रेडियो विषयी माहिती हवी
शॉर्टवेव्ह रेडियो विषयी कुणाला माहिती आहे का?
कोणता घेणे चांगले राहील?
का?
आकाशवाणीचे कार्यक्रम त्यावर जगभर ऐकता येतील ही भाबडी आशा आहे.
या शिवाय आंतरजालावर आकाशवाणीचे कार्यक्रम कुठे ऐकता येतील?
काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे.