Skip to main content

लेख

शुन्य टिंब एक

लेखक नीळा यांनी सोमवार, 15/02/2021 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे माफी मागणे. पहिल्यांदा ज्या आयडी चा अकाऊंट माम्ही हॅक केलाय म्हणजे नीळायांचा..सर माफ करा पण माम्हचा पण नाईलाज आहे…माम्हची कहाणी ऐकली की तुला कळेलच…समजुन पण घ्यालच. दुसरी गोष्ट म्हणजे ईतर सगळ्या वाचकांना…. माम्हची भाषा तोडकी मोडकी वाटते ना?…म्राठी हि काही माम्हची योनभाषा नाही…आणि माम्हच्या दुनिया मधल्या काही संकल्पना.. शब्द तुच्या भाषेत नाहीतच. तर थोड समजुन घ्या… हळूहळू सवय होईल, माम्हालाहि आणी तूलाही. ईथेच कहाणी षांगायच मुख्य कारण म्हणजे यक्क.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
नदीच्या प्रवाहात दोन अनोळखी आणि दूरचे दगड एकमेकांना भेटावेत तशी माणसांच्या समुद्रातील आपली भेट. जिथे भेटलो तिथेच नदीचा सागर झाला. निदान आपल्यापुरते तरी नवीन दगडांवर आदळणे थांबले. पूर्वी आधार शोधणारे हात आता एकमेकांच्या आधाराला सज्ज होते. माणसांची स्वयंभू नदी तशीच वाहत होती. मनाला वाटलं तेव्हा आपणही प्रवाहात पुन्हा मिसळायचो, पण आता आवडत्या वळणावर क्षणभर विश्रांती घेताना प्रवाहाच्या मागे पडायची फिकीर नसायची. मातीत रुजलेल्या बी सारखा मी तुझ्यातून अंकुरत होतो. ना मला वाढायचं होतं ना फळाफुलांनी बहरण्याची आस होती. धरतीतून उगवलेला अंकुर आकाशाच्या ओढीनेच वाढत असतो.

गुमोसोस आणि अफ़सोस

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 14/02/2021 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गुलमोहर सोसायटीची अनेक 'व्हॉटस ॲप' मंडळं आहेत. त्यांची नावं काय असावीत या विषयापासूनच त्यांच्यामध्ये कधी मनोरंजक तर कधी अतिरंजित चर्चा होत आल्या आहेत. वास्तविक बरेच दिवस आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरातल्या, नात्यातल्या, मित्रांतल्या इत्यादी ‘व्हॉटस ॲप’ मंडळांमध्ये मान्यता आणि धन्यता पावत होतो; पण सोसायटीचं असं मंडळ व्हायला हवं हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ करायला आम्हांला परुळेकर मामा लागतात. ते स्वतः गेली वीस वर्ष, निवृत्त झाल्यापासून, सोसायटीचे सेक्रेटरी (आणि सर्वांचे एल. आय. सी. एजंट) आहेत.

अडगळीतला साप (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 13/02/2021 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
अडगळीतला साप (कथा) तसा तो दोन दिवसांपूर्वीच माझ्या नजरेस पडला होता. पण तेव्हा मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या रात्रीच्या मंद प्रकशात, मला बहुतेक त्याची शेपटी दिसली असावी. पण मी अर्धवट झोपेच्या अवस्थेत असल्याने, त्याकडे निरखून पाहिले नाही. असेल एखादी दोरी, ती लोंबत असेल अशी बोळवण करून, मी झोपलो होतो. खरेतर सकाळी उठल्यावर, वर पत्र्याकडे पाहणे माझे काम होते. त्या पत्र्याच्या कोपऱ्यावर, रात्री आपण काहीतरी पाहिले होते. तेव्हा ती आपल्याला दोरी वाटली, पण सकाळी उठल्यावर तेथे दोरी असायला हवी होती. पण घाईगडबडीत मी ते सगळे विसरून गेलो. आणि तो तिथेच वरती, त्या पत्र्याच्या अडगळीत, तसाच बसून राहिला होता.

आमचा Valentine Week - क्रशामि क्रशावः क्रशामः

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 09/02/2021 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
C - R - U - S - H - CRUSH ज्या काही थोड्याफार भाषा कळतात / समजतात किंवा आवडतात त्यामध्ये इंग्रजी Crush ला समर्पक समानार्थी शब्दच सापडत नाही हो. आमची मराठी मुळातच रांगडी आणि इरसाल. Crush च्या नाजुकपणाला इथे जागा कमीच. संस्कृत ही साक्षात देववाणी. तिथे Crush मधली अगतिकता नाही. हिंदी मध्ये Crush मधला छिछोरपणा नाही. उर्दू Crush सारख्या अर्धवट गोष्टींमध्ये इंटरेस्टच घेत नाही. तिथे म्हणजे एकदम तबाही का मंजर - आग का दर्या है और डूब जाना है वगैरे मयखान्यातला सीन. पंजाबीत "मर जावां गुड खाके" असलं तरी Crush मधलं अव्यक्त राहणं पंजाबीला मंजूर नाही.

शिक्षणाचे मानसशास्त्र: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला....

लेखक राजा वळसंगकर यांनी गुरुवार, 04/02/2021 21:51 या दिवशी प्रकाशित केले.

आजोबांचे डोळे चकाकले. "द गेम इज अफूट माय डीअर वॉटसन. लेट अस कँच द चॉकलेट चोर!"

घडले असे: चिंटू, चिऊ आणि त्यांची चुलत भावंडे मिनी आणि मोंटू पहिल्या मजल्यावर शेजारी राहतात. आजी आजोबा तळ मजल्यावर रहातात. दुसऱ्या मजल्यावर आजोबांचे भाऊ आणि त्यांची मुलं रहात होती, पण गेली काही वर्षे ते इंग्लंड-अमेरिकेत आहेत. बिल्डिंग मध्ये अजून तिसरे कुणी नाही. त्यामुळे एकत्र कुटुंबाचे घर असल्यासारखे आहे. सहाजिकच, चौघेही मुलं बहुतेक एकत्रच असतात. सगळे दरवाजे सताड उघडेच असतात, मुलं सर्व घरात मुक्तपणे वावरतात. मुलं रोज संध्याकाळी चार वाजता आजोबांच्या सोबत सोसायटीच्या ग्राउंडवर खेळायला जातात.

अलक चाहुल

लेखक नीळा यांनी मंगळवार, 02/02/2021 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
सारख जाणवत होत ती आसपास वावरतेय. रिकाम्या घरात बेडरूममध्ये मधुन कीचन तीथून हॉल. क्षणभर हार घातलेल्या तीच्या फोटो समोर स्थब्ध. सारा सारा वेळ मागे पाठीशी तीचीच चाहुल, तीचाच गंध,जीवघेणी हुरहूर.चुकुनच लावलेला तीचा शांपू!

अहिराणीचे भवितव्य

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/02/2021 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आधी बोलली जाते ती बोलीभाषा. बोलीभाषाच कालांतराने प्रमाणभाषा होत जातात. मात्र अनेक बोलींपैकी काही बोलीभाषा आज नामशेष झालेल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात. हा बदल आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच अस्तित्वात होती. परंतु आज तीच भाषा आपल्या राष्ट्रभाषेचा मान मिळवू पहातेय. त्याचप्रमाणे सिंधी, गुजराती आणि मराठी ह्या भाषासुद्धा प्राथमिक अवस्थेत केवळ बोलीभाषाच होत्या.

पतंग....!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 29/01/2021 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
पतंग...!! नऊ वाजले तसं भिकूशेठनं दुकान उघडलं. त्या छोट्याशा जागेत, एकदम प्रकाश पसरला. अरेच्च्या, सकाळ झाली वाटतं.. पण आळोखेपिळोखे द्यायची इथे सोयच नाही. खालच्या वरच्यांच्या हातापायांचे धक्के खात नुसतं दाटीवाटीनं महिनोन् महिने बसून रहायचं.... काय हे आपलं जीवन...!! तेवढ्यात कोणातरी गि-हाइकाची चाहूल लागली. "शेठ पतंग आहे का हो तुमच्याकडे...?" माझे कान टवकारले. मनात गुदगुल्या झाल्या. चला जागा तरी बदलेल आज माझी... भिकूशेठ रॅकपाशी आले आणि पतंगाचा गठ्ठा टेबलावर गेला. थोडं पाहून झाल्यावर मुलाचे बाबा म्हणाले, "गोलू, तुला कोणता पतंग आवडला..?" अं..अं.. बाबा, मला लाल पतंग हवाय.. "लाल"....??

लंगडा (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शुक्रवार, 29/01/2021 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
लंगडा (गूढकथा) त्याने पुन्हा एकदा आवाज दिल्यावर मात्र, माझा नाईलाज झाला. मी जागेवर थांबलो. तो दुडक्या चालीत माझ्याकडे येत होता. तो डाव्या पायाने लंगडा असावा. आपला डावा हात गुढग्याच्या थोडा वर टेकवून, तो माझ्या दिशेने येऊ लागला. मला नवल वाटले. कोण पाठीमागून आवाज देतोय, म्हणून मी वैतागलो होतो. पण आता ही त्याची लंगडी स्थिती पाहून, मला उगीच थोडासा खेद वाटून गेला. याच्याशी नारमाईने वागायला हवे, असे उगीचच वाटून गेले. आमच्यातले ते वीस पंचवीस मीटरचे अंतर कापायलही, त्याला बराच वेळ लागला. तो माझ्याजवळ आला. माझ्याकडे बघून त्याच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान उमटून गेले.