुभवकथन छान लिहिलंय, पण अंमळ मजा आली असती जर तिथे चाललेल्या 'इनोदांचं'ही वर्णन केलं असतं :)
@भडकमकर मास्तरः
तुमच्या मित्राला आमचा साष्टांग पोहोचवा हो! ('तो' मित्र म्हणजे आपले दाढे डागदर तर नव्हेत ना? ;) )
प्रतिक्रिया
वा...
...
वाचायचं
अरे वा!
मोडक
१९९८ च्या
हा हा हा!!
पते की बात
?
अहो साहेब...
गुरुजी ..............
तुमच्या
बाकी अभिदा