Skip to main content

लेख

स्मरण रंजन ४

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शनिवार, 24/10/2020 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण रंजन रेडिओ( ४) कोई लौटा दे मेरे...    ज्या फिलीप्स रेडिओ चा ऊल्लेख केला  तो  कालौघात कुठे गेला लक्षात नाही. गावतल्या घरी त्याची जागा ट्रांझिस्टर ने  घेतली. त्याचा  वेगळा रुबाब. सेलवर चालणारा. कातडी वेष्टण. स्टीलच्या काड्याचे खालीवर करता येणारे एरिअल. कुठेही घेऊन जा. शेतात पण. 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.' एके संध्याकाळी शेतात पं.भीमसेनजी आणि बालमुरली कृष्णन यांची जुगलबंदी ऐकल्याचे आठवते.      त्या काळी लग्नात  हुंडा म्हणून ' रेडू ' ,'घडी, 'सायकल 'इ.मागायची  प्रथा.

स्मरणरंजन

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 23/10/2020 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
                          स्मरण रंजन. रेडिओ (३)      'पगला कहीं का !' लंका. लंकेची ओळख अगदी लहानपणापासून. रामाच्या गोष्टीतून. रावणाची लंका. त्याने सीतेला पळवल्यावर जिथे ठेवले ती लंका. हनुमंताने जाळली ती लंका. रामाने समुद्रावर सेतू बांधला ती लंका. रावणवधानंतर बिभिषणाकडे सोपविली ती लंका.    पूढे पं.भीमसेनजींच्या गाण्यात तिचे भारी कौतुक ऐकले.

स्मरणरंजन २

लेखक नीलकंठ देशमुख यांनी गुरुवार, 22/10/2020 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण रंजन रेडिओ (२)   गुजरा हुआ जमाना.. अकराव्या वर्षी बीडला शिक्षणासाठी. काकांकडे. तिथे मोठा रेडिओ 'मर्फी'. रेडिओ पेक्षा त्याची गोड बाळाची जाहिरात जास्त प्रसिद्ध. रात्री उशीरा, 'आपली आवड'. सर्वांचीच. सुमारे वर्षभर ' देहाची तिजोरी', 'मला हे दत्त गुरू दिसले,' 'मी डोलकर' ,' वादळ वारं सुटलं रं' , इ.गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. बहुधा शनिवारी सकाळी भावसरगम. नवनवीन भावगीते. महान संगीतकार कै.श्रीनिवास खळे यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी  याच कार्यक्रमात दिली. शुक्रतारा मंदवारा... आकाशवाणी च्या राष्ट्रीय प्रसारणात  आठवड्यातून एकदारात्री  शास्त्रीय संगीता चा कार्यक्रम.

प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी बुधवार, 21/10/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे २२.०६.२०१९ . काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात, प्रथम भेटीतच भारावून टाकतात. मुंबई ते पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली.

स्मरणरंजन

लेखक नीलकंठ देशमुख यांनी बुधवार, 21/10/2020 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरणरंजन रेडिओ (१) बचपन के दिन. माझा जन्म खेड्यातला .आडगाव. जि.बीड. वयाच्या दहा/अकरा वर्षापर्यंत तिथेच वाढलो. कळायला लागल्यापासून घरी रेडिओ. आजोबांच्या बैठकीत एका कोनाड्यात.फिलीप्स कंपनीचा  सुबक. बॉक्स आकाराचे एवरेडी बॅटरी वर चालणारा. ईंग्रजी नाईन चे आकड्यातून उडी मारणारी मांजर. बॅटरी वर्षभर चालायची. मग तालुक्याचे गावाहून (माजलगाव)दुसरी आणायची.  जुनी बॅटरी अंगणात  फोडणे हा माझा  कार्यक्रम. त्यात, पितळी पट्ट्याचे चौकटीत , कोळशासारख्या पदार्थाच्या टोस्ट च्या आकाराच्या वड्या . त्या फोडल्या वर पाणी निघे. पितळी पट्टया सोनार घेउन जाई. फुकट.

पाणिनी ह्यांचे संस्कृत

लेखक साहना यांनी बुधवार, 21/10/2020 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
“We can now assert, with the power of hindsight, that Indian linguists in the fifth century B.C. knew and understood more than Western linguists in the nineteenth century A.D. Can one not extend this conclusion and claim that it is probable that Indian linguists are still ahead of their Western colleagues and may continue to be so in the next century? Quite possible; all we can say is that it is difficult to detect something that we have not already discovered ourselves.” - फ्रिट्स स्टाल ( UC बर्केली चे प्राध्यापक) दोन विद्यार्थी पाठशाळेंत व्याकरण शिकत होते.

भिती

लेखक VRINDA MOGHE यांनी सोमवार, 19/10/2020 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
भिती आज दुपारपासुनच मळभ दाटून आलय. हवेतला उष्माही वाढलाय. आलोक गेले पाच दिवस ऑफिसच्या टूरवर दिल्लीला गेलाय. अस्मिताला एकटं रहायची खुप भिती वाटते खरंतर, ती कधीच आजवर एकटी राहिलीच नाहीए. सासुबाई येणार होत्या पण तब्येतीमुळे नाही आल्या. नाईलाज झाला अस्मिताचा. त्यात अस्मिता- आलोक या नव्या बिल्डींगमधे नुकतेच रहायला आलेले. इतर दोघे तीघेच रहायला आलेत. पण अजून ओळखी नाही झाल्या. समोरच्या रस्त्यावर रहदारी आहे . दोन-पाच दुकानं आहेत..थोड्या अंतरावर आणखी बिल्डींगची बांधकामं चालू. त्यातल्या मजूरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या झोपड्या...बाकी जास्त वस्ती काही नाही, अशा परिस्थितीत अस्मिता खुपच घाबरून गेलीय.

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ४)

लेखक दुर्गविहारी यांनी सोमवार, 19/10/2020 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
यापुर्वीचे भाग आपण ईथे वाचु शकता अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३) भेटीसाठी शामियाना उभारिला:-

भेटीसाठीजी जागा शिवाजी महाराजांनी निवडली ती सुध्दा अतिशय मोक्याची होती.टेहळणी बुरुजाच्या खाली सपाट

नवरात्र बेंगळुरूची - संपूर्ण

लेखक पॉइंट ब्लँक यांनी रविवार, 18/10/2020 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
बंगळुरूला व्हाईटफिल्डमध्ये देवीचं एक मंदिर  आहे -पिलेकाम्मा देवी मंदिर . दरवर्षी  नवरात्री मध्ये  ह्या मंदिरात पिलेकाम्मा (दुर्गा ) आणि चौडेश्वरी  ह्या दोन्ही देवींची  नऊ वेगवेगळ्या स्वरूपात पूजा केली जाते. नऊ दिवस ह्या नऊ स्वरुपाची आरास इथे प्रकाशित करण्याची इच्छा आहे. ( हाच धागा रोज एडिट करता येईल का?

ऑस्कर ग्रोएनिन्ग-ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 17/10/2020 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्कर ग्रोएनिन्ग-ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक) Simple, Free Image and File Hosting at MediaFire नुकतीच नेटफ्लिक्स वर The Accountant Of Auschwitz ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)हि डॉक्यूफिल्म पहिली. ज्यांना दुसऱ्या महायुद्धाबद्दल थोडेफार तरी माहिती असते त्यांना ऑश्वित्झ छळ छावणीबद्दल वेगळे सांगायची गरज नसते पण ज्यांना काहीच कल्पना नाही त्यांच्या करता म्हनुन थोडक्यात सांगायचे तर दुसऱ्