Skip to main content

लेख

हिंदी, काका कालेलकर आणि ३ वर्षे

लेखक माहितगार यांनी रविवार, 06/07/2025 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर मराठी-हिंदी वाद रंगवत खळ-खट्याक नाट्य चालु असल्याचे बातम्यांच्या हेडलाईन्स मधून दिसते. त्या बातम्या असोत का मिपावरील संबंधीत धागा असो मी उघडण्याचे कष्ट यावेळी अद्याप तरी घेतले नाहीत. चार सहा नगरसेवकांना निवडून आणण्या पलिकडे अशा चहाच्या पेल्यातल्या वादळा पलिकडे मराठी लोकांमध्ये गांभीर्य किती आणि तोंड देखले पणा किती ह्या बद्दल कमी बोलावे तेवढेच बरे. असो. असो माझं टोपणनाव माहितगार, योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध करण्याचा प्रयास करावा हे माझे काम.

कॉर्बेटचं मृगजळ

लेखक आकाश खोत यांनी शुक्रवार, 27/06/2025 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या मे आम्ही उत्तराखंडला जाऊन आलो तिथे आम्ही नैनीताल आणि जवळपासच्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. शेवटचा दिवस आम्ही जिम कॉर्बेट अभयारण्यसाठी राखून ठेवला होता. पूर्वतयारी जिम कॉर्बेटची सफारी त्यांच्या वेबसाईट वर आधीच बुक करावी लागते. शेकडो एकर परिसर असल्यामुळे तिथे वेगवेगळे झोन आहेत. बिजरानी, झिरना, ढिकाला, ढेला अशी त्या झोन्सची नावे आहेत. अजूनही आहेत. तिथे जाण्यासाठी विमानमार्गे पंतनगर / हल्द्वानी हे विमानतळ आहे. रामनगर हे रेल्वे स्टेशन आहे. ह्याच गावाजवळ बरेच झोन आहेत त्यामुळे इथे बरीच वर्दळ असते. बहुतांश लोक याच गावात मुक्कामाला राहून कॉर्बेटला जाऊन येतात.

जागतिक योग दिवशी ऋषभ पंतचं प्रात्यक्षिक!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 26/06/2025 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
✪ ऋषभ पंतची कोलांट उडी (कार्टव्हील) ✪ आधीच्या बॉलला काहीही होवो, पुढचा बॉल नवा ✪ Uncluttered mind, हसरा चेहरा आणि जिद्द ✪ प्रत्येक क्षणी वर्तमानात असणं "ध्यानाचं" प्रात्यक्षिक ✪ शेकडो वेळेस उड्या मारण्याची क्षमता ✪ संयम, सातत्य, संकल्प शिकवणारा खेळ ✪ रंग हो अकेले तो इन्द्रधनुष बनता ही नही! ✪ ठरवलेल्या प्रकारे तासन् तास खेळण्याचं कौशल्य ✪ मैदानावरचं मैदानावर सोडून देण्याची कला! नुकताच झालेला भारत- इंग्लंड कसोटी सामना! शेवटच्या तासापर्यंत रंगत कायम असलेला व अटी- तटीचा झालेला हा सामना!

आकाशात तार्‍याचा स्फोट- ल्युपस तारकासमूहामध्ये सुपरनोव्हा

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 24/06/2025 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
स्फोटामुळे 50 लाख पट तेजस्वी झालेला तारा डोळ्यांनी दिसू शकेल सुपरनोव्हा (अति नवतारा) म्हणजे तार्‍याचा स्फोट होण्याची स्थिती. तार्‍यांच्या जीवनक्रमामध्ये शेवट होण्याची एक शक्यता असा स्फोट ही असते. तार्‍यांचं युगुल (पेअर) असेल व एक तारा खुजा (ड्वार्फ) असेल किंवा तार्‍याचं वस्तुमान जास्त असेल तर असा स्फोट होतो. स्फोट झालेला तारा दक्षिणेकडच्या वृक म्हणजे ल्युपस (Lupus) तारकासमूहातला +22.3 प्रतीचा तारा होता. त्याचा स्फोट झाल्याचं 12 जूनला लक्षात आलं.

सृष्टीआड दृष्टी

लेखक कुमार जावडेकर यांनी सोमवार, 16/06/2025 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुलाखत: “नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली. “पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले. “हा आपला विनय आहे.

बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 15/06/2025 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा ====================== मंडळी, मागील आठवड्यात केलेले युयुत्सुनेटचे भाकीत बरोबर ठरले आहे. पण मी लावलेला अर्थ चुकला. त्यामुळे या खेपेस मी माझं डोकं चालवायचं नाही असं ठरवलं आहे.

आपण अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार आहोत का!

लेखक मार्गी यांनी शनिवार, 14/06/2025 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
✪ Too much comfort ultimately leads to much discomfort ✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक ✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का? ✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू? ✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर? ✪ आपत्ती येणारच आहेत ✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो? डॉ. जयंत नारळीकरांची एक विज्ञानकथा होती. पृथ्वीवर सर्व कामे यंत्रे करत जातात. ह्या यंत्रांचं नियंत्रण काही कंप्युटर्स करतात. आणि हे कंप्युटर्सही नंतर इतके वाढतात की, त्यांचं नियंत्रण एक सुपर कंप्युटर करतो.

Ee Sala Cup Namde अखेर सत्यात उतरले..

लेखक सुजित जाधव यांनी रविवार, 08/06/2025 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही फक्त किडनी, लिव्हर आणि दिलच जिंकू शकता आयपीएल ट्रॉफी तुमच्या नशिबात नाही.. विराट कोहली आरसीबीसाठी पनौती आहे त्याच्यामुळे आरसीबी ट्रॉफी जिंकत नाहीये.. विराटने एकतर टीम बदलावी किंवा आयपीएल खेळणे सोडून द्यावे.. या आणि अशाच प्रकारे विराट, विराट फॅन्स आणि आरसीबीला ट्रोल केले गेले, मजाक उडवला गेला, सल्ले दिले गेले. १८ वर्षे, तब्बल १८ वर्षे आरसीबी एका आयपीएल ट्रॉफी साठी झगडत होती, चाहते तळमळत होते. यादरम्यान २- ४ वेळेस आरसीबी जेतेपदाच्या अगदी जवळ सुद्धा गेली पण कधी नशीब तर कधी समोरील संघाच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना ट्रॉफीने हुलकावणी दिली.

सलाम वेंकी...उत्तम हिंदी चित्रपट

लेखक नपा यांनी शनिवार, 07/06/2025 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला हा - काजोल, विशाल जेठवा यांच्यासह आमिर खान ची छोटी भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच 'चॅनेल सर्फिंग' करताना दिसला. एवढ्या सशक्त अभिनेत्यांचा हा कोणता सिनेमा आपण पाहीला नाही, या विचाराने सर्फिंग थांबले. जसजसं कथानक पुढे सरकायला लागलं, तसतसं न पाहिलेल्या भागाचा अंदाज येऊ लागला आणि चित्रपटात गुंतत गेलो - याचे श्रेय नक्कीच दिग्दर्शक रेवती (दक्षिणात्य अभिनेत्री), पटकथा लेखक समीर अरोरा व कौसर मुनीर या त्रयीना जातं. हा चित्रपट श्रीकांत मूर्थी यांच्या The Last Hurrah या पुस्तकांवर आधारित आहे.

युरोमेरीका आणि रशिया प्रदीर्घ हित संघर्ष

लेखक माहितगार यांनी शनिवार, 07/06/2025 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
धागा लेख प्रेर्ना आपले पटाईत सर हे खरं आहे की युरो-अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर आपले आर्थिक आणि व्यापारी हितसंबंध साध्य करण्यासाठी नव-आर्थिक वसाहतवादाचे प्रारूप राबवले. आपले हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी असंख्य देशांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रचंड हस्तक्षेप केला आहे आणि तो आजही चालू आहे.