Skip to main content

लेख

समाधीवरचा गाव (एक भयकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 29/07/2019 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
'सावरगाव' जेमतेम हजार-दीडहजार लोकसंख्या असलेल छोटस गाव. तस पाहायला गेल तर, सभोवताली असलेल जंगल आणि त्यात असणाऱ्या प्राण्याशिवाय गावाला दुसरी काही ओळख नाही. उतरत्या छपराची घरे, समोर अंगण आणि त्याभोवती ताराचे कुंपण अशी साधारण घरांची रचना. जंगलातील प्राणी घरात घुसू नये म्हणून तारेचे कुंपण हमखास घराभोवती पहायला मिळत होते. जंगलातील प्राणी कधी घरात घुसून पाळीव प्राण्याचा, लहान मुलांच्या गळ्याचा घोट घेईल याची याची शाश्वती नसायची. गाव मधोमध जंगलात असल्यासारखे होता. तिन्ही बाजूला जंगल आणि उरलेल्या एका बाजूला नदी. त्यामुळे गाव जंगलात असल्यासारखेच भासायचे. शेती हा गावातील एकमेव व्यवसाय.

युगांतर आरंभ अंताचा भाग १४

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 29/07/2019 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
ऱथ महाली पोचला. भीष्म व्यथित मनाने आपल्या कक्षात जाऊन बसले. 'गुरुंनी केलेले शाब्दिक आघात, त्यांचा अपूर्ण राहिलेला न्याय, आपल्यामुळे दुखावलेली, उधवस्त झालेली अंबा..... ! हस्तिनापूरा, वचनबद्ध नसतो, तर गुरुंवर हत्यार चालवण्याचे महापाप करण्याआधीच इच्छामृत्यू घेतला असता मी!' विचित्रवीर्य तोल सांभाळत भीष्मांच्या कक्षाबाहेर आला, "भ्राता भीष्म...." त्याच्या हाकेने विचारांतून बाहेर पडत भीष्मांनी मागे वळून बघितले. उठून त्याला धरत आसनावर बसायला भीष्मांनी मदत केली,"युवराज, आपण का आलात? मला बोलावले असते....

युगांतर - आरंभ अंताचा भाग १३

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 28/07/2019 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
"भीष्म, सर्व कुशल आहे ना?" "होय राजमाता. काहीवेळा पूर्वीच नगरीत जाऊन येणे झाले. हस्तिनापुरी सर्व स्वस्थ आहे." "नाही भीष्म, मी नगरीबद्दल बोलत नाही." "मग राजमाता?" "विचित्रवीर्य च्या विवाहानंतर मी पाहातेय... तू अस्वस्थ दिसतो आहेस. सर्व ठिक आहे ना?" भीष्म काहीच बोलले नाहीत. सत्यवतीने तलम गुंडाळलेले संदेशवस्त्र त्यांच्या हाती दिले. भीष्मांनी उलगडून ते वाचले. 'अद्य शीघ्रंम् आगच्छतू!' "परशुरामांनी पाठवलेला संदेश दास घेऊन आला होता तू महालात नव्हतास तेव्हा." "आज्ञा असावी राजमाता. माझ्या गुरूंनी मला बोलावलेले आहे." सत्यवतीने मान होकारार्थी हलवली. भीष्माचार्यांचा रथ गुरुनिवासाजवळ थांबला.

युगांतर-आरंभ अंताचा! भाग १२

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 27/07/2019 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
भीष्मांनी रथ नदीकाठी थांबवला. मनातली घालमेल त्यांना महालात बसू देत नव्हती. नदीकाठी बसून गंगामातेशी बोलून त्यांना मन शांत करावेसे वाटू लागले. त्यांनी नमन करून गंगेला आवाहन केले. एकदा.... दोनदा.... तिनदा.... पण गंगामाता कुठेच दिसेनात. भीष्म अस्वस्थ झाले. "माते.... आपण प्रकट का होत नाही?" भीष्म नदीतटावर वाकून हातात जल घेण्याचा प्रयत्न केला, परंतू जल त्यांच्या हातात येईच ना. " त्या रुष्ट झाल्या आहेत वसूदेव...." भीष्मांनी वळून पाहिले. एक सुंदर स्त्री उभी होती. तिचे सौंदर्य दैवी भासत होते. "आपण कोण देवी?" "जिच्या इच्छापूर्ती करता तुम्ही गाय पळवून आणलीत, आर्य!

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ११

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 26/07/2019 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
काशीचा राजमहाल सुवासिक फुलांनी सजला होता. दास दासी येणाऱ्या राजांचे गुलाब पाणी, अत्तरे शिंपडत स्वागत करत होते. स्वयंवरात जमलेल्या राजांनी आसन ग्रहण केले. काशीनरेशने सर्व स्वयंवरात आलेल्या राजांना अभिवादन करून स्थानबद्ध झाले. लाल रंगाच्या पायघड्यांवरून डोक्यावर माळलेल्या सुवर्ण हिरेजडीत शिरोमणी ते पायातल्या बोटात घातलेल्या जोडव्यांचा भार पेलत अंबा, अंबिका, अंबालिका तिथे पुष्पवर्षावात तिथे हजर झाल्या. स्वयंवर सुरु करण्याची घोषणा देत दासांनी तीन सजवलेले पुष्पहार तिन्ही राजकन्यांसमोर धरले. भीष्माचार्यांनी महालात प्रवेश केला आणि थेट काशीनरेश पुढे जाऊन उभे राहिले.

युगांतर आरंभ अंताचा भाग १०

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 26/07/2019 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
"बोलावलेत राजमाता?" भीष्म कक्षात प्रवेश करून हात जोडून उभा राहिला. "हो भीष्म!" "काय आज्ञा आहे?" "उद्याच्या दिवशी काशीनगरीला एक स्वयंवर योजला आहे काशीनरेश नी. त्यांच्या तीन राजकन्यांचा. तु त्यात सहभागी हो. अंबा, अंबिका आणि अंबालिका मला पुत्रवधू म्हणून हव्या आहेत." "महाराणी सत्यवती?" "काळजी नसावी. तुझी प्रतिज्ञा मी तुला मोडायला सांगणार नाही." "मग राजमाता, ही स्वयंवरास जाण्याची आज्ञा ?" " विचित्रवीर्यसाठी, भीष्म!" "पण राजमाता, नियमाप्रमाणे, स्वयंवर विचित्रवीर्यने स्वतः जिंकायला हवे.

युगांतर - आरंभ अंताचा भाग ८ व ९

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 24/07/2019 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
देवव्रत.... त्याने हस्तगत केलेल्या शस्त्रांपुढे एकही राजा शस्त्र उचलू धजत नव्हता. त्याची किर्ती सर्वत्र पसरली. शंतनूची राजगादी सांभाळणारा एक उत्तम राजा म्हणून देवव्रत सोडून बाकी कोणी नव्हते. धर्म, न्याय, युद्धकला..... सर्वोत्तम होता देवव्रत! राज्याबद्दल त्याला वाटणारी आपुलकी, जिव्हाळा! राजाला शोभेल असेच त्याचे वर्तन होते. त्याच्या कर्तव्यदक्षपणा बद्दल शंतनूला दाट विश्वास होता. शंतनू आता निश्चिंत झाला होता. वनविहार करत अनेकदा नदी काठी जाऊन बसायचा. प्रवाहाच्या जलावर हात फिरवत जुन्या आठवणी ताज्या करण्यात त्याला रस वाटू लागला. असेच एका दिवशी शंतनू नदीकाठी बसला होता.

पाण्याची शेती कशी कराल ? पाणी पेरलंत, तरंच उगवेल !

लेखक सुनिल प्रसादे यांनी बुधवार, 24/07/2019 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
जलसंवर्धनासाठी पूरक असलेली आपली पारंपरिक शेती काळाच्या ओघात नष्ट होत असल्यामुळे आता आपल्या सर्वांवर प्रत्यक्ष *पाण्याचीच शेती* करण्याची वेळ आली आहे. 'पेरलंत तरंच उगवेल' हा पारंपरिक शेतीचा मंत्रच ह्या पाण्याच्या शेतीलादेखील लागू होतो. *"पाण्याची शेती"*, जी करण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही, ती करणे सर्वसामान्यांसाठी सोपे कसे होईल हे संगण्यासाठीच हे *"पागोळी वाचवा अभियान".* आम्ही लोकांपुढे ठेवलेल्या *"पागोळी वाचवा अभियानाला"* लोकांनी खूप सकारात्मक आणि कृतिशील प्रतिसाद दिला. दरम्यान लोकांच्या मनातल्या काही शंकादेखील समोर आल्या ज्यांचे समाधान होणे आवश्यक आहे.

युगांतर आरंभ अंताचा भाग ६ व ७

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 22/07/2019 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रह्मदेवांचा क्रोध ! ज्यामुळे त्यांनी स्वपुत्री मृत्यूलोकात धाडली ! देव - देवतांना भोगाव्या लागलेल्या या शापप्राप्त यातनांच्या अग्निकुंडात बळी पडला अजून एका अप्सरेचा! अद्रिका! मृत्युलोकी मस्य रुप धारण करण्याचा ब्राह्मदेवांचा शाप भोगण्यासाठी ती धरेवर अवतरली. धरेवरून पहटेच्या काषायवर्ण सुर्यदेवांचे रुप पाहून तिला मनोमन आनंद झाला. सुर्यदेवांचे प्रतिबिंब यमुनेच्या जलप्रतलावर पडलेले होते. नदी प्रवाहावर येणाऱ्या अलगद लाटांनी त्या प्रतिबिंबाला अस्थिर करत सर्व जलास केशरी छटा दिली होती. सुर्यदेवाच्या त्या लोभस रुपाकडे पाहत अद्रिकेने नमन केले आणि यमुनेच्या जलप्रवाहात प्रवेश केला.

युगांतर - आरंभ अंताचा भाग ४ व ५

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 21/07/2019 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वेला लाली शिंपडत पहाट हरित तृणांवर दवाचा वर्षाव करू लागली. पक्षांनी किलबिलाट सुरु केला आणि हस्तिनापुर नगराला जाग आली. महालात दास-दासींचा वावर चालू झाला. महाराज दास महराजांच्या कक्षेत फलाहार घेऊन गेला. पण महाराज तिथे होतेच कुठे? संपूर्ण रात्र अस्वस्थपणामुळे जागा राहिलेला शंतनू. तिचे रूप, डोळे, लाघवी हास्य त्याला बोलवत होते. तो तरी कसा थांबवू शकणार होता स्वतःला? शंतनूचा रथ नदीतटावर थांबला. सुर्यदेव अंबरात पसरलेल्या लाल रंगावर केशरी-पिवळ्या रंगाचे लेपन करत होते. नदी प्रवाहात त्याचे पडणारे प्रतिबिंब, हवेतला आल्हाददायक गारवा, अंबरातली केशरी रंगाची उधळण....