लेख
जब I met मी :-2
मी लहान होते तेव्हाची गोष्ट. पाचसहा वर्षांची असेन. आम्ही एका ओळखीच्या काकूकडे गेलो होतो. आई सांगत होती, "आमची दिदी किनई खूप शहाणी आहे. कुठेही गेलो तरी आईजवळ एकाच जागी गप्प मांडी घालून बसते. कसला गडबडगोंधळ नाही." मी वर पाहिले, आई माझ्याकडे एकटक पाहत होती. मी कसंनुसं हसले आणि मांडी सावरून बसले. बाहेर हाॅलमध्ये दादू काकूच्या मुलांसोबत नुसता धुडगूस घालत होता. त्यांची खेळणी कशीही फेकत होता. मी त्याला बोलणार होते नीट खेळायला, पण आई रागावली असती, म्हणून गप्प बसले. आई हसत म्हणाली, "फारच द्वाड झालाय! मला तर बाई आवरतच नाही." आता काकू कसंनुसं हसल्या.
जब I met मी
लग्नापूर्वीची मी एक हुशार, मनमिळाऊ आणि थोडीशी टाॅमबाॅईश अशी मुलगी. शाळेत नेहमी चांगले मार्क्स. घरातून भरपूर प्रोत्साहन असल्याने वेगवेगळ्या स्पर्धा, परिक्षा,खेळ यात सहभाग असायचा. आईवडिल मला व्यवहारज्ञान यावे म्हणून बरीचशी कामे सांगायचे. उदा. बँकेत जाऊन लाईटबिल भरणे, पैसे भरणे-काढणे, एखाद्या परिक्षेचा फाॅर्म भरणे, पोस्टाची कामे इ. मला लागतील त्या वस्तू बहुदा मीच खरेदी करायचे.
माझे अरेंज मॅरेज झाले. लग्नाची माझी खरेदी बहिणींसोबत मीच केली होती. सासरी आल्यानंतर नवी नवरी म्हणून कौतुक व्हायचे. घरातील सर्व बायका अवतीभवती असायच्या, हवंनको ते बघायच्या.
चला माणसाप्रमाणे वागूया !
माननीय आणि प्रिय रसिक वाचक ,
*सप्रे* म नमस्कार !
आपण सगळ्यांनी / काहींनी माझे लेख , कविता , स्केचेस , पेंटिंग्ज , अभिनयाच्या व गाण्याच्या clips , गझल्स , पुस्तक वाचलं असेल.पण आज मी एक वेगळ्याच विषयावर हा लेख लिहितो आहे.
गेले काहि आठवडे जगभरामधे आणि आपला भारत पण जगाचाच एक भाग असलेल्या आपल्या देशात — कोरोना विषाणूमुळे भयंकर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे.
ईमायनं आल्याती का..?
पुज्य सकाळी कामे आवरून नित्यनेमाने शिरस्ता बाहेर पडलो. आजकालच्या जमान्यात पत्रकारांना काडीची म्हणून किंमत राहिली नाही. पण जिवनावश्यक, अत्यावश्यक, चौथा स्तंभ वगैरे संबोधून नमोजींनी आम्हांला अशा स्मशानवैराग्याच्या दिवसांत पण बाहेर जाण्यास भाग पाडीले. मौजे बाभुळगाव येथील 'जनता कर्फ्यू' नामक ऐतिहासिक दिनाचे वार्तांकन करण्यासाठी आम्ही सायकलवर टांग टाकली.
आखिरकार दोन डोंगर उतरून, पायवाटेने प्रसंगी सायकल उचलून आम्ही त्या दिडदमडीच्या गावात पोहोचलो. उन्हातान्हात रापून तहान लागली होती. सर्वत्र सामसूम होती. या आडवळणाच्या गावात होटेल नावाचे काही असावे का, याचा काही तपास लागला नाही.
आठवणीतील याहू चॅट रूम्स
याहू मेसेंजर वरील मराठी चॅट रूम्स उदय १९९८ साली झाला... त्याकाळातील एकमेव इन्स्टंट चॅट मेसेंजर क्लाईंट म्हणजे याहू (तसं रेडिफमेल, हॉटमेल सुद्धा होते पण याहू एवढी प्रसिद्धी नव्हती)... शिवाय त्यांत आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या रूम्स, कम्युनिटीप्रमाणे लोकल चॅट रूम्स असायच्या... मी सुद्धा त्यावेळी याहूच्या मराठी चॅट रूममध्यें चॅट करायचे...सुरुवातीला फार अप्रूप वाटायचे..मस्त मजा- मस्ती , गप्पा-टप्पा, ज्ञानाची देवाण-घेवाण (knowledge sharing), त्यातल्या त्यात भांडणे रुसवे- फुगवे आणि मग एकमेकांच्या समजुती असे अनेक प्रकार चालायचे.... तर याचीच काही निगेटिव्ह बाजू पण होती...
तमसो मा ज्योतिर्गमय ...
तमसो मा ज्योतिर्गमय ...
मुख्याध्यापक केतन कदम सरांनी आपला शाळेचा फेरा संपवला. ते नेहमी शाळेत शाळा सुरु होण्याआधी अर्धा तास शाळेत येत आणि सर्व शाळेत एक फेरी मारीत असत. सगळीकडे अगदी बारीक नजरेने पहात ते आपल्या हातातील एका वहीत आपली निरीक्षणे नोंदवून ठेवीत असत. मग ऑफिसमध्ये गेले की योग्य व्यक्तीला ते ते काम सुपूर्त करत असत . असा त्यांचा दिनक्रम असे. आपण काम केव्हा सांगितले आणि ते केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे हे पण त्या व्यक्तीशी बोलून ते त्या वहीत ते नोंद करून ठेवीत असत. शाळेच्या पटांगणात दोन तीन महिन्यापूर्वी लावलेल्या झाडांची निगा हा त्यांचा आवडीचा विषय होता.
कृतघ्न -5
याआधीचे भाग
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154
भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159
भाग 3: https://www.misalpav.com/node/46183
भाग 4:
https://www.misalpav.com/node/46203
आता पुढे
माऊली विचारात पडला कि या बाबतीत स्वतः हस्तक्षेप करावा कि नाही, रामदास ला तुकाराम च्या भरोश्यावर सोडून द्यावे कि आपण मदत करावी.
माझा कृष्णा मामा
माझा कृष्णा मामा
कांही कांही माणसाना परमेश्वर फार सुंदर रूप देतो. माझ्या कृष्णामामाला पाहीले कि मला हॉलीवूडच्या चित्रपटातील धिप्पाड हिरोची आठवण यायची. स्वच्छ पांढरे धोतर ,त्यावर तीन बटणाचा पांढरा हाफ शर्ट, अंगाबाद्याने धिपाड,भक्कम मजबूत शरीरयष्टी ,उंचापुरा,कुरळे केस ,रंगाने गोरापान ,पायात जाडजूड कोल्हापुरी चप्पल ,कपाळावर कायम अष्ट्गंघ .कदाचित धोतर नेसणारी हि त्याची शेवटचीच पिढी असावी .सकाळ असो कि रात्र असो त्याच्या चेहऱ्यावरील हस्य मात्र कधिच ओसरत नसे.
तदेव लग्नम् ..
परवा एका मेंदीच्या कार्यक्रमाला गेले होते.हल्ली लग्नात हळद,मेंदी,संगीत,लग्न,खाना,रिसेप्शन,बारात (काही राहिलेले असल्यास चूभूदेघे) अशी 'इव्हेंटस् ची लांबलचक मालिका असते. लग्नाला 'इव्हेंट'म्हणायचे हे लक्षात ठेवावे लागते. त्याची एक इव्हेंट मँनेजमेंट असते. आणि ती करायला एक मॅनेजर असतो. ह्या सगळ्याचा एक बिझनेस असतो.
तर मगाशी म्हटलेल्या मेंदीच्या कार्यक्रमालाही गर्दी होती.
सगळ्याजणी खूप नटून आल्या होत्या. मुलगी जिथं बसली होती ती जागा 'डेकोरेट' केली होती. त्यासाठी खास एक बाई आली होती. तिच्या भोवती दोन मुली मेंदी काढत होत्या.
हाताच्या बोटापासून ते कोपरापर्यंत.
मिसळपाव
