Skip to main content

लेख

चुकलेला नेम

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 07/10/2020 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
झोपाळ्याचा कुरकुरणारा आवाज अजूनही अंगणातून येत होता. मध्यानापासून आता सांजवेळ होत आली तरी गोपाळराव अजूनही झोपाळ्यावर तसेच बसले होते. झोपाळ्याच्या नक्षीदार लाकडी खांबावर मुंग्यांची रांग थबकत चालत होती. गोपाळराव मात्र आपल्या धोतराकडे रोखून बघत बसले होते.धोतरावरचा परवाचा दौतीचा निळा डाग अजूनही तसाच होता. त्या डागाशेजारीच आज नवीन डाग पडला होता. गर्द लाल रंगाचा तो उठून दिसत होता. खांबावरची एक मुंगी गोपाळरावांच्या हाताला डसली आणि त्याची तंद्री मोडली. हाताशेजारच्या पिस्तूलकडे त्यांचे लक्ष गेले.

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २)

लेखक दुर्गविहारी यांनी बुधवार, 07/10/2020 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
अफझलखानः- अफझलखान हा मुळचा अब्दुल्लाखान.एका भटारीण बाईचा मुलगा.पण आपल्या अंगभुत गुणाने आणि पराक्रमाने तो मोठा झालेला होता. अफझलखान हि त्याला विजापुर दरबाराने दिलेली पदवी होती. स्वभावाने अत्यंत क्रुर असा हा ईसम.कपट आणि दगाबाजी हि त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्येच होती.

दोन घडीचा डाव.....!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी मंगळवार, 06/10/2020 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
*दोन घडीचा डाव...* *"जीवनात ही घडी अशीच राहू दे"* .. सुखा-समाधानाच्या प्रसंगात, आनंदाच्या लाटांवर तरंगत असताना, प्रत्येकाला अगदी असचं वाटत असतं. पण *"घडीने घडी काळ आयुष्य नेतो.."* या कटू सत्याचं भान मात्र आपल्याला कधीच नसतं. त्यामुळे बरेचदा जीवनात अचानक नैराश्य येतं. एकाकी अन् असहाय्य वाटतं, आणि आपलं जीवन व्यर्थ आहे की काय...? असे विचार मनात रुंजी घालू लागतात. त्यासाठी हे सिंहावलोकन किंवा एक विचार मंथन.....!!! चौ-यांशी लक्ष योनीतून प्रवास झाल्यावर म्हणे हा मनुष्याचा जन्म येतो. ती आपली सर्वात मोठी देणगी असते. हे आपण कालौघात विसरतो.

बळी तो कान पिळी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/10/2020 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे एवढ्यात तीन बातम्या ऐकण्यात आल्या. दर्जेदार वृत्तपत्र आणि राष्ट्रीय चॅनलवरुन या बातम्या ऐकल्या असल्याने या अफवा नसाव्यात, त्यांत तथ्य जरुर असावं : बातमी क्रमांक एक : ‘तयार होऊ घातलेली करोनाची लस (अनेक असल्या तरी) जगातल्या काही श्रीमंत देशांनी आधीच बुक करुन ठेवल्या. म्हणून अशा काही लसींना अधिकृत मान्यता मिळताच त्या श्रीमंत देशांना आधी पुरवल्या जातील.’ विसनशील आणि गरीब देशांपर्यंत ही लस पोचायला म्हणून खूप उशीर होणार आहे. तोपर्यंत अनेक लोक आपला प्राण गमावू शकतात.

पेटता दिवा (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी गुरुवार, 01/10/2020 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
जंगलाच्या वेशीबाहेर ते दोघे उभे होते. केशव आणि राघव. दोन्ही हात कमरेवर ठेवून, ते आत खोलवर जंगलाकडे बघत होते. जंगलाच्या खोलीचा, घनतेचा अंदाज घेत होते. आज त्यांनी पैज लावली होती होती. आणि ती आजच पूर्ण करायची होती. शाळा नेमकीच सुटल्याने, ते लगबगीने जंगलाकडे आले होते. कोणी आपल्याला पाहिले नाही ना? याची भिती होती. परंतु तसे काही झाले नव्हते. ते दोघे त्या जंगलाच्या वेशीबाहेर उभे होते. सूर्य मावळतीला आला होता. डोंगराआड जाण्याची त्याची लगबग सुरू झाली होती. कोणत्याही क्षणी, तो त्या मोठ्या डोंगराआड अदृश्य झाला असता.

मावळतीला

लेखक Pratham यांनी मंगळवार, 29/09/2020 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस मावळतीकडे झुकताना सावल्या अदृश्य होऊ लागतात.मनात एक हुरहूर लागून राहते.ती हुरहूर आपल्याला नेमक्या शब्दांत व्यक्त करता येत नाही,हवीहवीशी तरीही नकोशी.एक वेगळीच भावना असते ती.चार भिंतीमध्ये बसून राहिले तर मन उदासीन होते तेच जर मोकळ्या हवेत गेले तर एकदम शांत वाटते,अस्तित्वाची जाणीव होते.सूर्य मावळतानाचे दृश्य खूप सुखद वाटते.सूर्य हळूहळू कलत असतो,आकाशात तांबड्या-केशरी रंगाची उधळण असते.एखाद्या तळ्या किनारी मावळतीचे दृश्य भलतेच सुंदर दिसते.पाण्यावर सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते,आकाश लाल रंगात न्हाहून गेलेले असते,पक्षी दिवसभर अन्नासाठी भटकून परतताना दिसतात.झुंडीने ते एका संथ लयीत उडत असतात.पाण्य

"मित्रा"स पत्र...!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी रविवार, 27/09/2020 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
*"मित्रा"स पत्र...!!* आज *"रवि"* वार, माझा आवडता वार. रोजच्याप्रमाणे सकाळी, पक्षांच्या किलबिलाटाने लवकर जाग आली. लोळत बसण्याचा कंटाळा आहेच मला. पटकन चहा घेऊन तुझ्या आठवणीने माडीवर गेले. आजही तुझं दर्शन नशिबात दिसेना... मस्त ढगाळ हवा होती. गार वाराही सुटला होता... काय रे हे.....? किती वेळ वाट पाहू..? दोन दिवस झाले आपली भेटच होत नाहीये. नुसत्याच मनात आठवणी दाटून येत आहेत. डोळ्यासमोर येतोय तुझा तेजस्वी चेहरा.. सकाळी भेटतोस, तेव्हा नं तू अगदी नुकत्याच न्हाऊ-माखू घातलेल्या लहान बाळासारखा निरागस, लालचुटूक दिसतोस.. तेव्हा मला खूप आवडतोस.. पण आज मात्र....

एस. पी. आम्ही फक्त तुलाच नाही तर आमच्या तारुण्याला देखील गमावलं आज....

लेखक अबोलघेवडा यांनी रविवार, 27/09/2020 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो SP ... कालच बातमी आली तू आम्हाला सोडून गेल्याची आणि खरं सांगतो तुझा चेहरा आणि आमच्या आठवणीतलं आमचं तारुण्य दोन्हीही पकडीतून निसटून गेलं बघ... बातमी वाचली तेव्हा कुठे कळलं की तू ७४ वर्षांचा होतास. हो कारण या अगोदर आम्ही तुला तुझ्या आवाजामुळे सतत तरुणच समजत होतो. आवाजाला कुठे रे असतं कधी वय? आणि तू जी हिट गाणी दिलीस ना तेव्हा आमचं तारुण्य ऐन भरात होतं त्यामुळे SP कधी म्हातारा होऊच शकत नाही अशी ठाम समजूत झाली होती आमची. मैने प्यार किया (१९८९) पासून तू जो आमच्या तारुण्यात आलास तिथपासून ते हम आपके है कौन (१९९४) पर्यंत म्हणजे आमचं सगळं कॉलेज विश्व तू बरोबर व्यापून राहिलास.

चक्र (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 22/09/2020 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
ती लगबगीने लोकलमधून खाली उतरली. लोकल तशीच पुढे निघून गेली. रात्र बरीच झाली होती. सगळीकडे सामसूम जाणवत होती. तिचा हा नित्याचाच प्रवास होता, पण आज उशीर जरा जास्त जाणवत होता. लोकलचा प्रवास नित्याचाच असला तरी, एवढा उशीर तिला अपेक्षित नव्हता.      ते उपनगर नवीनच वसलेले असावे. जास्त रहदारी, धावपळ जाणवत नव्हती. ती स्टेशनवर उतरली, तेव्हा दोन-चार रिक्षा, काही तुरळक माणसे स्टेशनवर  दिसत होती. बाकी सर्व शांतता जाणवत होती. ती लगबगीने स्टेशन बाहेर आली. तिने एकदाआजूबाजूला नजर फिरवली. रिक्षा करावी का? हा विचार मनात डोकावला.