Skip to main content

लेख

मैत्र: मेधा पूरकर

लेखक पारुबाई यांनी मंगळवार, 16/06/2020 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस माझ्या बहिणीने मला पुण्यात चालणाऱ्या ‘मैत्र’ नावाच्या ग्रुपबद्दल सांगितले. हा ग्रूप बायकांकरता वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींची लेक्चर्स आयोजित करतो. माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले. किती नामी कल्पना आहे! माझा चेहरा पाहून माझी बहिणीने त्या ग्रुपबद्दल आणि तो ग्रुप चालवणाऱ्या तिच्या मैत्रिणीबद्दल, मेधा पूरकरबद्दल, सांगितले. माझी उत्सुकता वाढतच गेली. ही कल्पना तिला सुचली कशी, तिला हा असा ग्रुप का सुरु करावासा वाटला असेल हे जाणून घेण्याकरता मी मेधाला भेटायचे ठरवले.

माणूसपणाच्या आसपास!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/06/2020 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आपल्याला झाडांत देव पाहता येतो. म्हणजे झाडांची पूजा करायची नाही तर झाडं लावायची. झाडांचं संगोपन करायचं. निसर्गात देव पाहता येतो. म्हणजे निसर्गचक्रात मानवी ढवळाढवळ करायची नाही. माणसात देव पाहता येतो. म्हणजे माणसाला माणसासारखं वागवायचं. एखाद्या माणसाच्या चरित्रातही देव पाहता येतो. ऐतिहासिक पुरूषात देव दिसू शकतो. संतांच्या कृतीत देव असतो. देवाच्या मुर्तीतच फक्‍त देव असतो असं नाही. मंदिरातच फक्‍त देव असतो असं नाही. देव्हार्‍यातच फक्‍त देव असतो असं नाही. पूजा केल्यानेच फक्‍त देव प्रसन्न होतो असंही नाही. म्हणून नवनवीन देवस्थाने निर्माण होऊ नयेत.

मच्छरवाणी- एक गुप्त वार्ता (एका मच्छरप्रमुखाचे भाषण)

लेखक लेखनवाला यांनी शनिवार, 13/06/2020 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
अंत्यत थोडया कालावधीत समाजात दूरवर पसरण्याची कला, तसेच समाजातील अस्वच्छ दुर्लक्षित परिसरात विशेष ठाण मांडून मोठमोठाल्या इस्पितळातील डॉक्टर लोकांस आपल्याविषयी दखल घेण्यास भाग पाडणा-या, नाजूक दिसूनही आपल्या ताकदीचे भान करुन देणा-या, हलक्या आणि उडत्या चालीचे म्हणून हीनवलेले जाणा-या आपल्या ‘मच्छर’ या कीटकजमातीस, त्यांच्या सामाजिक बांधिलकीविषयी आणि एकूणच त्यांच्या सदयस्थितीविषयी चावा संघटनेचा प्रमुख या नात्याने हा पत्रिकाप्रंपच मांडतो आहे. आजूबाजूला वाढणा-या मच्छर या आत्मक्लेशास उत्तम संधी असून मनुष्यास स्वतःस चारचौघात नकळत थोबाडीत मारुन घेण्यास मदत करतात.

बटाट्याच्या चाळीतला लॉकडाऊन

लेखक कुमार जावडेकर यांनी शुक्रवार, 12/06/2020 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
बटाट्याच्या चाळीतल्या 'लॉकडाउन'ची सुरुवातच गच्चीचं कुलूप उघडण्यानं झाली! चापशीनं पुढाकार घेऊन मेंढेपाटलांची परवानगी आणली; पण नेमका किल्ली हरवून बसला! वास्तविक ते कुलूप, कडी आणि दार इतके मोडकळीला आलेले होते की ते उघडण्यासाठी टाचणी, पिना, हातोडी, लाथ असं काहीही चाललं असतं. त्यानं आपल्या कानावरच्या बॉलपेनानं त्या कुलुपाची कळ फिरवली आणि चाळकऱ्यांची कळी खुलली. चाळकऱ्यांचं 'लॉकडाउन' यामुळे होऊ लागलेल्या 'अप-डाउन'मधून मार्गी (?) लागलं. 'निदान गच्चीतली हवा आणि ऊन तरी खायला मिळतील,' अशा समजातून ते मेंढेपाटलांना दुवा देऊ लागले.

लोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से २

लेखक श्रीकांतहरणे यांनी गुरुवार, 11/06/2020 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
रोजरोज ईज्जतिचा भाजीपाला न होऊ देता, घरमालकाकडे आंघोळीले, त्याच्या घरातून बाथरूम मदे जाण, हे काई आता जमत नॊत. त्यातल्या त्यात आमी तिघेही पयल्यान्दाच घरा बाहेर राहायले आलो होतो. मग अशात काहीतरी फालतू गोष्टी वरून, वाद होणार नाई त मंग ती दोस्ती कायची? नेहमी अनोळखी लोकांपेक्षा जे आपल्याले लय लाड करतात, जाच्यावर आपला हक्क आहे अस वाटते, अन मंग जर त्याने आपली मर्जी राखली नाई, त दुःख होऊन, राग याले लागतो, त्यातूनच भांडण होतात. अशाच कुठल्यातरी फालतू कारणामुळे, मी दुसऱ्या कुठल्यातरी मित्रांसोबत रूम शिफ्ट केली. मनीष अन राहुल्याले, मनश्याच्या वडिलांच्या ओळखीच्या काकांन, राहायला रूम दिला.

बालकथा: रामूची हुशारी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 10/06/2020 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
बालकथा: रामूची हुशारी एक छोटे गाव होते. त्या गावात रामू नावाचा पोरका मुलगा राहत होता. जवळचे कुणीच नसल्याने तो एकटा राहत होता. बारा तेरा वर्षांचा रामू कोण कुठला कुणालाच माहीत नव्हता. तो सार्‍या गावाचाच मुलगा झाला होता. गावात मिळेल ती कामे तो करायचा. कुणाची गुरे चारून आण, बांधावरचे गवत कापून दे, कुणाचे धान्य पोहचवून दे तर कुणाच्या घरची इतर कामे करून दे असले वरकाम करून तो पोट भरे. गावकरीही त्याच्या एकटेपणाची जाणीव ठेवून होते. त्याचा स्वभावही मनमिळावू आणि पोटात राहून जगण्याचा होता. असेच एकदा त्याला एका आजीने जळणासाठी लाकडे तोडून आणण्यास सांगितले.

बोहेमिअन रॅप्सडी

लेखक स्टार्क यांनी मंगळवार, 09/06/2020 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
'ती आली, त्यांनी पाहिलं आणि ते हसले' फॉल सेमिस्टरपासून सुरू झालेल्या आमच्या फिलॉसॉफी क्लासचं हे एका वाक्यातलं वर्णन! एव्हाना रंगीबेरंगी फॉल सीझन संपून पांढर्‍याफटक हिवाळ्याने माझ्या शहराला - इथकाला आणि आमच्या युनिवर्सिटीला कह्यात घेतले होते. जणू शरदाचे सप्तरंग शिशिराने अलगद आपल्या पांढर्‍या बर्फात गोठून ठेवावेत आणि मग मन भरले की ते वसंताच्या हवाली करून निघून जावे. मला नेहमी वाटे....आमच्या ईथकातला शरद ऋतू म्हणजे अगदी एखाद्या मुरलेल्या चित्रकारासाराखा... सुबक आकारांमध्ये मोजून मापून रंग भरणारा....आणि रंगांच्या छटा एवढ्या अगणित की बस्स!

लोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से १

लेखक श्रीकांतहरणे यांनी रविवार, 07/06/2020 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या अतरंगी स्वभावामुळ अन आमच्या अजब गजब कारनाम्यां मुळ, आमी लवकरच कॉलेज कॅम्पसमध्ये फेमस झालो होतो. मित्र ही आता लय वाढले होते. राहुल्या, दिसाले एक्दम शांत, पण एकदा सुप्तगुण नाई, त मंग तो अमरावतीकर कसला? टपरीवर पोट्याचा गोळका असला, की आमी तिघ तिथं पोहचाच. मग काय बिनकामाच्या गप्पा मारत, एक, एक कटिंग चा कदी होऊन जाचा समाजातच नसे. हळूहळू आमच्या दोस्त्याच्या डोक्यात प्रकाश पळाले लागला. "अबे!! लेका, हे त फुकटे, कधी चहाले पैसे काढत नाई." झाल आता खरी मजा. आमी टपरीवर आलो, कि यायले चा पाजाचा नाई, अस पोट्टे ठरवूनच असायचे.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -२

लेखक श्रीकांतहरणे यांनी शनिवार, 06/06/2020 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
धर्मराज अपार्टमेंट- हेमसिंगबुट्टा (नावबदलून)- दहा, दहा वर्षांपासून , तिथेच सडत असलेले, इंजिनीरिंग कॉलेजचे जवाई , त्याचा तो अड्डा, कुठलाही फ्रेशर असो, त्याले एकदातरी तिथे हजेरी लावण गरजेचे होत. फक्त लोकलविदयार्थी याले, अपवाद. अमरावतीच्या फ्रेशर्सची वर्दी अजून तिथ लागली नव्हती. आमाच्याच क्लासमधला एक उत्तरभारतीय पोट्ट, रूमवर निरोप घेऊन आल. "बुट्टा सरकेयाह बुलाया है." आम्ही तिघही एकमेकांकडे पाहून रायलो.काय कराच काई समजत नव्हत. बाल्यादादाले एवढ्या लवकर भेटणई शक्य नव्हत.

अनामिका

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 04/06/2020 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
मला प्रेम करायला तिने शिकवले. तिरस्कार कसा करावा हे ही मी तिच्याकडूनच शिकलो. तिचे डोळे नेहमी सांगायचे, की नजर बोलकी असते. ती रसिका होती अन् मी मनातला भावतरंग. ती दृश्य तर मी अदृश्य. मला माझ्याच शब्दांत पकडून हरवणे फक्त तिचीच मक्तेदारी होती. तिच्यासाठी माझे शब्दही माझ्याशीच दगा करायचे. आम्ही तासंतास सोबत असायचो. पण मी तिला कधी बोलूच द्यायचो नाही. वाटायचं की तिला असंच जपून ठेवावं. तिच्या जीवाला काही तोशीस नाही पडू द्यावी. मग तिच्या वाट्याचं बोलणं सुद्धा मीच बोलायचो... माझ्याशी. तिच्या नजरेचे वर्णन मी पामराने काय करावे? त्या पाणीदार डोळ्यांत जणू सारा समुद्र सामावलेला असायचा.