Skip to main content

लेख

चिमुलवाड्यावर योग शिबीर

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शुक्रवार, 24/04/2020 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याचे दिवस होते. सकाळचीच वेळ होती. हगणदारी मुक्त योजनेखाली गावात प्रातर्विधी केंद्रांची बांधणी झाल्याने सकाळी सकाळी हातात बादल्या घेऊन "रोपे लावण्यासाठी" बाहेर पडणाऱयांची संख्या बरीच कमी झाली होती ! वाड्यावरील शाळेतल्या पोराट्यांना अर्थातच उन्हाळ्याची सुटी होती. पण सकाळी सकाळीच भक्तिरूप दिगंबर काका भूपाळ्या, भजने म्हणत गळा काढत असल्याने पोरांच्या उशिरा उठण्याच्या बेताला रोज वाळवी लागलेली असे. असो, तर अश्याच दर सकाळी सावरगावच्या बहुतेक बायका सकाळी सकाळी गावच्या रस्त्यावर चालायला जात असल्याची बातमी मिळाल्यापासून काका कामत आणि गुरव गुरुजींनीहि चालायला जाण्याचा दिनक्रम सुरु केला होता.

लेखनक्रिया : लिहून की बोलून ?

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 20/04/2020 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या टाळेबंदीच्या काळात आपण घरकामे आणि विविध छंद यात मन रमवित आहोत. बरेच जण या निमित्ताने एखादी नवीन कला देखील शिकत आहेत. यातून स्फूर्ती घेऊन मी देखील एक कला शिकत आहे. ती शिकत असतानाच हा लेख लिहीत आहे. काही अंदाज येतोय का या कलेबद्दल ? ठीक आहे. आता सांगतोच. ही कला म्हणजेच संगणकावर हाताने टंकन न करता आपल्या बोलण्याद्वारे हे टंकन करीत आहे. बरेच दिवसांपासून याबद्दल ऐकत होतो. या पद्धतीत आपल्या हातांना आराम मिळणार असतो, म्हणून याचे आकर्षण होते. काही काळापूर्वी असे ऐकले होते की, मराठी लेखनाच्या बाबतीत ही सुविधा इंग्लिश इतकी अजून प्रगत झालेली नाही.

धाड

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी सोमवार, 20/04/2020 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा. चिमुलवाड्यावर बहुतेक सर्वच घरांत बायका आपल्या कोवळ्या पोरांकडून ''ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा" बोबड्या आवाजात वदवून घेत होत्या. मॉन्सून पूर्व कामांच्या नावाखाली दिवसातून कमीत कमी ४-५ वेळा लाईट जाण्याचे प्रकार सुरु होते. भरलेले गटार समजून उसपण्याच्या नावाखाली खोदलेल्या चरित १ -२ दारुड्यांनी आपापले पाय मोडून घेतले होते ! "उनासाठी खूप झाला, आता पावसासाठी लवकरच ह्या छत्र्यांचा वापर होउदे रे देवा"- अशी प्रार्थनाच बहुतेक लोक करीत असावे. बाकी मागच्या वर्षीच्या गरमीपेक्षा ह्या वर्षीची गर्मी जरा जास्तच आहे असे प्रत्येकाला वाटत होते.

पुन्हा एकदा रामायण

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 19/04/2020 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
रामायणाचं पुनर्प्रक्षेपण आज संपलं. पुन्हा एकदा इतिहास घडवुन. २०१५ मध्ये चालु झालेल्या मालिकांच्या लोकप्रियता मोजण्याच्या पद्धतीनुसार रामायण तेव्हापासुन आजपर्यंत सर्वात जास्त लोकांकडुन पाहिली गेलेली मालिका ठरली. ३३ वर्षांपूर्वीचा हाच इतिहास पुन्हा एकदा घडवत. नाक मुरडणाऱ्यांनी तेव्हाही नाकं मुरडली आणि आताही. तेव्हा म्हणे केबल नसल्यामुळे, एकच वाहिनी आणि पर्याय नसल्यामुळे जे दाखवतील ते लोकप्रिय व्हायचं. आणि आता लोकांना घरात बसुन दुसरं काम नाही, त्यामुळे पुन्हा.

परवड !

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शनिवार, 18/04/2020 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
तो एक शनिवार होता. राजाभाऊ साठे, दामलेंच्या श्री सीता-राम बुक डेपोत कामाला असत. शनिवारची सुट्टी असून सुद्धा आज दामल्यांनी त्यांना फोन केला व दुकानावर येऊन नवीन आलेली बुके दाळावयास व त्यांचा हिशोब करण्यास सांगितल्याने झक मारीत त्यांना दुकानात जावे लागले होते. दुकान म्हणजे तसें जवळही नव्हते. दुकानात पाऊल ठेवण्यासाठी त्यांना फॉण्ड्यावरून ३० किमी. दूर पणजीला जावे लागायचे. रोजच्याप्रमाणे राजाभाऊ पणजीला जायला निघाले. वाटेवर जाताना त्यांनी साधलेंच्या दुकानावरून रोजचा पेपर घेतला व राशी भविष्य असलेले वर्तमानपत्राचे दुसरे पान उघडले.

शटडाऊन

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी गुरुवार, 16/04/2020 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
थंडी संपून उन्हाळ्याचे संकेत देणाऱ्या थोड्याश्या गर्मीचे दिवस होते. कामतकाकांच्या जुन्या घड्याळाने दहाचा टोला दिला आणि तेवढ्यातच बरोब्बर १०:३० ला होणाऱ्या देवकीकृष्णाच्या आरतीला सुरुवात झाली. वास्तविकतः कामत काकांचे अर्धा तास पाठी असलेले पिढीजात घड्याळ कोणाचाच हात पोचणार नाही अश्या उंचीवर त्यांच्या आज्याने लटकवले होते. ते निखळवून सारखे करण्यास म्हणून खास अनंत मेस्तास स्टूलाची आर्डर दिली होती. पावसात दार उघडताना व बंद करताना खालून लागत होते ते नीट करण्यास जो अनंत आला नाही त्याचे स्टूल इतक्यात कुठे पोचणार !

बुचाचे झाड

लेखक भागो यांनी बुधवार, 15/04/2020 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या घराच्या दाराशी एक बुचाचे झाड आहे.हे झाड मी माझ्या लहानपणापासून बघत आहे. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी अंगणात त्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलांचा सडा पडलेला असे. आम्ही मुले ती फुले गोळा करून त्यांचा हार किंवा वेणी बनवत असू. पण काही दिवसापूर्वी एक गंमतच झाली. मी सकाळी उठून खिडकीबाहेर बघतो तर काय. बुचाच्या फुलांचे ते झाड गायब! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. वाटले मी झोपेत तर नाहीना. असे कसे होऊ शकते .एवढे मोठे भर भक्कम झाड एवढासाही मागमूस न ठेवता नाहीसे होते म्हणजे काय ? मी स्वतः एक प्रथितयश लेखक आहे. तो देखील रहस्यकथांचा!

वैश्विक संस्कार

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/04/2020 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे संस्कार म्हणजे काय? संस्कार हे सापेक्ष असतात का? संस्कार हे सुसंस्कारच असतात का? खरं तर संस्कार या शब्दातच सु म्हणजे चांगली असलेली संज्ञा गृहीत धरलेली आहे. तरीही संस्कारात सुसंस्कार आणि कुसंस्कार अशी वर्गवारी हेतूत: केली जाते. संस्कार हे कृत्रिम असतात का नैसर्गिक? निसर्गाला अनुसरून असणारे संस्कार कोणते आणि निसर्गाच्या विरूध्द असणारे संस्कार कोणते? निसर्गाच्या विरूध्द जाणार्‍या संस्कारांना संस्कार म्हणता येईल का? संस्कारांनी माणसाचा देवमाणूस होतो का? होत असेल तर संस्कारांनीच माणसाचा राक्षस होऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर ‘होतातच’ असे येते.

काश्मीर प्रिन्सेस : विस्मृतीत गेलेली विमान दुर्घटना (सत्यकथा)

लेखक साहना यांनी बुधवार, 15/04/2020 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर प्रिन्सेस : विस्मृतीत गेलेली विमान दुर्घटना (सत्यकथा) ११ एप्रिल १९५५, काश्मीर प्रिन्सेस हे एअर इंडियाचे constellation विमान हवेंतील ढगांना चिरत इंडोनेशियाच्या दिशेने जात होते. हाँग कोन्ग मधून ह्या विमानाने आधारानं ४ वाजता उड्डाण केले होते आणि आता ९ वाजता ते समुद्रावर उडत होते. त्याकाळी विमानात एक विमान अभियंता सुद्धा असायचा. अभियंते कर्णिक त्यावेळी विमानात होते. ते जिथे झोपले होते तेथून त्यांना तिसऱ्या इंजिन मधून धूर येताना दिसला, काही वेळाने एक छोटा स्फोट सुद्धा झाला. त्यांनी तात्काळ धाव घेऊन विमान कप्तान डी के जातार ह्यांना सूचित केले.

माधवनगरच्या आठवणीतून... गोगटे काकांच्या घरचे फिस्टचे निमंत्रण

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 14/04/2020 00:17 या दिवशी प्रकाशित केले.

माधवनगरच्या आठवणीतून...

गोगटे काकांच्या घरचे फिस्टचे निमंत्रण

गुरुवार पेठेतील आमच्या घराच्या अंगणात सायंकालीन रिंग खेळणे हे इतके सहजपणे होत असे कि तो पायंडाच पडला होता. मे महिन्यात पाण्याचा सडा घालून, नेट बांधायचे डांब वेळोवेळी पहारीने ठोकून ठाकून घट्ट तयार केले की जितके टाईट बांधता येईल तितका नेटचा दोर खेचायला गठ्ठ्या सारखा गबदुल तातडीने कामाला येई. त्या आधी आम्ही खेडकरांच्या बंगल्यासमोर कोर्टावर जात असू. चाळीतील कोकणी चेहर्‍याच्या मधु नाईकला त्या काळात हरवणे अशक्य बाब होती. तुफान वेगाच्या सर्विसवर तो अर्धे पॉईंट वसूल करे.