Skip to main content

लेख

हॉरर

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 17/08/2019 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
हॉरर ---------------------------------------------------------------------------------------------------------------- एक कर्णकर्कश्श किंकाळी पूर्ण थिएटरमध्ये घुमली ! लोक दचकले . माझ्या शेजारचाही दचकला .एक प्रौढ गृहस्थ. लोकांना त्या हिरॉईनची भयकुंठित अवस्था बघवत नव्हती . हिरॉईन दिसायला एकदमच कडक होती. नवीन. लोकांना अल्पावधीतच ती लय आवडायला लागली होती . पडद्यावर हॉरर चित्रपट चालू होता . टुकार ! ती हिरॉइन सोडता. हॉरर कमी आणि कॉमेडीच जास्त होता साला ! पार्श्वसंगीत मात्र लय भारी होतं. ते काढलं तर टॉम अँड जेरी बरं वाटलं असतं. पण पिक्चर बंडल असला तरी ' हॉरर होता.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३३

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 17/08/2019 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
युगांतर - आरंभ अंताचा भाग ३३ "आवाज अनोळखी आहे हा विदुर. कोण आहे तो वीर जो द्वंद्व करण्यास आव्हान देऊ इच्छितो.... ते ही अर्जुनाला?" धृतराष्ट्राच्या अंधारलेल्या नेत्रांपुढे एक आशेचा किरण जागृत होत होता..... 'एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने अर्जुनाला हरवलं की ही स्पर्धा बाद ठरवून वेगळ्या स्पर्धेचे आयोजन ! मग दुर्योधनच्या राज्याभिषेकात अडथळा नाही.' धृतराष्ट्राला त्या वीराबद्दल उत्सुकता लागून होती.

तू मेरे रुबरु है

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 16/08/2019 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजही विदर्भ मराठवाड्यात बुंग फिरणारी कालिपिली जिप असो की फाट्यावरची पानटपरी तिथे मोठ्या आवजात धडकन मधलं 'दुल्हे का चेहरा सुहाना लागता है' वाजतंच वाजतं. नुसरत ची पहिली वहिली ओळख हिच. धडकन पाहताना पहिल्यांदा तार स्वरात वाटणारं हे गाणं नंतर खूप आवडायला लागलं सोबत नुसरत ही. मग तो थेट भेटला ते 2015-16 मध्ये, आतशः नेट ची स्पीड पण वाढली होती आणि गाणी शोधणं फार फार सोप्पं झालं होतं, तू नळी वर तो पुन्हा भेटला 'साँसों की माला सिमरू' च्या रूपाने. त्यानंतर आजतागायत त्याने साथ सोडली नाही.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३२

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 16/08/2019 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३२ "काय झाले गुरु द्रोण?" "कृपाचार्य, तुम्ही?" "इतक्या रात्री तुम्ही जागे का ?" काय उत्तर द्यावं हे न सुचल्याने द्रोणाचार्यांनीच प्रतिप्रश्न केला, "तुम्ही या प्रहराला इथे?" "एक निर्णय घेतला गेलाय आज राज्यसभेत.... त्यामुळे जरा अस्वस्थ आहे." "कसला निर्णय?" "होणारे महाराज ठरवणार आहेत येत्या सप्ताहामध्ये." "त्यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे, कृपाचार्य? ही तर आनंदाची बाब आहे." "ते सर्वांचे युद्धकौशल्यावर मापन करणार आहेत गुरुवर!" "ह्मम. मग कोण निवडला जाण्याची भिती वाटते आपणास?" "आपल्या पासून काहीच लपून नाही.

युगांतर- आरंभ अंताचा भाग ३१

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 15/08/2019 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
आकाश महालात सुर्यमहाराजांचे गमन-आगमन होत राहिले. ना दुर्योधन बदलला, ना भीम आणि दुर्योधनाचे वैर. होणाऱ्या भांडणात मध्ये पडून न्यायाचे अमृत ओतत दोघांना शांत करण्याचे काम नित्यनियमाने करणारा युधिष्ठिरही बदलला नाही, आणि काहीही झालं की भीष्माचार्यांच्या कुशीत शिरणारा अर्जुनही नाही..... ते ना महालात बदलले ना गुरुकुलात! आचार्य द्रोणांचा अश्वत्थामाप्रती असलेला स्नेह पराकोटीचा होता. अश्वत्थामाच्या कपाळावरचा मधोमध असलेला पांढरा शुभ्र हिऱ्याचा खडा पाहून तो शिवशंकरांचा तिसरा नेत्र असल्याचा भास होत असे. सगळेच त्याचा आदर करायचे. शेवटी गुरुपुत्र होता तो.

गावची हवा...

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/08/2019 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे अहिराणी पट्ट्यात (आणि इतरत्रही) पूर्वी खूप झाडं होती. जंगलं होती. नद्यांच्या थड्यांवर आमराया होत्या. भरपूर पाण्यामुळे शेती बागायती होत्या. म्हणून गावातल्या हवेत कायम थंडावा असायचा. हवा शुध्द असायची. वाहनांची आताच्या इतकी प्रचंड संख्या नव्हती. प्रदुषण नव्हतं. घरं सिंमेटची नव्हती. मातीची होती. गावातल्या गल्ल्या मातीच्या. गावाच्या आजूबाजूच्या पांद्या मातीच्या. घराघरात रेडीओ, टीव्ही, फॅन नव्हते. कुठं कुठं रेडिओ येऊ लागले होते. गावात खूप झाडं नसली तरी गावाच्या आजूबाजूला आमराया असत. इतर झाडी असत. गावाला लागून असलेल्या पाट थळाच्या पिकांना कायम पाणी सुरू असायचं.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३०

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 14/08/2019 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
भीमाला शुद्ध आली तेव्हा तो नागलोकी होता तेही सैनिकांच्या पहाऱ्यात. "महाराज, हा आम्हाला सापडला तेव्हा मृच्छीत होता. गुप्तचर वगैरे असेल म्हणून याला रक्षक नागांनी दंश केला तर हा शुद्धीत आला." "दंश केल्यावर शुद्धीत आला?" "हो, महाराज." "याचा अर्थ त्याने आधीच विष प्राशन केले होते." "नाही, मी तर खीर खाल्ली होती." भीम म्हणाला. 'चेहऱ्यावरचे तेज पाहून तो कुणी सामान्य तर वाटत नाही.' नाग महाराजांनी भीमला विचारलं, "कोण आहेस तू?" "मी कुंतीपुत्र भीम. भीष्माचार्यांचा पौत्र." "कुंती? हस्तिनापुरातून आला आहेस?" "हो." नागमहाराजांनी भीमाला जवळ घेतलं. "आजोळी स्वागत आहे तुझं." "आजोळ?" "हो. मी तुझा मातामह आहे.

प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ? (Beyond the 'Rainwater Harvesting')

लेखक सुनिल प्रसादे यांनी बुधवार, 14/08/2019 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ? (Beyond the 'Rainwater Harvesting') भाग - एक. -------------- 'रेनवॉटर हार्वेस्टिंग' ही इसवीसनपूर्व बारा हजार वर्षांचा इतिहास असलेली संकल्पना आहे. माणसं तेव्हापासून हे करत आली आहेत. 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'च्या आजपर्यंतच्या व्याख्येमध्ये पावसाचे जमिनीवर पडलेले पाणी गोळा करणे आणि ते साठवणे ह्या दोनच गोष्टींचा समावेश आहे. आपल्या देशातही आपण 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'ची कामं वेगवेगळ्या पद्धतींनी मागील अनेक वर्षे करत आलो आहोत. परंतु ते करत असताना आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे ह्याचा आपण फार गंभीरपणे विचार केला आहे असं दिसतं नाही.

युगांतर - आरंभ अंताचा भाग २९

लेखक मृणालिनी यांनी मंगळवार, 13/08/2019 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
"महामहीम, एक दु:खद वार्ता आहे...." "बोल." "महामहीम, वनातून संदेश आला आहे." काहीतरी अघटित घडलेले असल्याचा अंदाज आला आणि भीष्माचार्य आसनावर रोवून बसले. आणि दसा कडे पाहू लागले. "पंडुंचे देहावसान झाले." "पंडु....." जोरात किंचाळून शेजारी उभी असलेली अंबालिका कोसळली. 'पिताश्री, चित्रांगद, विचित्रवीर्य..... आणि आता पंडु? हृदयाच्या निकटचे आप्तजन! हस्तिनापुरा, पाहतो आहेस ना हा नियतीचा खेळ? माझा शिष्य..... पंडु! या भीष्माला 'तातश्री' म्हणून मनापासून आदर देणारा....हस्तिनापुरच्या सीमा विस्तारत नेणारा......

युगांतर - आरंभ अंताचा भाग २७

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 12/08/2019 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
युगांतर - आरंभ अंताचा! भाग २८ नंदघरी राहायला यशोदेने रोहिणीला बोलावून घेतले तेव्हापासून नंदाचे घर बलराम आणि कृष्णाच्या किलबिलाटाने भरून गेले होते. कृष्णाच्या दैवी चमत्काराच्या कैक वार्ता हवेच्या लहरींसोबत सर्वत्र पसरत होत्या. त्याच्या निळ्या रुपाची आणि विशाल काळभोर नेत्रांची भूल पडणार नाही अशी एक गोपिका गोकुळी मिळाली तर नवल! गोपिकांच्या पाण्याच्या घागरी फोडण्यापासून ते कोणाचाही घरात घुसून शिंकाळ्यातलं लोणी मित्रांसोबत वाटून खाण्यापर्यंत घडलेल्या प्रत्येक गोष्टींची तक्रार करायला गावभरच्या बायका नंदच्या घरी रांग लावत असतं. यशोदेचा दिवस त्या तक्रारी ऐकून कृष्णाला शोधण्यात जायचा.