Skip to main content

लेख

अहं

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 23/05/2021 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. तर काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत. मी आणि मी, केवळ मी, ही मानसिकता त्यागल्याशिवाय समस्यांचे निराकरण अशक्य.

नाईट मेअर (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी बुधवार, 19/05/2021 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
नाईट मेअर (गूढकथा) त्या अरण्यात मी कसा पोहोचलो? हा प्रश्न गौण असला तरी, मी आता प्रचंड जखमी झालोय. अंगावर जागोजागी जखमा झाल्या आहेत. त्यातून सारखे रक्त गळत आहे. आणि मी असाच काही वेळ या अवस्थेत राहिलो तर, मृत्यू मला कधीही गाठेल आणि मी गतप्राण होऊन जाईल, ही वस्तुस्थिती मात्र मला नाकारता येणार नव्हती. मी नुसता धावत आहे. किती वेळ झाला, मला माहित नाही. पण मी सलग धावत आहे. तेही प्रचंड वेगाने. अंगात जेवढे त्राण आहेत, तेवढ्या वेगाने. तो मागचा लांडग्यांचा कळप, मला कधी गाठेल याचा नेम उरला नव्हता. ते मोठ्या धुडाचे दहा- पंधरा लांडगे, कधीही माझा फडशा पाडू शकत होते.

योगासने…… एक नवा दृष्टीकोन

लेखक पारुबाई यांनी सोमवार, 17/05/2021 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
Yoga is the journey of the self, through the self to the self …The Bhagwat Geeta. त्या दिवशी माझी योगशिक्षिका मला म्हणाली की, “अश्विनी, तुला समवृत्ती प्राणायाम जास्त आवडतो ना, मग तू त्याचा जास्त सराव कर. त्यातूनच तुला तू समजत जाशील.” मला काहीच समजेना. मला मी समजत जाईन म्हणजे? प्राणायाम करून स्वतःची ओळख पटते? योगासनांमुळे शरीराला आणि प्राणायामामुळे मनाला होणारे फायदे मला माहीत होते. पण त्यातून तुम्हीच तुम्हाला उलगडत जाता ही कल्पना माझ्याकरता नवीन होती. हा नवा अर्थ समजून घेण्यास मी अतिशय उत्सुक होते.

पात्रता

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 16/05/2021 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
गती, प्रगती अन् अधोगती हे प्रास साधणारे शब्द. कुठल्याशा वाक्यात टाकले की, देखणे वगैरे वाटतात. पण हेच शब्द आयुष्यात आले की, त्यांचे अर्थ बदलतात. ते समजून घेण्यासाठी अन्वयार्थ लावावे लागतात. परत परत पाहावे लागतात. पारखावे लागतात. आयुष्याच्या व्याख्या ज्याने त्याने आपापल्यापरीने करून ठेवलेल्या असल्या, तरी त्या पर्याप्त असतीलच असं नाही. प्रत्येकाचे पैलू वेगळे असतात. कोण कोणत्या कोनातून त्या कोपऱ्यांकडे बघतो यावर ते ठरत असतं. नजरेस पडणारे त्याचे कंगोरे निराळे असतात.

मौसमी....एक दुखरी सल

लेखक OBAMA80 यांनी रविवार, 16/05/2021 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझीम गिरे सावन... सुलग सुलग जाये मन... भिगे आज इस मौसम में.... लगी कैसी ये अगन.... पडद्यावरती या गाण्यात, अमिताभच्या गाण्यावर मोहित होऊन गालावर नाजूक, गोड खळी पडणारी मौसमी इतकी लोभस दिसते की बस....या गाण्यात तीच्या गोड दिसण्याकडे मन इतके आकृष्ट होते की किशोरच्या

गोष्ट एका सुजलाम सुफलाम जंगलाची

लेखक OBAMA80 यांनी सोमवार, 10/05/2021 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील प्राण्यांचा व घटनांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तिंशी व त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी संबंध नाही. यात वर्णिलेल्या घटनांचा जर सद्य किंवा भूतकाळातील घडलेल्या घटनांशी काही जरी संबंध आढळला तर तो किव्वळ योगायोग समजावा, ही नम्र विनंती) पूर्व, पश्चिम, उत्तर ते दक्षिण असे प्रचंड विस्तारलेले एक जंगल होत. गोड्या पाण्यांनी काठोकाठ भरलेली तळी, सुपीक जमीन, बारमाही वाहणार्‍या नद्या यांनी तो प्रदेश सुजलाम सुफलाम बनला होता. विविध प्रकारचे प्राणी त्यात गुण्यागोविंदाने रहात होते.

अपवाद

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 09/05/2021 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. आनंदाची अभिधाने आणि समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर. रंग येथून तेथून सगळीकडे सारखे असले, तरी त्यांच्या छटा वेगवेगळ्या असतात.

एक स्फुट... (निसर्ग आणि माझी पुस्तके)

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 09/05/2021 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक स्फुट... (निसर्ग आणि माझी पुस्तके) ....मी लहान असताना पहिले अनुवादीत पुस्तक वाचले ते ‘‘मोहॉकची रणदुंदुभी’’. लेखक (मराठी अनुवादक) आठवत नाही. अमेरिकेतील मोहॉकच्या खोऱ्यात गोऱ्यांनी जी वसाहत केली त्याच्या पार्श्र्वभूमीवरील ही कादंबरी... त्या वेळी तरी मला फार आवडली ती. त्यातील निसर्गासाठी. चांगली जाडजूड होती. The Drums of Mohwak ही इंग्रजी कादंबरी मात्र नेटवर कुठेतरी उपलब्ध आहे. मी एक दोन वर्सांपूर्वी याचा अनुवादही करायला घेतला होता. पण नंतर तो अर्धवट राहिला. त्यातील काही भाग खाली देत आहे.. एक तरूण जोडपे वसाहत करण्यासाठी निघालेले असते त्यांची ही गोष्ट आहे...

मादाम मेरी क्यूरी...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 08/05/2021 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
मादाम मेरी क्यूरी... ( काही शास्त्रीय शब्दांची मोडतोड झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही केवळ एक आदरांजली समजावी) Simple, Free Image and File Hosting at MediaFire .....हे वर्ष तसे महत्त्वाचे आहे. या वर्षी मेरी क्यूरीला नोबेल पुरस्कार मिळून १०० वर्षे पूर्ण झाली. १९११ साली रेडियम आणि पोलोनियम या दोन किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला.

बंगाल

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/05/2021 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
...परवा कोणीतरी म्हणाले की बंगालमधे १९४६ जशा दंगली झाल्या तशाच आत्ता बंगालमधे सुरू आहेत. पण त्यावेळेस दंगली कशा झाल्या आणि का झाल्या हे आजच्या पिढीला कदाचित माहीत नसावे म्हणून या लेखमालिकेचा प्रपंच... बंगाल १९४६ जूनच्या २९ तारखेला ब्रिटिश पार्लमेंटच्या सदस्यांची समिती ब्रिटनला परत गेली आणि ते एका महिन्यात ब्रिटिश कॅबिनेटला आपला अहवाल सादर करतील असे सांगण्यात आले. जिनांनी आता अशा एका हत्याराचा शोध घेण्यास सुरुवात केली ज्याने ते सूड घेऊ शकतील आणि त्यांची वैयक्तिक महात्त्वाकांक्षा पूर्ण करू शकतील.