Skip to main content

लेख

युगांतर - आरंभ अंताचा! भाग २ व ३

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 21/07/2019 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
वशिष्ठ मुनींच्या आश्रमात एकच गोंधळ माजला होता. त्यांची आवडती गाय नंदिनी नेहमीच्या स्थानी दिसत नसल्याने ऋषीमुनी हैराण झाले होते. रानात, डोंगरावर, नदीकाठी, झाडाजवळ, सर्वत्र परिचित ठिकाणी शोधणे व्यर्थ ठरले. नंदीनी कुठेच नव्हती. वशिष्ठ ऋषींच्या मनात कोलाहल माजला. शेवटी ते ध्यान लाऊन बसले. आपली दिव्य-दृष्टी जागी करत त्यांनी नंदिनीला शोधायला सुरवात केली... क्षणातच त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. नंदिनी हरवली नव्हतीच! वशिष्ठ ऋषींच गोधन खुद्द प्रभास नामक एका वसूनेच पळवून नेलं होतं. एव्हडच नव्हे!

प्रेम 1

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 19/07/2019 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच तिच्यावर खूप प्रेम होतं. ती छान, छोटीशी, त्यांच्यासारखी न फुगलेली, पण कणखर. तिचा तो मोहक तेजस्वीपणा, डौलदार चाल. तिची बाबांभोवतीची प्रदक्षिणा त्याच्या आधी पूर्ण व्हायची. कस जमायचं तिला कोणास ठाऊक. पण बाबांनी मर्यादा घालून दिल्या होत्या सगळ्यांना. आणि बाबाविरुद्ध जायची कोणाचीच हिंमत नव्हती. तो सगळ्यात मोठा तर ती शेवटच्या भावंडांपैकी. अधून मधून तो भांडायचा बाबांशी, पण तेवढ्यापुरते. एकेदिवशी बाबांनी त्याला त्याचे काम सांगितले. ती आता नवनिर्मिती करणार होती. तिच्या त्या नवनिर्मितीमध्ये अडथळा न येऊ देण्याची जबाबदारी त्याची होती.

युगांतर- आरंभ अंताचा!

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 19/07/2019 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा! युगांतर- आरंभ अंताचा! महाभारत! ही कथा नक्की कोणाची? सत्यवतीच्या सिंहासन लालसेची ? की भीष्माचार्यांच्या महान प्रतिज्ञेची? शाप- उ:शापांची? की वरदानाची? धर्माच्या विजयाची? की अधर्माच्या पतनाची? ऱक्ताने माखलेल्या कुरुक्षेत्राची? की इंद्रप्रस्थाच्या अस्तित्वाची? ज्याने अगणित घावांतून रक्तधारांची वृष्टी.... भूमीवर होत असतानाही, पराक्रमांची पराकाष्ठा करत, रण गाजवलं त्याची?

पागोळी वाचवा अभियान

लेखक सुनिल प्रसादे यांनी मंगळवार, 16/07/2019 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
"जमीन पुनर्भरण केंद्र" - विडिओ - https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448 स्थळ - गजानन महाराज नगर, मु. गिम्हवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी - 415 712. दिनांक - 28 जून 2019 छपराचे क्षेत्र - 1500 चौ. फू. खड्डयाचा आकार - 4 फूट लांब × 3 फूट रुंद × 3.5 फूट खोल जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण - पाच लाख पंचवीस हजार लिटर. पाहूया कसे ते - संपूर्ण वर्षाऋतुमध्ये कोकणात पडणारा एकूण पाऊस - 350 सें. मी. त्या हिशोबाने 1500 चौ. फू.

बिरादरीची माणसं - भाऊजी काका

लेखक लोकेश तमगीरे यांनी मंगळवार, 16/07/2019 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट १९७६ च्या आसपासची असेल. आनंद बुनियादी प्राथमिक शाळा, आनंदवन (वरोरा) येथील पहिली-दुसरीचे विद्यार्थी चार भिंतीच्या आतील पुस्तकी शिक्षणाला कंटाळून बाबांना आर्जवाने म्हणाले, “ बाबा, आम्हाला रोज श्रमदान करायचं आहे; कृपया आम्हाला मार्गदर्शन करा”. यावर बाबा म्हणाले, “ बघा मुलांनो, शिक्षण तर तुमच्या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, ते पूर्ण करण्यावाचून तुम्हाला पर्यायच नाही. पण मी तुमचा श्रमदान करण्याचा उत्साह मोडू शकत नाही.” आणि असे म्हणून बाबांनी या विद्यार्थ्यांसाठी श्रमदानाची व्यवस्था केली. खुश होऊन सर्व मुलांनी बाबांना बनविले त्यांचे “सेनापती” आणि स्वतः झाले त्यांची ‘वानर सेना’.

पर्वती

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2019 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
पर्वती चढत होतो साथीला ५-६ तरुणाईचे टोळके होते ते गप्पा मारत पर्वती चढत होते मध्यावर आल्यावर तरुणाई दमली व बाजूला विश्रांती साठी बसली मी त्यातल्या एका तरुणाला म्हणालो अरेतुम्ही जवान तरुण मुले दम्लात एव्हढ्यात ? पर्वती एका दमात चढायची असते मी तर अजूनही एका दमात चढतो त्यावर तो तरुण म्हणाला " काका तुमची पिढी साजूक तुपावर मोठी झाली आमची पिढी रिफाईंड ऑइल वर -तेव्हढा फरक तर पडणारच ना " त्याच्या उत्तराची गंमत वाटली व त्या कडे पाहून हसलो व पाय-या चढायला सुरवात केली

जमिनीखालची धरणे (Underground Dams) आणि पाण्याचे कारखाने

लेखक सुनिल प्रसादे यांनी सोमवार, 15/07/2019 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
तिवरे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील धरण दोन जुलैला रात्री साडेनऊ वाजता फुटले आणि धरणाच्या खालच्या बाजूला वसलेल्या गावांमध्ये हाहाकार उडाला. धरण बांधताना वापरलेल्या सिमेंट, लोखंड, दगड, माती इत्यादी दृश्य घटकांबरोबरच त्यामध्ये मिसळलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अनास्था, निष्काळजीपणा आणि बेफिकिरी ह्या अदृश्य घटकांचे दर्शनदेखील सर्वांना झाले. पाठोपाठ तिवरे धरणाच्या पावलावर पाऊल टाकून आणखी किती धरणांची वाटचाल चालू आहे त्याची यादीदेखील प्रसिध्द झाली. काही प्रतिक्षिप्त घोषणादेखील ताबडतोब झाल्या.

लौकिक पार लौकिक -सैतान पुत्राचा जन्मोत्सव अर्थात मध्य रात्रीचे भय नाट्य

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 13/07/2019 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
लौकिक पार लौकिक -सैतान पुत्राचा जन्मोत्सव अर्थात मध्य रात्रीचे भय नाट्य -------------------------- भद्रदंभद्र व देवयानी मा साहेब निरंजन प्रधानाच्या ऑफिस मध्ये चर्चा करत होते भद्रदंभद्र व देवयानी मा साहेब वायुरूप तत्त्व समाजाचे मुखिया होते कालभैरव चा अनुग्रह प्राप्त साधक होते ते दोघे कालभैरव ने सारे तंत्र मंत्र मायावी शक्ती त्यांना दिलेल्या होत्या २० वर्ष काल भैरव ची तपश्चर्या केल्याचं ते फळ होते अन त्यांना मानव रूपात वावरण्यास अनुमती होती दोघेही आपल्या मायावी शक्तीने हवे तेव्हा वायू वा मानव रूप धारण करू शकत होते कित्येक हजार वर्षांपूर्वी आमचे त्रिखंडा वर राज्य होते आम्ही असुर कुलोत्प

अंधाधुंद

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 12/07/2019 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
जरा जास्तच दिस झाले आपल काही बोलण झाल नाही. पण आता का करता जी उनच अस तापल होत का काही लिहूशाच वाटत नव्हत. वरुन लगनसराईचा टाइम तवा टायमच नव्हता. म्या इचार केला पाउस पडून जाउ दे मंगच बोलू. पाउस बी असा दडी मारुन बसला का बोलाच काम नाही. अख्या मिरग गेला पण येक थेंब पावसाचा पता नाही. आता कोठ दोन पाणी झाले. पऱ्हाटी टोबली आन म्हटल आता तुम्हाले सांगतो मायी गोष्ट. मायी लय मोठी पंचाइत झालती राजेहो. आजकाल आमच्यासारख्या गाववाल्यायले शिनेमे पायन कठीण होउन गेल. लय बेक्कार दिस आले पाहा. पिक्चर पायला तर डोक्याले झिणझिण्या आल्या. नाही म्हणाले साहा महिने तरी झाले असन.

कुत्रत्वाचं नातं

लेखक इरामयी यांनी शुक्रवार, 12/07/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
काही समस्या या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादाला एक संतापयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे. प्रतिसाद लिहिणाऱ्यांचा (श्री. बाप्पू) राग मला समजू शकतो आणि त्यांचं मत चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही.