Skip to main content

लेख

दिवसभराची कमाई

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/09/2019 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुरूवार. दत्ताचा वार. दिवसभर बसून होतो. मधूनच पावसाची सर यायची. तात्पुरता आडोसा शोधायला लागायचा. समोरच्या दुकानाच्या पायर्‍यांवर गर्दी व्हायची. अंग ओले झाल्याने बसवत नव्हते. तरीपण पाच वाजेपर्यंत बसून राहीलो. घरी जाणार्‍यांची गर्दी संध्याकाळीच होते. घरी जाता जाता दत्ताला हात जोडून, पैसे टाकून ते पुण्य कमवत होते. कंटाळलो कंटाळलो अन मग तेथून उठलो. बँकेत अकाऊंटला नेटबँकींगने पैसे ट्रान्सफर केले. थोडे पैसे गावी आयएमपीएसने पाठवले. खर्चासाठी अर्जंट पाहीजे म्हणत होती. ओले अंग अन थंडीच्या उतार्‍यासाठी समोरच्या शॉपमधून बाटली घेतली. अन स्विगीवरून ऑर्डर मागवली.

शिंडलर्स लिस्ट

लेखक प्रमोद मदाल यांनी बुधवार, 11/09/2019 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळच्या वेळी एका उच्चभ्रू वस्तीतून कर्फ्यू मोडून फिरणारी लांबलचक, चकचकीत अॅडलर लिमोझिन गाडी सरकारी अधिकाऱ्यांना ओळखीची झाली होती. एका अलिशान हॉटेल समोर येवून थांबताच दारावरचा पहारेकरी अभिवादन करत पुढे येतो. आपला महागडा ओव्हरकोट व्यव्यस्थित करत साधारण पस्तीशीतला, उंच देखणा तरुण गाडीतून उतरतो. कोटावरचे सोनेरी स्वस्तिक चिंन्ह हाताने ठीक करून आत जातो. नेहमीप्रमाणे महागडे मद्य मागवतो, जवळच बसलेल्या सैनिकी अधिकाऱ्याकडे त्याचे काहीतरी महत्वाचे काम असते. त्या कामासाठी वाट्टेल तेवढे पैसे द्यायला तो तयार होता.

एक तरी खड्डा अनुभवावा...।

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 09/09/2019 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
'एक तरी खड्डा अनुभवावा' वास्तविक हे शीर्षक उगाचच मिरवतंय. ह्याच धर्तीवर १६८ कोटी चकचकीत शीर्षके हात जोडून समोर उभी आहेत. त्या प्रत्येकाने आपला काळजाचा ठाव घ्यावा इतपत तपश्चर्या केलेली आहे. २ अकतुबरला गांधीजींच्या छायाचित्राला मनोमन नमन करत असताना एक प्रश्न पडतो की ते नक्की ' खेड्याकडे चला' असे म्हणाले का ' खड्ड्यांकडे चला' असे म्हणाले. सर्व विश्वात बापूंची वचनं वाचली / अवलंबली जातात, तर आपण कसे मागे असणार? आपल्या सभोवताली अशी एकही भिंत नाही, जिच्यावर बापू नाहीत आणि जिच्या साक्षीने 'प्रामाणिक' व ' सत्य ' व्यवहार होत नाहीत.

मला भेटलेले रुग्ण - १९

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 06/09/2019 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
‘डॉक्टर कभी भी कुछ लगे तो याद किजीये ‘ असं म्हणत पेशंटच्या बापानी हात जोडून नमस्कार केला ..... ६ महीन्यांपुर्वी टिबीचं निदान झालं आणि सेकंड ओपिनीयनसाठी माझ्याकडे आले होते.... मग औषधं लिहीणं, टिबीची माहिती देणं आणि आहारासंबंधी बोलून झाल्यावर धीर देणं हा माझा नियमीत प्रोटोकाॅल ! प्रत्येक व्हिसीट वेळेवर किंवा वेळेआधीच आणि शेवटी पेशंट आजारातून बाहेर असा सगळा काळ गेला परंतू डोळ्यात अश्रु घेऊन धन्यवाद देतांना त्यांनी अदृश्य आर्शिवाद दिलेला मला दिसला .... मी असं काय जगावेगळं केलं की त्यांच्या डोळ्यात पाणी यावं ? मी ईतका महान आहे का ?

प्राचिन ऋद्धि-सिद्धि विनायक मंदिर

लेखक जागु यांनी शुक्रवार, 06/09/2019 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाच्या सानिध्यात असणार अस आमचं छोटंसं उरण हे मूर्ती लहान पण कीर्ती महान प्रमाणेच माझ्या ऋदयात घर करून आहे. आमच्या उरणमध्ये मोरा बंदर, करंजा बंदर व पिरवाडी -दांडा या निसर्गसंपन्न समुद्रकिनार्‍यांची झालर आहे. पिरवाडीचा समुद्रकिनारा हा आम्हा रहिवाशांसाठी मनःशांती, करमणुकीचे मोठे स्रोत आहे. सुट्टीच्या दिवसांत अनेक पर्यटक ह्या समुद्रकिनारी भेट देऊन मनात आनंद घेऊन जातात. उरणमध्ये पूर्वी खूप खाड्या होत्या, मिठागरे होती. परंतू आता औद्योगिककरणामुळे त्यांचे प्रमाण कमी आहे. तरीही काही खाड्या शाबूत आहेत. त्यातील पाणज्याची खाडी ही विदेशी रोहीत पक्षांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे.

तंबोरा' एक जीवलग - ४

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी शुक्रवार, 06/09/2019 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
घरोघरी गणपती आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या उत्साहालासुद्धा उधाण आलं असेल. गल्लोगल्ली बसलेल्या गणपती मंडपातून कानठळ्या बसतील इतपत वाजणार्‍या हिडीस गाण्यांबद्दल ओरड होत असते. ती रास्तच. उत्सव म्हणाजे आनंद. त्यात त्रासदायक असे काही नसावे खरं तर. पण हल्ली आनंदाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. हिडीस कान फुटणारी थिल्लर गाणी वाजवणे, ऐकणे, कानाचे पडदे फुटतील इतक्या मोठ्या आवाजात ढोल बडवणे हाच आनंद; असे मानणार्‍या पिढीचे हे उत्सव त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं 'साजरेच' असतात.

लाखाची गादी .

लेखक Sanjay Uwach यांनी मंगळवार, 03/09/2019 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
लाखाची गादी . ( कृपया वाचकानी लेखाच्या तांत्रीक बाबी कडे न पहाता, निव्वळ एक काल्पनिक विनोदी किस्सा म्हणून हा लेख वाचावा ही विंनती आहे. ) आज रविवारचा दिवस, म्हणजे सुट्टीचा दिवस. सकाळी उठून बायकोच्या हातचा गरमागरम चहा पीत बसलो होतो . इतक्यातच माझ्या भ्रमणध्वनीतुन पोपट शिळा घालू लागला . मनांत म्हटले आता सकाळी सकाळी कोण हा पोपत आहे कुणास ठाऊक ? हॅलो बोला , कोण बोलताय !! "आरे , संजू काय ? गुडमार्निंग ss ,गुडमार्निंग ss आरे!! मी सुरेश बोलतोय ,तुझा शाळेतील बालमित्र" . "सुरेश ss , कोण?" माझ्या एकदम लक्षात येईना . "आरे !

शतशब्द कथा!

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 02/09/2019 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
हो, मी खोटं बोलते. काय करणार, पांढऱ्या वस्त्रावर काळे आवरण घालण्याची आमची प्रथाच आहे. कोर्टातून बाहेर निघाल्यावर नेहा भेटली. नोटा मोजून घ्यायची गरज नव्हती कारण दिलेल पाकिट जड होतं आणि नेहा प्रामाणिक! अजूनही आठवते आहे..... समीरच प्रेत....तिचे रक्ताने माखलेले हात.... खूनाचा आरोप.... अटक झाली तेव्हा केवढी सैरभैर झाली ती! मी केस घेतली. शेवटी फॅमिली फ्रेंड. कोर्टाला पटले - कुंडीवर डोके आपटून अपघाती मृत्यू. रक्ताच्या थारोळ्यातल्या प्रेताला तिने हलवून पाहिले. नवरा कसाही असला, तरी त्यांच्या बायका त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतातच. आता हेच बघा ना.... छोट्याश्या भांडणाचं निमित्त.

साध्वी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/09/2019 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे लेखकाचा मोबाईल वाजला. लेखकाने स्क्रीनवर पाहिलं. नंबर होता. फोनमध्ये सेव्ह नव्हता. फोन घेत लेखक म्हणाले, ‘नमस्कार.’ ‘सोनवणे साहेब, तुम्ही आश्रमात येताहेत ना. कार्यक्रम सुरू होत आहे साहेब.’ तिकडून खूप घाईत असलेली महिला बोलत होती. लेखक म्हणाले, ‘कोण हवंय तुम्हाला?’ ‘मी सुमनताई बोलते. सोनवणे नगराध्यक्ष साहेबांचा फोन आहे ना?’ लेखक म्हणाले, ‘नाही.’ ‘कोण बोलताय आपण?’ ‘सुधाकर पाटील’ ‘हा नंबर सोनवणे साहेबांचा नाही?’ ‘नाही’ ‘नंबर तर सेव्ह आहे माझ्याकडे’ म्हणत फोन कट झाला. पाच सहा दिवसांनी लेखकाला याच नंबर वरून पुन्हा फोन आला.

तंबोरा' एक जीवलग - ३

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी शनिवार, 31/08/2019 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या लेखात उल्लेख केलेली हकीकत आधी सांगते. महाराष्ट्रातलं एक गाव होतं. तिथं रामनवमीचा उत्सव असायचा. म्हणजे अजूनही असेल. पण ही हकीकत अंदाजे चाळीस वर्षा पूर्वीची. तिथं उत्सवात दरवर्षी आई गायची. दरवर्षी न चुकता गाण्याला बोलवायचेच ते लोक. उत्सवाच्या दोन महिने आधी त्यांचं पत्र यायच. आई गेली त्या नंतरच्या वर्षी सुद्धा त्यांचं पत्र आलं. त्यात लिहिलं होतं. "गेल्या वर्षा पर्यंत बाई गात होत्या. चिक्कार वर्ष सेवा घडली त्यांच्याकडून. खर तर त्या गेल्याला अजून वर्ष झालेलं नाही. पण ही परंपरा सोडू नका. बाईंच्या ऐवजी तुम्ही गाणं करा." त्यांचं म्हणण खरं होतं. ती लोकंही सज्जन होती.