गेले चार सहा दिवस मलईदार खाती हा शब्द फार वाचनात आला.
कित्येक पत्रकारांनी न बनलेल्या सरकारवर आणि राजकारणावर तोंडसुख घेतले...
दिल्ली मुंबई वार्या करत करत चर्चेच्या फेर्यांवर फेर्या आटोपत मलईदार खात्यांसाठी कष्ट करणार्या आपल्या नेत्यांबद्दल मला पूर्ण आदर आहे.....
फक्त मलईदार खाती कोणती आणि मंत्र्यालाच मलई चाखायला का मिळते??काही विशिष्ट खात्याच्या मंत्र्यांनाच जास्त मलई चाखायला का मिळते?
आणि मलई नसलेली दुर्लक्षित खाती कोणती, याबद्दल मला जी उत्सुकता वाटते त्या उत्सुकतेचे शमन मिपावरील ज्ञानी माणसांनी चर्चा करून करावे , म्हणून हा धागा......
शिवाय काही ऑप्शनचे प्रश्नही विचारात घेता येतील.... नवीन आमदार जो यावेळी मंत्री व्हायला इच्छुक आहे, त्याचा पत्ता कट झाला आणि तो बिचारा केवळ आमदारच राहिला तर तो कुठे कुठे मलई शोधतो?
__________________________________
आता वरच्या प्रश्नावर लिहिलेली उत्तरे..
मलईदार खाती
अर्थ, गृह, महसूल , बांधकाम, पाटबंधारे
बिनामलईची खाती
समाजकल्याण, आरोग्य , कुटुंबकल्याण
( खरंतर बिनामलईची खाती सुचत नाहीत. ....सगळीकडे सोय असावीच / असायलाच पाहिजे असे वाटते.)
_______________________________________
हा चर्चाप्रस्ताव म्हणजे भ्रष्टाचाराचे उदात्तीकरण आणि लोकशाहीचे अवमूल्यन आहे असे कोणाला वाटल्यास तसेही लिहावे ....
किंवा काँग्रेसवाल्यांमुळे देशात भ्रष्टाचार बोकाळलाय / युतीने ९५ ते ९९ काय केलंय सार्यांना माहितीय , असे आरोप केल्याशिवाय मजा नाही...
चर्चा अर्थात राजकारणावर असल्याने प्रत्येकाने आपण स्वतः सर्वज्ञ आहोत असे मानूनच प्रतिसाद लिहावा अशी विनंती.....
वाचने
5393
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
मास्तर !
मलईच्या
ही
शेती खात्यात खास मलई मिळत नसावी...
In reply to ही by चिरोटा
मलई
नगरविकास