Skip to main content

लेख

पोळ्यानिमित्त...

लेखक फुटूवाला यांनी शनिवार, 31/08/2019 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
खरंतर कालच या आठवणींना उजाळा आलेला पण इथं लिहायचं राहून गेलं. लहानपणी म्हणजे ४त असताना आमच्या घरी जानी गाय होती. माझ्या गावापासून ११ किमीवर बहिणीचे गाव होते. त्यांच्याकडे दुभते जनावर नसल्याने वडिलांनी त्यांना दिलेली. पण गाय इतकी खतरनाक होती की चुकून जरी सुटली तर थेट माझ्या घरी पोहोचून जायची. तीच वासरू नसताना सुद्धा. तीनचार वेळा असं झाल्यावर राहूदे म्हणून नंतर तिकडे पाठवलीच नाही. नंतर तिने एका खोंडाला जन्म दिला. आम्ही त्याच नाव दगड्या ठेवलं. शाळेत दुपारी १२ वाजता १५ मिनिटाची सुट्टी असायची तेव्हा मी येऊन त्याला वैरण हिबाळून पळायचो. दुपारी जेवायच्या सुट्टीत त्याला वैरण+पाणी.

'तंबोरा' एक जीवलग - २

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी गुरुवार, 29/08/2019 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या लेखात तंबोर्‍याबद्दल माहिती लिहिली ती तंबोर्‍याची निमिती, जडणघडण आणि भाग या संबंधीची होती. आज जे लिहिणार आहे ते मला आलेल्या तंबोर्‍यासंबंधीच्या अनुभवाविषयी. लहानपणी तंबोरा हातात आला तो परंपरेनं. आई गायची म्हणून. मला खरं म्हणजे शिकायचं होतं. गाणं करायचं नव्हतं पण शिक्षणाचे वातावरण नव्हते. मला शिकवण्यासाठी फारशी उमेदही कुणी दाखवली नाही. कुणी म्हणजे आईनेच. तिचे आपले एकच " तू गाणंच कर व्यवस्थित" तोच आपला पोटापाण्याचा व्यवसाय. स्वराला पक्की होतेच, गळ्यात गोडवाही होता. बुद्धी तेज चालायची. हे सगळं गाण्याच्या पथ्यावर गेलं आणि शिक्षण राहिलं. गंडा बांधला.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग 39

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 29/08/2019 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
गडद निळ्या रंगाने सजून कृष्णमय झालेल्या पहाटेने सृष्टीला हलका दवांचा मारा करत जागे केले. पक्षांची किलबिल सुरू झाली तशी साऱ्या नगराला जाग आली. द्वारकेच्या महालातील कृष्णाचा कक्ष कर्णमधुर सुरांनी व्यापलेला होता. पूर्वेचे सुर्यकिरण कक्षभर पसरतील अश्या विशाल खिडकीत निळा-जांभळा मयुर पिसारा फुलवून बासरी ऐकत होता. पहाटेच्या गारव्याने थरथरणारा फुललेला पिसारा ! कृष्ण डोळे मिटून बासरी वाजवण्यात मग्न होता. आज त्याचे सूर काही वेगळेच होते. "अनुज!" कृष्णाने डोळे उघडत बासरी बाजूला केली. "दाऊ?

शाली आणि तो

लेखक vaibhav deshmukh यांनी गुरुवार, 29/08/2019 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
तब्बल तीस वर्षांनी तो त्याच्या गावाला चालला होता. तीस वर्षात सगळ काही बदलल होत. तो बदलला होता. भोवतालचा परिसर बदलला होता. गाव बदलला होता. एवढच काय पायाखालची वाटही बदलली होती. कच्च्या रस्त्याच्या जागी पक्का रस्ता आला होता. काळाच्या प्रवाहात सगळ काही बदलल होत.       मनात विचार करतच तो चालला होता. अंगात सैल कुडता, त्याखाली तशीच सैल आणि ढगळ पँट, वीतभर वाढलेली दाढी. ती त्याने मुद्दाम वाढवली होती. दाढीला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि खांद्याला अडकवलेली शबनम पिशवी. एकंदरीत सगळा साधा आणि सरळमार्गी पेहेराव होता त्याचा. पेहरावाला शोभेल असा गरीब आणि भोळा चेहरा.

रुसण्याची मजा

लेखक kool.amol यांनी गुरुवार, 29/08/2019 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी भावभावना किती सुरेख असतात, नाही? त्यातही कित्येक वर्षांपासून चर्चिला जाणारा आणि पुढील अनेक वर्षात देखील अजिबातच शिळा न होणारा विषय म्हणजे प्रेम! त्यातही हे प्रेम जर प्रियकर प्रेयसी या प्रकारातले असेल तर मग विचारायलाच नको. आपण वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असलो तरी हा विषय टाळता येणं तसं अवघडच. बरं गंमत म्हणजे ह्या नात्यात काही ठराविक मार्गच नेहमी आपलेसे केले जातात. एकदा प्रेमात पडलात की कोणी काय करायचं आणि त्याहीपेक्षा काय नाही करायचं हे जवळपास ठरलेलंच असतं. म्हणजे बघा ना कितीही नवी पिढी असली तरी काही गोष्टी ह्या क्वचितच बदलतात. ह्या सुंदर नात्यात खूपशा भावना आहेत.

'तंबोरा' एक जीवलग

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी बुधवार, 28/08/2019 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
गाणाऱ्या व्यक्तीचा सर्वात जवळचा सखा. एक भारदस्त आणि गाण्याचं अविभाज्य अंग असलेला मैफिलीचा घटक. हिंदुस्थानी शास्त्रीय कंठसंगीताच्या अर्थातच सुरांच्या सृजनाचा अवयव. स्वरांची बीजं ज्याच्यातून उत्सर्जित होऊन गाणाऱ्याच्या मनात प्रस्थापीत होतात तिथं गाणाऱ्याची प्रतिभा आणि हे स्वरबीज यांचं मिलन होतं. कंठावाटे प्रसवतात ते निरागस सुर. तो निर्मीतीक्षम अवयव अर्थातच तंबोरा! तंबोरा एक जीवलग सुरात लावलेल्या जव्हारीदार तंबोऱ्य़ांचा झनकार गुंजत असावा.

डुबुक !!

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी बुधवार, 28/08/2019 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
“नानी ये देखोsss!”, “नाना ये देखोsss!”. आमच्या ४ वर्षाच्या नातवाच्या डोळ्यातील चमकदार भाव, अत्यंत आनंदानी उड्या मारत हातातला डायपर आमच्यापुढे नाचवत नाचवत तो उत्साहानी, आनंदानी दाखवत होता आणि आईला कसं शेवटी माझं ऐकावंच लागलं आणि मला ‘ते’ तिला द्यावंच लागलं, अशा विजयी नजरेनी तो अगदी ‘सुखावला’ होता. लगेच त्यानी ‘ते’ घातलं आणि तो ‘ब्रम्हानंद’ घेण्यात रमला. आणि इकडे त्याची आई म्हणजे माझी मुलगी “आई बघं ना गं, त्याला शेवटी डायपर द्यावंच लागलं, आज चौथा दिवस. डायपरशिवाय त्याला 'ते' होत नाहिये आणि त्यामुळे आता तो काही खातपीतपण नाहिये!

इसाई पुयलची थीम

लेखक मायमराठी यांनी बुधवार, 28/08/2019 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च ९५ ला ' बॉम्बे' प्रदर्शित झाला. कोणत्या तरी एका शनिवारी संध्याकाळी चित्रपट बघून घरी परतलो. उरलेला शनिवार व संपूर्ण रविवार हरवलो होतो. माझा मला सापडतंच नव्हतो. मणीरत्नमचं लेखन व दिग्दर्शन, राजीव मेननचं छायाचित्रण, सगळ्या कलाकारांचा अभिनय आणि 'इसाई पुयल' ( मूळ तामिळ शब्द, अर्थ संगीतातील वादळ) रहमानने तर कोणाकोणाने म्हणून नाही हेलावून सोडले? बॉम्बे थीम बद्दल लिहायला, ती ऐकून काय होतं, होऊ शकतं, हे असं सगळं वर्णन करायला साधे शब्द नाही चालत, मागवायला लागतात, कुठून मागवायचे ते माहीत नाही. पहिल्यांदा ऐकली तेव्हाच सैरभैर व्हायला झाले.

युगांतर - आरंभ अंताचा ! भाग ३८

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 26/08/2019 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
"मला हे पटत नाही युवराज!" "का?" "हे एका योद्ध्याचे काम नव्हे." "ते मला माहित नाही. मला इतकंच महत्त्वाचं वाटतं की राजमुगुट त्या पंडुपुत्रांच्या माथी नसला पाहिजे.वारणावतला तुमच्यासाठी महाल बनवलाय म्हणल्यावर बघ कसे सगळे पांडव गेले तिकडे. हावरट कुठले. "युवराज, त्यांनी विश्वास ठेवला तुमच्यावर. तुम्ही दिलेली भेट म्हणून संशय सुद्धा न घेता गेले ते तिथे. आणि राजगादीचाच प्रश्न आहे, तर त्यासाठी त्यांच्या बळी कशासाठी? तुम्ही द्वंद्वयुद्धाचे आव्हान द्या युधिष्ठिराला. तुमच्यावतीने मी त्याला पराजित करून त्याच्याच हस्ते तुमचा राज्याभिषेक करून देईन." "आणि असे कोण करू देईल आपल्याला?

दुपारची झोप..

लेखक आजी यांनी सोमवार, 26/08/2019 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
जगातली सर्वोत्तम सुखे फुकटात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच. तर फुकट मिळणाऱ्या सुखांपैकी "दुपारची झोप" ही मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. दुपारचे असे मस्त जेवण झालेले असावे. पोट तृप्त असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत गेलेले असावे. डोळ्यावर हलकेच झोप उतरावी आणि पापण्या अलगद मिटाव्यात. फक्त अर्धा तास!... अर्धा तास ब्रह्मानंदी टाळी लागावी आणि आपण निद्रादेवीच्या अधीन व्हावे.