Skip to main content

लेख

शेंगोळी

लेखक बबु यांनी गुरुवार, 02/04/2020 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
लॉक आऊटच्या दिवसात भाजीपाल्याची कमतरता असताना काय करायचे हा गृहिणींना पडणारा एक यक्षप्रश्न. आमच्या सौने आज हुलग्याची शेंगोळी करून तिच्या नियोजन कौशल्याची पावती दिली. शेंगोळी, बाजरीची भाकरी, पापड, कांदा, लसणाची चटणी हा मेनू म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलेल्या चाकरमान्यांसाठी मेजवानीच असते. माझ्या लहानपणी ऐन उन्हाळ्यात बैलजोडीने नांगरट केली जायची, त्या दिवसांची आठवण येते. रहरखत्या उन्हात राबणाऱ्या घरधन्यासाठी कारभारीण जी न्याहारी घेऊन जायची त्यात शेंगोळी आवर्जून असत. प्रथिनांचा पुरवठा करणारे मोड आलेले हुलगे, मठ यांचाही समावेश जेवणात असे.

खऱ्या आनंदाचा साक्षात्कार

लेखक chittmanthan.OOO यांनी गुरुवार, 02/04/2020 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
भिडूलोक आपल्या प्रत्येकामध्ये एक भटक्या, एक जंगली दडलेला असतो ज्याची स्वतःची एक बकेट लिस्ट असते. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी स्वतःच अस्तित्व विसरावे असा एक तरी प्रवास करावा असं वाटतं असत. पण सांगू का आपली पहुंच खूप छोटी आहे...हो हो नक्कीच..तुम्ही जर "जिंदगी ना मिलेगी दोबारा" बघितला असेल तर एक दोन जागा परदेशातल्या असतील.तरीही जिथं तुमचं स्वप्न पूर्ण होत तिथं अलेक्झांडर सुपरट्राम्प चा संघर्ष चालू होतो( हे वाक्य अनन्या पांडे च चोरून मारलेल आहे तर तेवढं समजून घ्या.). तुम्ही म्हणाल हा अलेक्झांडर कोण? हा असा विचित्र माणूस आहे ज्याला पैसा, सत्ता सब कुछ मोहमाया वाटते.

कोरोना आणि माणूस

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/04/2020 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे डिसेंबर 2019 मध्ये कोरोना चीनच्या वुहान शहरात पसरला. चीन मधून तो इतरत्र पसरणार नाही असा अनेकांचा समज होता. आज संपूर्ण जगात कोरोनाच्या दहशतीने युध्दजन्य परिस्थिती आहे. ‘हा विषाणू म्हणजे मानवाने तयार केलेला जैविक बाँब असून तो माणसावरच बुमॅरंग सारखा उलटला’ असं बोललं जात होतं. चीन मधून कोरोनाचं उच्चाटन होताच चीनने हाच आरोप इतर देशांवर केला. कोरोना हा जैविक बाँब की नैसर्गिक विषाणू हा प्रश्न आज अनुत्तरीत असला तरी, हे जैविक संकरीत हत्यार असल्याची साशंकता काही शास्त्रज्ञांना वाटत आली. मार्च 2020 च्या सुरूवातीला कोरोना भारतात दिसू लागला. आधी तुरळक.

कर्फ्यू , कॉफी आणि बरंच काही......

लेखक सरनौबत यांनी मंगळवार, 31/03/2020 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
कर्फ्यू, कॉफी आणि बरंच काही...... २२ मार्चला मोदीजींनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला. फक्त एक दिवस देखील बाहेर न पडता घरीच राहायचे ही कल्पना अनेकांना अशक्य वाटू लागली. ह्या एका दिवसात घरी पासून काय करत येईल ह्याचे मेसेजेस यायला लागले. हा शिंचा कोरोना लवकर आटोक्यात येणार नाही असे दिसताच '"न भूतो न भविष्यती" असा चक्क २१ दिवसांचा लॉकडाऊन २५ मार्चपासून भारतभर जाहीर झाला. समर्थांच्या "जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे, सकळ जन" उक्तीनुसार लोकांनी व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड करण्याचा धडाका लावला.

बिन चेहेऱ्याचा शत्रू - स्पॅनिश फ्ल्यू- १९१८

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 30/03/2020 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
बिन चेहेऱ्याचा शत्रू - स्पॅनिश फ्ल्यू- १९१८ Simple, Free Image and File Hosting at MediaFire सप्टे१९१८, पहिलं महायुद्ध अजूनही चालूच आहे. जर्मनीची शेवटची निकराची लढाई-‘कैसरश्लाख्त’ फसली आहे आणि आता दोस्त सैन्य विशेषत: नव्या दमाचे अमेरिकन सैन्य निर्णायक विजयाकडे हळू हळू पण निश्चित वाटचाल करत आहेत.

जब I met मी :-2

लेखक Cuty यांनी रविवार, 29/03/2020 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहान होते तेव्हाची गोष्ट. पाचसहा वर्षांची असेन. आम्ही एका ओळखीच्या काकूकडे गेलो होतो. आई सांगत होती, "आमची दिदी किनई खूप शहाणी आहे. कुठेही गेलो तरी आईजवळ एकाच जागी गप्प मांडी घालून बसते. कसला गडबडगोंधळ नाही." मी वर पाहिले, आई माझ्याकडे एकटक पाहत होती. मी कसंनुसं हसले आणि मांडी सावरून बसले. बाहेर हाॅलमध्ये दादू काकूच्या मुलांसोबत नुसता धुडगूस घालत होता. त्यांची खेळणी कशीही फेकत होता. मी त्याला बोलणार होते नीट खेळायला, पण आई रागावली असती, म्हणून गप्प बसले. आई हसत म्हणाली, "फारच द्वाड झालाय! मला तर बाई आवरतच नाही." आता काकू कसंनुसं हसल्या.

जब I met मी

लेखक Cuty यांनी शुक्रवार, 27/03/2020 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नापूर्वीची मी एक हुशार, मनमिळाऊ आणि थोडीशी टाॅमबाॅईश अशी मुलगी. शाळेत नेहमी चांगले मार्क्स. घरातून भरपूर प्रोत्साहन असल्याने वेगवेगळ्या स्पर्धा, परिक्षा,खेळ यात सहभाग असायचा. आईवडिल मला व्यवहारज्ञान यावे म्हणून बरीचशी कामे सांगायचे. उदा. बँकेत जाऊन लाईटबिल भरणे, पैसे भरणे-काढणे, एखाद्या परिक्षेचा फाॅर्म भरणे, पोस्टाची कामे इ. मला लागतील त्या वस्तू बहुदा मीच खरेदी करायचे. माझे अरेंज मॅरेज झाले. लग्नाची माझी खरेदी बहिणींसोबत मीच केली होती. सासरी आल्यानंतर नवी नवरी म्हणून कौतुक व्हायचे. घरातील सर्व बायका अवतीभवती असायच्या, हवंनको ते बघायच्या.

चला माणसाप्रमाणे वागूया !

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 24/03/2020 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय आणि प्रिय रसिक वाचक , *सप्रे* म नमस्कार ! आपण सगळ्यांनी / काहींनी माझे लेख , कविता , स्केचेस , पेंटिंग्ज , अभिनयाच्या व गाण्याच्या clips , गझल्स , पुस्तक वाचलं असेल.पण आज मी एक वेगळ्याच विषयावर हा लेख लिहितो आहे. गेले काहि आठवडे जगभरामधे आणि आपला भारत पण जगाचाच एक भाग असलेल्या आपल्या देशात — कोरोना विषाणूमुळे भयंकर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे.

ईमायनं आल्याती का..?

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 24/03/2020 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुज्य सकाळी कामे आवरून नित्यनेमाने शिरस्ता बाहेर पडलो. आजकालच्या जमान्यात पत्रकारांना काडीची म्हणून किंमत राहिली नाही. पण जिवनावश्यक, अत्यावश्यक, चौथा स्तंभ वगैरे संबोधून नमोजींनी आम्हांला अशा स्मशानवैराग्याच्या दिवसांत पण बाहेर जाण्यास भाग पाडीले. मौजे बाभुळगाव येथील 'जनता कर्फ्यू' नामक ऐतिहासिक दिनाचे वार्तांकन करण्यासाठी आम्ही सायकलवर टांग टाकली. आखिरकार दोन डोंगर उतरून, पायवाटेने प्रसंगी सायकल उचलून आम्ही त्या दिडदमडीच्या गावात पोहोचलो. उन्हातान्हात रापून तहान लागली होती. सर्वत्र सामसूम होती. या आडवळणाच्या गावात होटेल नावाचे काही असावे का, याचा काही तपास लागला नाही.

आठवणीतील याहू चॅट रूम्स

लेखक पर्ण यांनी सोमवार, 23/03/2020 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
याहू मेसेंजर वरील मराठी चॅट रूम्स उदय १९९८ साली झाला... त्याकाळातील एकमेव इन्स्टंट चॅट मेसेंजर क्लाईंट म्हणजे याहू (तसं रेडिफमेल, हॉटमेल सुद्धा होते पण याहू एवढी प्रसिद्धी नव्हती)... शिवाय त्यांत आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या रूम्स, कम्युनिटीप्रमाणे लोकल चॅट रूम्स असायच्या... मी सुद्धा त्यावेळी याहूच्या मराठी चॅट रूममध्यें चॅट करायचे...सुरुवातीला फार अप्रूप वाटायचे..मस्त मजा- मस्ती , गप्पा-टप्पा, ज्ञानाची देवाण-घेवाण (knowledge sharing), त्यातल्या त्यात भांडणे रुसवे- फुगवे आणि मग एकमेकांच्या समजुती असे अनेक प्रकार चालायचे.... तर याचीच काही निगेटिव्ह बाजू पण होती...