Skip to main content

लेख

शिवसृष्टी पुणे

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 06/03/2025 07:27 या दिवशी प्रकाशित केले.
महाशिवरात्रीच्या दिवशी मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांना कुठे तरी नेऊन आणावं असा विचार आला. कात्रज रोडला असलेल्या शिवसृष्टीची आठवण झाली आणि तिथे जायचं ठरवलं.

लातूरच्या पानगांवमध्ये आकाश दर्शन व विद्यार्थ्यांसोबत संवाद

लेखक मार्गी यांनी सोमवार, 03/03/2025 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान प्रसाराची "सुदिशा" नमस्कार. काल 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेच्या पानगांव जि. लातूर शाखेद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये मुलांसाठी व मोठ्यांसाठी आकाश दर्शन सत्र घेण्याची संधी मिळाली. लातूरचे खगोलशास्त्रज्ञ श्री. राजकुमार गव्हाणे सरांमुळे हा सहभाग घेता आला. आकाशात आपण तारे वर्तमानात जरी बघत असलो तरी त्यांचा प्रकाश भूतकाळातला असतो, तशी प्रतिष्ठानच्या प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी सरांसोबतच्या जुन्या नात्याची नव्याने ओळख झाली! माझं गाव परभणी, त्यामुळे लातूर तसं जवळचंच!

घर पाहावे बांधून: २

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी शनिवार, 08/02/2025 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
तर बऱ्याच दिवसांनी अपडेट देण्याइतपत प्रगती झाली असल्याने हा पुढचा भाग. जोवर घर बांधून पूर्ण होत नाही तोवर संयम बाळगणे इतकेच आपल्या हातात आहे. १. कुठे? आधी घर कुठे बांधावे हा एक यक्षप्रश्न छळत होता. त्या प्रश्नाचे नीट उत्तर सापडत नव्हते. आधी ठरवले होते की तालुक्याच्या ठिकाणी बांधावे. त्यासाठी एक दोन गुंठे जागाही घेतली १० लाखांना. पण तो विचार गळू लागला. २००० नंतर भारत झपाट्याने बदलला आहे. एकिकडे पुणे हे एक जबरदस्त मोठे खेडेगाव झाले आहे आणि गावं सुद्धा बरीच बदलली आहेत. तालुक्याच्या गावाच्या जत्रेला मी ५ वर्षांनी गेलो होतो.

प्लॅनेटरी अलाईनमेंट: सोशल मीडियाची कमाल!

लेखक मार्गी यांनी शनिवार, 25/01/2025 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून सतत एक मॅसेज व्हायरल होतोय की, २५ जानेवारीला सगळे ग्रह एका रेषेमध्ये येणार आहेत, खूप अभूतपूर्व दृश्य असेल वगैरे. काही वेळेस तर त्याचे फोटोज- व्हिडिओजही व्हायरल होत आहेत. अनेक जणांना त्यावर उत्तर दिल्यानंतर शेवटी हे लिहावसं वाटलं. वस्तुस्थिती सांगण्यापूर्वी तो कंटेंट बनवणार्‍यांचं खरंच कौतुक! अगदी सगळीकडे तो मॅसेज गेलेला आहे. अगदी शाळेतल्या मुलांपर्यंतही! भले तो मॅसेज चुकीचा असला तरी त्या निमित्ताने लोक आकाश बघणार आहेत, ग्रह शोधणार आहेत, हेही नसे थोडके!

तर्पण फाउंडेशनचा सोहळा: अनाथांच्या नाथा तुज नमो

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 14/01/2025 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
✪ समाजातल्या अवघड प्रश्नांना सोडवण्याचा ध्यास ✪ पंखास या बळ दे नवे, झेपावया आकाश दे ✪ कर्तृत्वाचा व दातृत्वाचा "सेतू" ✪ अनाथ असण्यापासून सनाथ होण्याचा प्रवास- गायत्री पाठक ✪ गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मिळूनी करू मात ✪ "तुम्ही जे कराल, तेच तुमच्याकडे फिरून येईल" ✪ अनाथ मुलींना मिळणार हक्काचं माहेर ✪ कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता सर्वांना नमस्कार. काल १३ जानेवारीला तर्पण फाउंडेशन, मुंबई ह्यांचा युवा गौरव पुरस्कार कार्यक्रम होता. मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठात झालेल्या ह्या कार्यक्रमामध्ये समाजात खूप वेगळं काम करणार्‍या युवांना गौरवण्यात आलं.

"पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात वैयक्तिक सीमारेषा

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 14/01/2025 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच नेटफ्लिक्सवर मंचकदृष्यांनी खचाखच भरलेला एक स्पॅनिश चित्रपट बघितला. एका पोरसवदा अल्लड तरूण-तरूणीच्या प्रेमाभोवती गुंफलेली ती कथा होती. या चित्रपटात कामक्रीडेचे जे चित्रण आहे, ते नेहेमीपेक्षा वेगळे आहे असे लक्षात आले. कामक्रीडेत आलापी संपल्यानंतर बंदीश चालू करताना नायक नायिकेची "परवानगी" मागताना दाखवला आहे. "consent" ही कल्पना जनमानसात रुजावी म्हणून लेखक/दिग्दर्शकाने हे केले असावे. पण मला याचे कौतूक वाटले कारण चित्रपटात "consent" स्पष्टपणे प्रथमच बघायला मिळाला. माणसे जोखायच्या प्रत्येकाच्या काही ना काही कसोट्या असतात, तशाच माझ्या पण काही आहेत.

ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी

लेखक सुमेरिअन यांनी सोमवार, 06/01/2025 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी ०५ - परमहंस योगानंद यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने.. तीन वर्षांपूर्वी मी लॉस अँजेल्स ला शिफ्ट झालो. हळू हळू माझी इथे असणाऱ्या योगानंद परमहंसांच्या self realization fellowship आणि क्रिया योगाची ओळख झाली. https://www.quora.com/Which-famous-people-got-inspired-by-the-book-Auto… https://yogananda.org/ कोलकात्याचे परमहंस योगानंद जवळपास १०० वर्षांपूर्वी लॉस एंजेलिस ला आले.

सामान्यांमधले असामान्य: कर्नल समीर गुजर

लेखक मार्गी यांनी शनिवार, 04/01/2025 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. भारतीय सेनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल नावाजले गेलेले मूळचे परभणीचे असलेले कर्नल समीर गुजर हे माझे मित्र! हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो! नुकताच त्यांच्या सहवासाचा योग आला. सेनेमध्ये इतक्या उच्च पदावर व दायित्वावर असूनही जनतेसोबतचं त्यांचं आत्मीयतेचं वागणं- बोलणं, गावच्या लोकांसोबत व समाजासोबत असलेली त्यांची बांधिलकी, इतक्या उंचीवर पोहचूनही त्यांचं डाउन टू अर्थ वागणं हे खूप जवळून बघता आलं. त्यांच्याकडून त्यांच्या वाटचालीतले काही किस्से ऐकायला मिळाले. माझे गावचे मित्र म्हणून हे लिहावसं वाटलं.

रिलस्टार

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 03/01/2025 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
रिलस्टार -------------------------------------------------------------------------------------------------------------- मला सोफ्यावर पडून लोळायला जाम आवडतं. मागे एक उशी घेतली की झालंच. मोबाईल बघावा.रिल्स पहावेत. मजा ! मध्येच डुलकी लागली तर बहार ! मी अशीच रिल्स बघत होते.एकामागे एक रिल्सची लाईनच असते. तुम्हाला वेगळं काय सांगायचं म्हणा त्यात. बघतच रहावंसं वाटतं. अक्षयपात्रच जणू. त्या आभासी जगात हरवून जायला होतं. तुम्हीच बघा ना - सध्या ज्या काही घडामोडी आपल्याला स्क्रिनवर, कुठल्याही प्रकारच्या स्क्रिनवर पहायला मिळतात, त्या मला मसाल्यांच्या जाहिराती वाटतात.

चपाती आंदोलनाचे गूढ

लेखक चामुंडराय यांनी बुधवार, 01/01/2025 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
chapati आपल्या दररोजच्या जेवणात असलेली "चपाती / पोळी / रोटी" चा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता का? "चपाती आंदोलन" म्हणून ओळखली गेलेली हि चळवळ खरंच स्वातंत्र्य लढ्याचा भाग होती का? १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा चपाती आंदोलन होती का? आणि जर असेल तर हे आंदोलन एव्हढे दुर्लक्षित का राहिले? चपाती आंदोलनाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्याल