Skip to main content

लेख

ढग

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 27/04/2021 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाच्या आयुष्याचा दोर कधी तुटेल आणि कुणावर नशीब कधी मेहरबान होईल या गोष्टी सदैव अंधाराच्या मुक्कामाप्रमाणे मानवाला अज्ञातच राहतील. परंतु असे आहे म्हणून जेवढे हाती उरते त्या आयुष्यालाच बेभरवशाचे करण्यात काय अर्थ आहे? सध्या अविश्वास आणि अस्वस्थतेने आपल्याला अशी घट्ट मिठी मारलीये की प्रत्येक श्वासावर आणि कृतीवर त्यांचा प्रभाव जाणवतो आहे. आनंद, समाधान, हास्य या नैसर्गिक भावनांचा प्रसवदर कमालीचा खालावला आहे. आपल्या मनातली स्वतंत्र विचारांची अमानुष भ्रूणहत्या कळसाला पोहोचली आहे. आपल्याला सगळं काही स्वतःचं आणि स्वतःकरिता हवं आहे केवळ विचार सोडून.

आमचीबी आंटी जन टेस

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/04/2021 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमचीबी आंटी जन टेस गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं. त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला. या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

जुन्या पिढीतली अभिनेत्री- विम्मी आणि तिची शोकांतिका

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 23/04/2021 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज विमलेश अर्थात् विम्मी ह्या अभिनेत्रीचं नाव फारसं कोणाला आठवणार नाही. पण तिच्यावर चित्रित झालेली काही गाणी अजूनही प्रसिद्ध आहेत. सुनील दत्त आणि राजकुमारसोबतच्या "हमराज़" ह्या चित्रपटामधील तिच्यावर चित्रित झालेली ही गाणी आजही ऐकली- बघितली जातात आणि ह्या गाण्यांमध्ये एक हसरा चेहरा आपल्याला दिसतो.

सेकंड लाईफ - भाग ८

लेखक अक्षरमित्र यांनी मंगळवार, 20/04/2021 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
२-३ आठवड्यांनी येऊन घर बघेन असे सांगून पुन्हा मुंबईस आलो मात्र लवकर परत जाणे शक्य झाले नाही. एकातून दुसरे, दुसर्‍यातून तिसरे अशी कामे वाढतच चालली होती. गया फिर आज का दिन भी उदास कर के मेरी अशी अवस्था झाली होती. दर वेळेस तृप्तीशी, आई बाबांशी खोटे बोलणे जीवावर येत होते. मात्र सेकंड लाईफ जगण्याची उर्मी वारंवार मनात येत असे. त्या स्वप्नाचा पाठलाग करणे अवघड होत चालले होते. मात्र एप्रिल च्या शेवटी पुन्हा संधी चालून आली. तृप्तीच्या मावस बहिणीचे मे महिन्यात लग्न होते त्यामुळे तिला १५-२० दिवस अगोदरच गावी जायचे होते.

संदर्भांच्या शोधात

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 20/04/2021 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज बरोब्बर दोन महिने झाले पांढर्‍यावर काळं करून. किंबहुना व्यक्त होण्यासाठी विषयच सापडत नव्हता. आजकालची परिस्थिती बघता "किंबहुना" या एका शब्दावर एक लेखमाला लिहिली जाऊ शकेल हा भाग अलाहिदा! बहुतेक वेळा मी क्रिकेट आणि इतर खेळांबद्दल लिहितो कारण खेळांमधली सकारात्मक ऊर्जा मला भावते. पण सध्या चालू असलेल्या क्रिकेटचा देखील काही संदर्भ लागत नाही हो. आधी त्या अतिभव्य रिकाम्या स्टेडियम्समध्ये उगाच रतीब टाकल्यासारख्या टी-२० आणि वन डे खेळवल्या गेल्या. ते पण एकीकडे विजय हजारे ट्रॉफीसारखी महत्वाची डोमेस्टिक स्पर्धा चालू असताना आणि जुलै - ऑगस्टमध्ये पुन्हा इंग्लंडचा दौरा असताना.

Index Investing भाग २

लेखक अतरंगी यांनी रविवार, 18/04/2021 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १:- http://misalpav.com/node/48675 आपण जेव्हा आपल्या स्वकमाईचे पैसे जास्त परताव्याच्या अपेक्षेने गुंतवत असतो तेव्हा सर्वात आधी त्यातले फायदे आणि तोटे समजून घ्यायला हवेत. आपण ज्यात पैसे गुंतवत आहोत त्यात काय, किती आणि कोणत्या प्रकारची रिस्क आहे हे समजून घ्यायला हवे. या भागात आपण Index Investing चे आणि वेगवेगळ्या ईंडेक्सचे फायदे/ तोटे पाहू. १. Broad Based Indices:- ह्यात प्रामुख्याने Nifty 50, Sensex, Nifty next 50 सारख्या ईंडेक्स येतात. याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे यातील कंपन्या फक्त मार्केट कॅप वर ईंडेक्स मधे असतात.

जादूगार (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी रविवार, 18/04/2021 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
  जादूगार (रहस्यकथा) गतकाळात घडलेल्या काही घटनांचे पडसाद, तुमच्या अंतर्मनात असे काही उमटलेले असतात की, त्यांच्यापासून तुमची सुटकाच होऊ शकत नाही. आता हेच बघा ना, इतर लोकांना जादू, जादूचे खेळ, ती जादू करणारा जादूगार किती आवडतात! अगदी मनापासून! अगदी तन मन हरपून ते जादूचे खेळ पाहतात. पण माझे तसे नाही. मला जादूगार अजिबात आवडत नाही. आणि त्यांचा तो जादूचा खेळ तर, मुळीच नाही. उलट या अशा जादूगाराबद्दल, मला अतिशय घृणा वाटते. सरसकट सगळे जादूगार हे धोकेबाज, कावेबाज आणि मतलबी असतात, अशी माझी पक्की धारणा आहे. ते तुम्हाला कधी फसवतील, कधी तुमच्यासोबत धोकेबाजी करतील, याचा नेम नाही.

गोष्ट सांगा गणित शिकवा .... 8

लेखक राजा वळसंगकर यांनी शनिवार, 17/04/2021 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणेला आय आर एस आर्यभट्टवर कॅप्टन नेमोंनी सहकारी म्हणून स्वीकारलं होतं. सध्या त्रिकोणी ग्रहावर... एरेटॉसथिनिस काकाबरोबर समद्वीभुज खंडाकडे जायला निघाले... गोष्टीचा आधीचा भाग.... इथे टिचकी मारा ************************** माझ्यासाठी विंडो सीट बुक कराल का प्लिज एरेटॉसथिनिस काका? सायलीने पटकन आपला क्लेम लावला. मला पण ... चिंट्याने सूर मिसळला.

Index Investing भाग १

लेखक अतरंगी यांनी शनिवार, 17/04/2021 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतवणूक हा तसे पहायला गेले तर फार मोठी व्याप्ती असलेला आणि व्यक्तिसापेक्ष विषय आहे. गुंतवणूक कधी, कुठे, किती करावी याविषयी आंतरजालावर मुबलक प्रमाणात लेखन आहे. आजही अनेक जण स्वतःच्या ज्ञानानुसार याविषयी लिहित असतात. गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, त्यातील एक म्हणजे कंपन्यांचे समभाग म्हणजेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स. आजमितीला भारतात ५०४४ कंपन्यांचे शेअर्स लिस्टेड आहेत आणि हजार एक म्युच्युअल फंड आहेत. यात नक्की कोणत्या शेअर्स/फंड मधे गुंतवणूक करावी आणि किती हे ठरवणे हा फार अभ्यासाचा आणि क्लिष्ट विषय आहे.

हॅपी होली - एक चिंतन

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 16/04/2021 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल धुलीवंदनाच्या दिवशी मधूनच कोणीतरी अचानक समोर येतो आणि "हॅपी होली" असं काहीतरी म्हणत तोंडावर रंग फासतो. तेव्हा "अरे अरे .... हा तो दिवस नाही" असं म्हणण्याची संधी देखील मिळत नाही. रंग लावल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण आज धुळवड असते. रंग हा रंगपंचमीला लावतात - अशी आपली एक संकल्पना लहानपणापासून मनात फिट्ट बसलीये. हे म्हणजे नागपंचमीला कोणी "हॅपी राखीपौर्णिमा" असं म्हणून हातात राखी बांधली तर त्या भावाला किती विचित्र वाटेल, तसं धुलीवंदनाला कोणी रंग लावला कि वाटतं. आपल्याकडे "होळी" म्हणजे कालचा, म्हणजे धुलीवंदनाच्या आधीचा दिवस.