Skip to main content

लेख

बोहेमिअन रॅप्सडी

लेखक स्टार्क यांनी मंगळवार, 09/06/2020 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
'ती आली, त्यांनी पाहिलं आणि ते हसले' फॉल सेमिस्टरपासून सुरू झालेल्या आमच्या फिलॉसॉफी क्लासचं हे एका वाक्यातलं वर्णन! एव्हाना रंगीबेरंगी फॉल सीझन संपून पांढर्‍याफटक हिवाळ्याने माझ्या शहराला - इथकाला आणि आमच्या युनिवर्सिटीला कह्यात घेतले होते. जणू शरदाचे सप्तरंग शिशिराने अलगद आपल्या पांढर्‍या बर्फात गोठून ठेवावेत आणि मग मन भरले की ते वसंताच्या हवाली करून निघून जावे. मला नेहमी वाटे....आमच्या ईथकातला शरद ऋतू म्हणजे अगदी एखाद्या मुरलेल्या चित्रकारासाराखा... सुबक आकारांमध्ये मोजून मापून रंग भरणारा....आणि रंगांच्या छटा एवढ्या अगणित की बस्स!

लोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से १

लेखक श्रीकांतहरणे यांनी रविवार, 07/06/2020 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या अतरंगी स्वभावामुळ अन आमच्या अजब गजब कारनाम्यां मुळ, आमी लवकरच कॉलेज कॅम्पसमध्ये फेमस झालो होतो. मित्र ही आता लय वाढले होते. राहुल्या, दिसाले एक्दम शांत, पण एकदा सुप्तगुण नाई, त मंग तो अमरावतीकर कसला? टपरीवर पोट्याचा गोळका असला, की आमी तिघ तिथं पोहचाच. मग काय बिनकामाच्या गप्पा मारत, एक, एक कटिंग चा कदी होऊन जाचा समाजातच नसे. हळूहळू आमच्या दोस्त्याच्या डोक्यात प्रकाश पळाले लागला. "अबे!! लेका, हे त फुकटे, कधी चहाले पैसे काढत नाई." झाल आता खरी मजा. आमी टपरीवर आलो, कि यायले चा पाजाचा नाई, अस पोट्टे ठरवूनच असायचे.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -२

लेखक श्रीकांतहरणे यांनी शनिवार, 06/06/2020 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
धर्मराज अपार्टमेंट- हेमसिंगबुट्टा (नावबदलून)- दहा, दहा वर्षांपासून , तिथेच सडत असलेले, इंजिनीरिंग कॉलेजचे जवाई , त्याचा तो अड्डा, कुठलाही फ्रेशर असो, त्याले एकदातरी तिथे हजेरी लावण गरजेचे होत. फक्त लोकलविदयार्थी याले, अपवाद. अमरावतीच्या फ्रेशर्सची वर्दी अजून तिथ लागली नव्हती. आमाच्याच क्लासमधला एक उत्तरभारतीय पोट्ट, रूमवर निरोप घेऊन आल. "बुट्टा सरकेयाह बुलाया है." आम्ही तिघही एकमेकांकडे पाहून रायलो.काय कराच काई समजत नव्हत. बाल्यादादाले एवढ्या लवकर भेटणई शक्य नव्हत.

अनामिका

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 04/06/2020 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
मला प्रेम करायला तिने शिकवले. तिरस्कार कसा करावा हे ही मी तिच्याकडूनच शिकलो. तिचे डोळे नेहमी सांगायचे, की नजर बोलकी असते. ती रसिका होती अन् मी मनातला भावतरंग. ती दृश्य तर मी अदृश्य. मला माझ्याच शब्दांत पकडून हरवणे फक्त तिचीच मक्तेदारी होती. तिच्यासाठी माझे शब्दही माझ्याशीच दगा करायचे. आम्ही तासंतास सोबत असायचो. पण मी तिला कधी बोलूच द्यायचो नाही. वाटायचं की तिला असंच जपून ठेवावं. तिच्या जीवाला काही तोशीस नाही पडू द्यावी. मग तिच्या वाट्याचं बोलणं सुद्धा मीच बोलायचो... माझ्याशी. तिच्या नजरेचे वर्णन मी पामराने काय करावे? त्या पाणीदार डोळ्यांत जणू सारा समुद्र सामावलेला असायचा.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -१

लेखक श्रीकांतहरणे यांनी गुरुवार, 04/06/2020 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीची येळ , जेवण खावन आटपून आमी, नऊ, दहाच्या दरम्यान झोपलो असणं. मायावर, निद्रादेवी लयच खुश असायची, एकदा का मी गादीवर पडलो, की मले बातच ढोरावाणी झोप लागे. झोपाच्या बाबतीत कुम्भकर्णानंतर मायाच नंबर लागत असणं. अजून दुसरा माया याटम म्हणजे, झोपीत असतांना मले जर कोणी मला आवाज दिला, त जरी म्या डोळे मिचकावले, तरी समोरचा कोण, कायच्यासाठी, काय बोलून रायला मले, हे सगळं समजायले, अन होश मदे याले, कमीतकमी दोन चार मिनटं त लागताच असे. त्यातच, "श्रीकांत , श्रीकांत " , "अनुप , अनुप " मच्छरान, कानापाशी येऊन भिनभिन, करावं तशे आवाज याले लागले.

सुंदर हे जग!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/06/2020 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे ‘मुळात हे जग सुंदर आहेच. पण असे काही वाईट अनुभवही येतात, की वाटतं, आता आहे त्यापेक्षा हे जग कितीतरी पटीनं नक्कीच सुंदर असू शकेल!’ हे अवतरण माझ्या ‘पंख गळून गेले तरी’ या आत्मकथनातील आहे. लाच, भ्रष्टाचार, गरीबी, लाचारी, हिंसा, जातीभेद, वर्गभेद, लिंगभेद, धर्मभेद, रंगभेद, व्यंगभेद, प्रांतभेद, अहंकार, धार्मिक कलह, दुसर्‍याला कमी लेखणं, टवाळी, निंदा, नालस्ती, शोषण, अवास्तव स्तुती, खुशमस्करी, लांगुलचालन, मत्सर, व्देष, भाषाव्देष, पापाच्या कल्पना, लबाडी, लूट, भेसळ, नफाखोरी, कोणाच्या व्यंगांकडे पाहण्याचा दुषीत दृष्टीकोन आदी गोष्टींतून आपण बाहेर कधी पडायचं?

आख्यायिकांच्या गदारोळात तानसेन

लेखक पुष्कर यांनी सोमवार, 01/06/2020 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी माझी अशी समजूत होती की 'केतकी गुलाब जुहि' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ४ - फ्रेशर्स की बकरे.

लेखक श्रीकांतहरणे यांनी शनिवार, 30/05/2020 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी, मनिष अन राहुल्या, अकोल्यातल्या, तापडीयानगरच्या भाड्याच्या घरात राहाले आलो. घरमालकान, दोन टोलेजंग लोखंडी पलंग दिले होते, म्हणजे, मले आता, ढाराढूर लोळाले, ऐसपैस जागा भेटली होती. एक थंडगार पाण्याच मडक, बाकी आमच्या ब्यागा ठेवाले लय जागा होती. फक्त प्रॉब्लेम एकच, अन तोई लय डेंजर. आंघोळ कराले, घरमालकाच्या घरात मागच्या दरवाजातून आत बाथरूमध्ये जायच होत. आला ना इज्जतीचा सवाल? मंग काय, अंघोळीले पण पुरा ड्रेस घालून, चोरावाणी घुसाचं, अन चोरावाणीच बाहेर पडाच. एव्हडं फुल ड्रेसिंग करून, त आम्ही कॉलेजाले पण जात नोतो.

मेघाची गोष्टं

लेखक स्टार्क यांनी गुरुवार, 28/05/2020 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
* कथा जुनीच आहे. मिसळपावच्या वाचकांसाठी ईथे नव्याने देत आहे. मेघाची गोष्टं आता मी मोठा झालो आहे! खूप मोठा!....इंग्लिश देवाची पुस्तकं वाचण्याएवढा मोठा!....गच्चीवर एकटा झोपण्याएवढा मोठा!....माझ्याच पैशातून रंगीत कागद विकत घेण्याएवढा मोठा!....एकट्याने चार ग्लास रसना पिण्याएवढा मोठा!....बर्फ खाल्ल्यावरही ताप न येण्याएवढा मोठा!.....विमानाने अमेरिकेला जाण्याएवढा मोठा!.....मी आता एक ग्रेट आणि शहाणा माणूस झालो आहे हे नक्की. माझ्या वर्गातली मिनी चिरमुले आज दुपारी 'तू मला आवडतोस' असे सांगत होती. मिनी अजून लहान आहे. मोठ्यांच्या सगळ्या गोष्टी तिला कळतातंच असे नाही.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ३ - त्रिकुट , त्रिशंकू

लेखक श्रीकांतहरणे यांनी सोमवार, 25/05/2020 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
अकोल्याले जायची तयारी झपाट्यानं चालू झाली होती. बाबांचा राग अजून उतरला नोता. त्याच्या, पोट्याले डॉक्टर बनवण्याच्या स्वप्नाच म्या आधीच वाटोळं करून टाकलं होत. कमीतकमी घरच्या भाकरीवर तरी इंजिनेरींग झाली असती, त त्याची पण म्या वाट लावून टाकली होती. त्या टायमाले नाय काय त, महिना दोन ते तीन हजारांचा लोड, म्या बाबांवर टाकला होता. पण आपल्या स्वप्नाचा जरी बट्याबोळ झाला, तरी पोट्ट्या ले कमी पडू देईन काय? चेहऱ्यावर, जरी राग दिसत असला, तरी जाऊ दे, कमीतकमी मधल्या बहिणी सारखा इंजिनीअर त होईन. अन पोट्यासाठी, हाल सोसणार नाई, त मग तो बाप कसला?