पेस्ट कंट्रोल करून घ्या. मागे एकदा बेड बगच्या त्रासाने बरीच जागरणे झाली होते. नको त्या आठवणी...
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
शेराचं झाड (युफोर्बिया टिरुकाली म्हणजे इंडियन ट्री स्पर्ज) म्हणजे चिलटं आकर्षित करून घेणारं मॅग्नेट आहे. त्याची लहान फांदी लटकवून ठेवा स्वयंपाकघराच्या कोपर्यात. चिलटं बसलेली फांदी संध्याकाळी बाहेर नेऊन झटकून परत लावता येते, आठवडाभर एक फांदी टिकते.
अमेरिकेत ही झाडे कॅलिफोर्निया व फ्लॉरिडा या राज्यांत खूप सहज आढळतात. इतर ठिकाणी नर्सरीज मध्ये मिळण्याचीही शक्यता आहे. मला या ठिकाणी हे झाड उपलब्ध आहे असं आढळलं.
माझ्या भारतातील शेराच्या माहितीप्रमाणे ही अमेरिकेतील झाडेही वागावीत, आणि आपल्याला मदत व्हावी हि सदिच्छा!
बहुगुणींनी दिलेली माहीती फारच उपयोगी!
मला वाटतं भारतात गव्हाच्या की बाजरीच्या कणसांच्या काळात पुष्कळ चिलटे होतात (दिवाळी पुर्वी). तसेच इतर किटकही खुप प्रमाणात होतात. यावरुन माझ्या मनात एक विचार आला तो असा, कदाचीत दिवाळीत फटाके ऊडवण्याच्या उगम या कीटकांना पळविणे हा असावा.
बाय द वे, चिलटं म्हणजे फ्रूट फ्लाईज (Drosophila melanogaster) च्या शरीरात "painless" नावाचं gene असतं, ज्याच्या कार्यामुळे isothiocyanate या रासायनिक द्रव्याची प्रतिक्रिया म्हणून चिलटं दूर पळतात, हेच द्रव्य वासाबी या जपानी खाद्य पदार्थात आढळतं, म्हणून थोडं वासाबी उघडून ठेवलं तरी चिलटं दूर पळतील. हॉर्सरॅडिश या मुळ्यापासून वासाबी करतात, तो मुळाही कापून ठेवता येईल असं वाटतं. हा farmers' market मध्ये मिळतो.
पॅराडाइस फ्लाय कॅचर (स्वर्गीय नर्तक) हा केवळ माश्या , चिलटं, व इतर कीडे खाउन जगतो. जमल्यास ह्याला पाळा
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
येऊ देत हो चिलटं! तीही बिचारी पोटाच्या मागे असतात..
त्या बापड्या चिलटांमुळे असं तुमचं काय मोठं बिघडणार आहे हो? फार फार तर ज्या पदार्थांवर ती बसतात ते पदार्थ झाकून ठेवा ना! म्हणजे प्रश्न मिटला!
तुकोबा म्हणतात,
मुंगी म्हणे माझे घर, पाल म्हणे माझे घर!
अहो तुम्ही मारे दमड्या खर्चून आलीशान घरं घेता, पण त्यावर मालकी तुमची आहे हे बापड्या त्या मुंग्याचिलटांना कुठे ठाऊक आहे? येणारच ती! :)
तात्या.
हेच म्हणतो.
येऊ देत हो चिलटं! तीही बिचारी पोटाच्या मागे असतात..
फक्त तुमच्या घरात आल्यावर 'माज करायचा नाही' अशी सूचना द्या त्यांना. नाहीतर लागतील लगेच् चिलटपूजा वगैरे करायला!
बरोबर ना तात्या? ;)
आम्ही कधी कधी हातमोजे पण वापरतो
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
खुलाशाबद्दल धन्यवाद!
भयानक गब्रु
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
सन्ध्याकाळी घरात धुप / कापुर लावल्याने बरेच असले त्रास कमि होउन वातावरण प्रसन्न रहाते. मी रोज चामुन्डेश्वरी धुप जाळते.
भारतात १ पॅकेट रु १८ ला मिळते. दुबैत अल आदिल मधे हेच दिराम. ३.५० ला म्हणजे रु ४४ :( .त्यात २४ तुकडे असतात त्याना मी हाताने तोडुन अर्धे करते त्यामुळे ४८ दिवस पुरतात. ह्या तुकडा जळताना वर २ कापराच्या वड्या थेवते. मस्त कापराचा सुगन्ध दरवळतो.
(निगुतीने संसार करणारी ) चुचु
चुचु तै च्या सल्ल्या बरोबर अविनाश कुलकर्णिंच्या सल्ल्यानुसार "चिलट मुक्ती मंत्र १०८ वेळा जपावा. दोन्ही डोळे मिटुन , घरातील सर्व चिल्टं गायब झाली आहेत असा विचार(किंवा आव) मनात आणावा. चित्त कायम प्रसन्न असु द्यावं.(सल्ला पटला नाही तरी)
या नंतर केळ्याची साल घरातील सर्व कोप-यां मधुन फिरवावी आणि आग्नेय नैॠत्य दिशांच्या बरोबर मधे नेम धरुन टाकावी. खात्रीने सांगतो आपले काम होउन जाईल.
(चुचुतै अपण कोदेश्वरी मराठी तर नाही ना वापरत? कारण "ह्या तुकडा जळताना वर २ कापराच्या वड्या थेवते." ठेवते म्हणायचे आहे काय? )
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
असाच एक उपाय आहे. चेहेर्याला भरपूर कोल्ड क्रीम/ ग्लीसरीन्/ गोडे तेल फासा. डोळे मिटून बसा थोड्यावेळाने डोळे उघडा . चिलटे आपोआप कमी झालेली दिसतील. त्यावेळेस चेहेरा धुवून टाका. चिलटे बेसीन मधून धूवून टाका
एक कोळी पाळा.त्याची घरात ठिकठिकाणी जाळी होउ द्यात. त्या जाळ्यात चिलटे अडकतील व नंतर तो कोळी तो खाइल. मी असे डास अडकलेले कोळ्याने त्यांना खाद्य बनवलेले पाहिले आहे. पलंगाच्या रॉडला कोळ्याचे जाळे ही उत्तम मच्छरदाणी असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
एकेकाचे सल्ले भारी आहेत...
तरी नशिब चिल्टं डासांसारखी चावत नाहीत ते !!!
(व्ह्यारस प्रमाणे पसरणार्या मनुष्य प्राण्या बद्धल इतर प्राणी काय विचार करत असावेत ? :? )
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
आगागागागायायायायाया
कित्ती कित्ती जालीम उपाय सुचवलेत लोकांनी.
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
एक काम करा हे सगळे उपाय मोठ मोठ्याने त्या चिलटांना वाचुन दाखवा ती नक्की म्हणतील.
"घर नको पण उपाय आवरा"
F.B.I.
C.I.A.
N.S.A.
ह्यांना संपर्क केलात का?
९११ ला तर्री दूरध्वनी करा हो!
अगदीच त्रास होत असेल तर्र 'हिमेश रेशमियां' ह्यांचे कोणतेही गाणे घरी लावून ठेवा.. अगदी रामबाण उपाय आहे हो!!
-
कोकणी फणस
रे पर्या आता भाईकाकांच्या बालपणीचा जमाना राहिला नाही रे कि जेव्हा शेजार्याचा पोपट आवडला नाही अश्या शुल्लक कारणावरुन घर (चाळ) बदलता येत असे.
बर तरी बर त्यांनी शेजार्याच्या पोपटा मुळे घर बदललं इथे तर चिलटं आहेत..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
"बर तरी बर त्यांनी शेजार्याच्या पोपटा मुळे घर बदललं"
कलीयुग रे गणा कलीयुग.
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
सध्या घरात फार चिल्टं झाली आहेत.>>
चिलटे म्हणायचे होते का ?
काही लोकं ह्याला केम्र असे देखील म्हणतात.>>
काही लोक. म्हणचे कोण ..पुरोगामी की विचारवंत...प्रतिगामी की राडेबाज ..निवासी की अनिवासी..संपादक की कंपुबाज....
आकाराने एकदम छोट्या असलेल्या माश्या असे वर्णन करता येईल. फळे /भाज्या काहीही चिरले की लगेच त्यावर बसतात.>>>
अरे वा !! म्हणजेच तुम्ही घरात स्वयंपाक बनविता बा !!! वा वा मग सानिकाताई एखादी झकास पाकृ टाका ना !! आणी आम्ही त्यावर बसलेल्या माशांवर रिसर्च करत बसु ..
कोणी सांगू शकेल का की ह्या त्रासातून कशी सुटका मिळेल.>>>
सोप्प आहे !! कापुर जाळा !!
सध्या वास्तव्य अमेरिकेत आहे.>>
वा वा !! छान छान !! अमेरिकेत कापुर मिळतो की नाही माहीत नाही..
त्यामुळे अमेरिकेत करता येईल असा उपाय सुचवावा.>>
वर सांगीतला आहेच....
हॅ हॅ हॅ असो !! जोक्स अपार्ट (आता वरती जोक्स नाहीत हा भाग अलहिदा..)
सानिका ताई ...तुम्ही आम्हाला (आय.टी.वाल्यांला)
कॉन्ट्रॅक्ट द्या ..कारण आम्ही (आय.टी.)वाले माश्याच मारतो...सर्वात पहिले आम्ही आमची एक टिम मिटींग घेऊ..त्यात आपल्या सर्व बाबी लक्षात घेऊ ..मग त्या प्रोजेक्ट लिडला देऊ ..मग सेल्स टिम तुम्हाला भेटेल..अर्थातच पैशाच ठरविण्यासाठी ...मग पुर्ण आराखडा बनवु..मग तो आम्ही क्वालिटी लिडला देऊ...त्याच्याकडुन मंजुरी घेण्यासाठी तो आराखडा आधी तुम्हाला दाखवुन देण्यात येईल्...त्यात तुमच्यापेक्षा आमच्याच अपेक्षा जास्त असतील ....मग मंजुरी आल्यानंतर आम्ही तो ट्रान्झिशिन लिडला देउ..मग ते आपल्याला भेट देतील अर्थातच पुन्हा पैशाच ठरविण्यासाठी.....मग आमच्यातील काही जण तिथे येऊन आपल्या माश्यांच्या अभ्यास करेल...त्यांना नेमके काय हवे आहे...त्या ईथेच का येतात ..चिरलेल्या भांज्यावरच का बसतात...वगैरैचा पुर्ण अभ्यास केला जाईल ..नंतर ते पाजळलेले ज्ञान घेउन आम्ही ईकडे परतु ..मग पुन्हा आपल्या माश्यांचा ईतरेजणांबरोबर अभ्यास सुरु होईल...त्याला काही सामान्य माणसे के.टी. असही म्हणतात ...ते झाल्यावर ..खरोखरच्या माश्या मारायला सुरु करु..पण त्या आधी ...आपण आपल्या माश्या कुठे आहेत कश्या आहेत हे सांगायला हवे ..त्याकरिता आम्ही एक टुल बनवु .....त्याला अतिसामान्य माणसे ..टिकेटिंग टुल म्हणतात...अर्थातच खर्च तुमचाच..मग आम्हाला जसे जसे कळेल तसे तसे आम्ही आपल्या माश्या मारायला सुरु करु ..अर्थातच आम्हाला साधारण ह्या प्रक्रियेला सहा महिने लागतील आणी सर्व खर्च तुमचा....पहा कसे ते...
त्यापेक्षा राव कापुर जाळा की !!!
सू हा स...
प्रतिक्रिया
काउंटरटॉप
+१
पेस्ट कंट्रोल
शेराची फांदी लावा
उपयोगी माहिती!
माय गॉड हा त्रास तिकडे पण होतो?
वासाबी
चायनिज
पयल्यांदा
_____________________________
बर झाल
हा घरी पाळा
येऊ देत हो
+१
आवांतराबद
घरात एक
माहिती आणि
चिलट
कोणाला????
अर्धवट
मोजे
मोजे
मोजे
कुठे
आम्ही कधी
बुट
बुट
खुलाशाबद्
सन्ध्याका
निगुतीने संसार करणारी चुचु!
या बरोबरच...........
चु चु ताई
एक कागद घ्या....
असाच एक
एक आयडिया
नाव
जालिंदर
एकेकाचे
आगागागागा
संपर्क
घर
रे पर्या
गणपा धन्य आहेस रे!!!
गणपा भाउ...
परा!!
सध्या घरात
>>सोप्प आहे