Skip to main content

प्रतिक्रिया

संध्याकाळचा पेग ..

लेखक चामुंडराय यांनी बुधवार, 28/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचा पेग .. जगातली सर्वोत्तम सुखे अगदी स्वस्तात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच ( हा 'कोणीतरी' कोण म्हणून काय पुसता कीबोर्ड वर बोटे आपटूनी? मीच की तो !). तर स्वस्त मिळणाऱ्या सुखांपैकी "संध्याकाळचा पेग" ही गोष्ट मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. मस्त संध्याकाळ असावी. सूर्य क्षितिजाकडे झेपावत असावा. किंबहुना नुकताच क्षितिजा पल्याड गेलेला असेल तर अति उत्तम. हुरहूर लावणारी सांज असावी. पोट हलके असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत जाण्यास उत्सुक असावे. हलकेच एक लार्ज पतियाळा भरावा आणि सोबतीला चखना असावा. अहाहा .... फक्त अर्धा पाऊण तास!...

द सियालकोट सागा

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 20/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
असतो मा सद्‌गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम् गमय बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28 म्हणजेच मला असत्याकडून सत्याकडे ने अंधाराकडून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमरत्वाकडे ने अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात.

सेक्रेड गेम्स २

लेखक किसन शिंदे यांनी रविवार, 18/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल. या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले. 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारले'?

चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार - स्पॉईलर अलर्ट

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 16/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
हा चित्रपट बघताना मला ३ इडियट, चक दे इंडिया आणि इंग्लीश चित्रपट “मिॅरकल” या प्रेरणादायी चित्रपटाची आठवण होते. “मिॅरकल” हा अमेरिकन आईस हॉकी वर आधारित एक सुंदर चित्रपट आहे. एकंदर कथा चांगली आहे. “सुपर ३०” चित्रपटाची कथा सरळ साधी आणि सोपी आहे "शिक्षण सम्राट आणि जाती व्यवस्था विरुद्ध लढाई". पहिला भाग उत्तम झाला आहे. शिक्षणाचा बाजार हा आत्ता पर्यंत बऱ्याच चित्रपटा मध्ये दाखवण्यात आला आहे. भारतातील शिक्षणाचे तीन तेरा कसे वाजले आहेत हे छान रित्या चित्रण करण्यात आले आहे.

कुत्रत्वाचे नाते (?) नाण्याची दुसरी बाजू

लेखक बाप्पू यांनी शनिवार, 13/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इमानी आहे, प्रेमळ आहे, अमुक करतो, तमुक करतो इ इ आपण https://www.misalpav.com/node/44832 या आणि अश्या अनेक धाग्यावर आणि प्रतिक्रियांमध्ये वाचलेच असेल.. पण ज्या न्यायाने प्रत्येक माणूस एकसारखा नसतो त्याच्या न्यायाने प्रत्येक इतर प्राणी देखील एकसारखा नसतो. उदा. काही बैल आपल्या मालकाशी प्रेमाने वागतात तर काही बैल समोर येईल त्याला डोक्यावर घेतात. मग तो मालक असो वा आणखी कोणी.. मग कुत्रा देखील याला अपवाद कसा असेल??

कुत्रत्वाचं नातं

लेखक इरामयी यांनी शुक्रवार, 12/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
काही समस्या या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादाला एक संतापयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे. प्रतिसाद लिहिणाऱ्यांचा (श्री. बाप्पू) राग मला समजू शकतो आणि त्यांचं मत चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही.

मुखवट्यांमागचे चेहरे- डायना आणि चार्ल्स

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 14/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
डायना जेव्हा तिच्या प्रियकरासोबत (दोडी अल फयाद) कार अपघातात वारली, तेव्हा तिच्याबद्दल साऱ्या जगभरात हळहळ व्यक्त झाली होती. एका करारी बेधडक राजस्नुषेचा मृत्यू चटका लावणारा होता. विचार करा, जिच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता अशी ख्याती असलेल्या इंग्लडच्या राणीची सून होणं किती कठीण गोष्ट असेल. राजघरण्याची प्रतिष्ठा सांभाळणं आणि ते टिकवण्यासाठी कित्येक मुखवटे राजघराण्यातील व्यक्तींना चढवावे लागतात.

96 - प्रेमाचा धवलगिरी

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 08/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ. शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’. शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो.

शिवजयंती

लेखक मकरंद घोडके यांनी बुधवार, 06/03/2019 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी निघाली..चायनीज ची दुकाने आणि त्याच्या बाजूला मंडई त्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याने आणि फळांनी बहरलेला माहोल.तिथेच बाजूला एक पूजा साहित्याचं दुकान आणि त्यात सिजनल वस्तूंची रेलचेल. समोर सिग्नल आणि प्रचंड गर्दी! १९ फेब्रुवारी.आज शिवजयंती. महाराजांना दोन क्षण घट्ट डोळे मिटून आठवून पाहिलं.मग ते चौथीच्या पुस्तकात घोड्यावर बसून मोहिमांना जाताना दिसले,काय ते रूप काय ते तेज अगदी अवर्णनीयच! सगळा इतिहासच प्रेरणादायक तो. पिप sssssss पिप ssssss एकदम वर्तमानातच आदळलो! डोळ्यातून ते तेज हटेना!! पण समोरचं चित्रही पाहवेना- हे चायनीज गाडीवाले का बरं फोफावले असतील?

कादर खानः कलाकार नंबरी, लेखक दस नंबरी!

लेखक फारएन्ड यांनी गुरुवार, 03/01/2019 या दिवशी प्रकाशित केले.
हा माणूस गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या रूपांत आपल्याला भेटत होता. "बाप नंबरी बेटा दस नंबरी" तर आम्ही केवळ याच्या आणि शक्ती कपूरच्या केमिस्ट्रीकरता पाहिला होता. त्यातले ते फ्रॉड वाले २-३ सीन्स अत्यंत धमाल आहेत. माझे ऑल टाइम स्ट्रेसबस्टर्स! गोट्या पोट्या मॅनपॉवर एजन्सी नट बोल्ट सोडा बॉटल ओपनरवाला जाली नोट छापनेकी मशीन हे तिन्ही सीन्स मी असंख्य वेळा पाहिले आहेत.