Skip to main content

लेख

अंधेरी, सेनस्केस आणि ट्रेन

लेखक लेखनवाला यांनी सोमवार, 24/08/2020 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
**************** सकाळचा तो लोकल ट्रेनच्या आतला भाग. नाकीनऊ करत का होईना ट्रेनच्या आतल्या गर्दीत एकदाचे दोन्ही पाय डब्यात टेकवायला जागा झाली खरी, आणि थोडं थोडं पुढे आतमध्ये शिरत, आता एका कोप-यात टेकून उभं राहता आलं शेवटी त्याला, माणसां मागून माणसं आत रेटत होती, मघास पासून आत खिश्यात असलेला मोबाईल एकदाचा हातात आला, आजूबाजूला एकदा त्यानें सभोवार नजर मारली, खूपजण त्यांच्यासारखेच मोबाईलमध्ये गुंतले होते, तितक्यात अचानक एकजण उठल्यामुळे बसण्याजोगी ‘चौथ्या’ सीटची जागा झाली आणि तो बसला.

पार्टी

लेखक Govind यांनी रविवार, 23/08/2020 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
सुगी संपली आणि ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला. सालाबादप्रमाणे गावोगावचे मजूर ऊसतोडीसाठी निघाले. आमच्या गावातील काहीजण दूरदूरपर्यंत जायचे.त्यांच्या नेण्याआणण्याची आणि रोजंदारीची व्यवस्था शेजारच्या गावातील काही जण करायचे. त्यांना मुकादम म्हणतात. आठ दहा टोळ्या त्यांच्या हाताखाली असतात. कामगारांची ने आण करायला तेव्हा ट्रक नव्हते. या टोळ्या रबरी टायरची चाके लावलेल्या बैलगाड्यांमधून उसाची वाहतूक करीत. अशा टोळ्या आमच्या गावावरून निघाल्या कि त्यांची ती भलीमोठी रांग पाहायला भारी मजा यायची. बैलांच्या गळ्यातील घुंघरमाळांची ती कलकल ऐकून कितीतरी वेळा भान हरपून जाई. आजही तिचा आवाज माझ्या कानांमधे घुमतो.

जिंदगी फिर भी.....

लेखक ज्येष्ठागौरी यांनी शुक्रवार, 21/08/2020 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
जिंदगी फिर भी..... लेकीची नुकतीच एक मोठी( सत्व )परीक्षा झाली त्यात ती उत्तीर्णही झाली आणि द्विपदवीधरही झाली आणि अगदी नजीकच्या भविष्यकाळात काही काळ शिकायचा मनसुबा नसल्याचं तिनं जाहीर केल्यावर मी जरा मऊ(!) आवाजात तिला विनंती केली की तिनं आता तिची खोली आवरावी.

अव्यक्त स्पंदने

लेखक तेजल दळवी यांनी बुधवार, 19/08/2020 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
...आणि मलाच माझी दया आली... इतका जीव लावतो आपण काही माणसांना .. त्यांच्या वागण्यात जरा जरी बदल झाला तरी कळवळून येत मनात.. कधीकधी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागतो आपण.. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो ...पण त्रास काही संपत नाही.. असं का वागवस वाटलं असेल त्या व्यक्तीला माझ्याशी हे काही केल्या उमगत नाही.. मग अशावेळी काही हक्काची माणसं आठवतात ... जी कायम सोबत असतात सावलीसारखी ...या अशा काळात त्यांची जास्त आठवण येते.. कधीकधी वाटत खूप गृहीत धरतो आपण त्यांना.. तुम्ही खूप महत्वाचे आहात हे सांगायचंच राहून जातं बऱ्याचदा.. ही माणसं रक्ताच्या नात्यांनी बांधलेली नसतात..

करोनाच्या संधीचं ‘सोनं’

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 16/08/2020 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे एकीकडे आक्‍खं जग करोनाशी लढत बरबाद होत आहे. असंख्य लोक आपल्या जिवाला मुकत आहेत. आपल्या नातलगांना, मित्रांना गमावत आहेत. कधी नव्हे इतक्या मानवी अस्तित्वाच्या आणीबाणीच्या वेळी चीन सारख्या हुकुमशाही देशाला भारतात अतिक्रमण करण्याची दुर्बुद्‍धी होते.(आपल्यामुळे जगभर करोना फैलावला या मानसिकतेने चीनने खरं तर जगापुढे खजील असायला हवं होतं.) त्यासाठी करोना काळात भारताला रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्याचा करार करावा लागतो. हाच मुहुर्त साधून फ्रांसकडून राफेल येतात. नेपाळ आणि पाकिस्तान त्यांच्या नव्या नकाशात भारताचा भाग दाखवतात.

कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 14/08/2020 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा). प्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे : मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेतून मुलगा, सून आणि लहानशी नात भारतात आले. त्यांचे व्हिसादिकांचे काम आटोपल्यावर आम्ही सगळे उदयपूर प्रवासाला गेलो.

कोविड_एक_अनुभव

लेखक अक्षय देपोलकर यांनी गुरुवार, 13/08/2020 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याने २-३ महिने धुमाकूळ घातलाय त्या कोरोनाची भेट झालीच . तसही ह्या मित्राला, नातेवाईक यांना झालाय आणि अशी लांबून भेट होतीच कोरोनाची.कंपनी मधल्या मित्राला कोरोना झाला आणि माझं quarantine चालू असताना १० व्या दिवशी ताप आल्यावर कुठे तरी मनात धाकधूक चालू झाली.पण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर थोड हायसं वाटल, कोरोनाचा ताप एवढ्या दिवसांनी शक्यतो येत नाही.पण जर लक्षणं आली तर मात्र टेस्ट करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगून prescription दिलं. दुसऱ्या दिवशी मात्र अचानक घश्यात कफ येणं आणि खोकला चालू झाला.म्हणून टेस्ट करण्या शिवाय गत्यंतर नव्हतं.

संवाद (भाग २)

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 13/08/2020 03:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या साऱ्या निर्णयांत, कृतीत आपल्या मनात आपला स्वत:शीच जो संवाद सतत सुरू असतो त्याचा मोठा वाटा असतो. भीतीच्या बाबतीत या आतल्या संवादाचे येणारे आवाज हे सहसा “आज नकोच, नंतर बघू”, “बापरे मला कसं जमेल” “असं झालं तर!” अश्या स्वरुपाचे असतात, हे आपण गेल्या भागात पाहिलं. भीतीचे वेगवेगळे प्रकार [फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती), Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती), हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती), सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती), पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका)] यांच्याबद्दलही गेल्या भागात थोडक्यात पाहिलं .

ती रात्र (भयकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 10/08/2020 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
ती रात्र (भयकथा) ते उपनगर हळूहळू पाण्याखाली येत होते. पाच दिवसांपासून संथपणे पडणारा पाऊस, आता मुसळधार बनला होता. सगळे उपनगर पावसाने झोडपले होते. जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले होते. रस्ते, मैदाने, इमारती, महामार्ग, हमरस्ते जलमय झाले होते. पाणी रस्त्यांच्या मर्यादा ओलांडून सखल भागाकडे वळू लागले. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. चहाच्या रंगाचे ते पाणी सगळ्या मैदानात साचू लागले. हळूहळू मैदाने, सखल रस्ते, खोलगट जागा, इमारतींच्या खालचे मजले, तलाव, विहिरी पाण्याखाली येऊ लागल्या. एक एका भागात पावसाचे पाणी अतिक्रमण करू लागले.

अंबापेठेतले सिनेमे...

लेखक चिनार यांनी सोमवार, 10/08/2020 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अक्षय अन सैफचं मैं खिलाडी तू अनारी गाणं सुरु होतं. काही आवाज, काही ओळखीचे वास डायरेक्ट भूतकाळात घेऊन जातात. तसं हे गाणं मला अंबापेठेत घेऊन गेलं. अंबापेठ ! म्हणजे माझं आजोळ. अमरावतीच्या मध्यवर्ती भागात असलेली सगळ्यात जुनी वस्ती ! अंबापेठेचं आयुष्यातलं स्थान लिहिण्याजोगती प्रतिभा माझ्यात कधी येईल का ते माहिती नाही, पण आज त्यातल्या एका भागावर लिहिण्याचा प्रयत्न करतोय. अंबापेठेत पाहिलेल्या किंबहुना पाहायला मिळालेल्या सिनेमांची मोठी यादी तयार करता येईल. त्याकाळात आमिर, सलमान, शाहरुख ह्यांची चलती होती. तिघांचीही सुपरस्टार पदाकडे वाटचाल सुरु होती.