Skip to main content

लेख

गोष्ट सांगा गणित शिकवा .... 12

लेखक राजा वळसंगकर यांनी रविवार, 11/07/2021 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्साहाच्या भरात रात्री बराच वेळ मुलांना झोप आली नाही. सबमरीन मध्ये प्रवास करण्याचा अनुभव असा किती जणांना असतो? बरं, त्यावर काही वाचायला पण फारसे मिळत नाही. 20,000 Leagues under the sea आणि U-boat सारखी पुस्तक कोण वाचतं आजकाल? आणि दुसऱ्या महायुद्धाचे चित्रपट आता जुने झाले! नाही म्हणायला The Ghazi Attack या हिंदी चित्रपटामुळे निदान सबमरिन असे काही असते हे तरी कळलं होत. प्रकाराची युद्धनौका माहित झाली होती. पण शेवटी तो हिंदी पिक्चर! किती माहिती मिळणार?

चेहरा

लेखक चंद्रकांत यांनी मंगळवार, 06/07/2021 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
माणसांना स्वतःचा चेहरा घेऊन जगता येणं काही अवघड नाही. साधेपणाने जगण्यात सगळं शहाणपण सामावलेलं असतानाही माणसं आपली अंगभूत पात्रता विसरून, मुखवटे परिधान करीत कोणत्यातरी मोजपट्टीवर स्वतःला का सिद्ध करू पाहत असतील? सांगणं अवघड असलं, तरी असंभव नाही. माणसांच्या असण्यातच त्याचं उत्तर आहे असं म्हणणं वावगं ठरू नये. मुळात कोणत्यातरी निकषांवर आपली उंची नजरेत भरण्याइतकी ठसठशीत असावी अशी आस जवळपास प्रत्येकाच्या अंतरी सुप्तावस्थेत का असेना, पण अधिवास करून असते.

वह कौन थी ?

लेखक Rahul Hande यांनी मंगळवार, 06/07/2021 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
आजवर या दोन्ही घटनांमधील संबंध व साम्य दाखवण्यात अनेकांनी लेखण्या झिजवल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने शोध घेऊन त्यांना उलगडलेले रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी संपले नाही,ते या दोन घटनांमधील रहस्य.

खडकफूल

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/07/2021 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे घरात काळा समार (मसाला) करायचा झाला तर लहानपणापासून कानावर पडलेलं एक नाव, खडकफूल. खडकफूल हा मसाल्यातल्या पदार्थातला एक घटक आहे. हा पदार्थ मला खूप आवडतो. तो आवडण्याचं कारण त्याच्या रंगामुळं नाही, गंधामुळं नाही, चवीमुळं नाही की त्याच्या आकारामुळंही नाही... संपूर्ण लेख : https://sudhirdeore29.blogspot.com/2021/07/blog-post.html?spref=tw संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/

हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

लेखक अनुस्वार यांनी बुधवार, 30/06/2021 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष- लेखक: मुनव्वर शाह संपादन: शुभदा गोगटे प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७) पृष्ठ संख्या: २०० किंमत: ₹१०० ओळख- १९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा.

भारतीय टायटॅनिक - एस. एस. रामदास

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 27/06/2021 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
१७ जुलै १९४७ या दिवशी एस. एस. रामदास ही बोट रेवसजवळच्या काशाच्या खडकाजवळ उलटली. या दुर्घटनेबाबत अनेक लोकांना म्हणावी तेव्हढी माहिती नाही. त्याबद्दल थोडंसं - एस. एस. रामदास ही बोट सिंदीया स्टीमशिप कंपनीच्या मालकीची होती. ही कंपनी मुंबई पासून गोव्यापर्यंत कोकणाच्या वेगवेगळ्या बंदरांपर्यंत प्रवासी वाहतूक करत असे. दुसरं महायुद्ध संपल्यावर ब्रिटीश - भारतीय नौदलाकडून घेतलेल्या ८ - १० अजस्त्र बोटी या सिंदीया स्टीमशीप कंपनीच्या मालकीच्या होत्या. यापैकीच एक म्हणजे एस. एस. रामदास. १९३६ साली बांधलेली ४०६ टन वजनाची ही बोट तीन मजली - तीन डेक असलेली - होती.

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/06/2021 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_bora… येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे. सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

असं नको.. तसं लिही..

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 18/06/2021 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
नाही.. नाही.. ही सगळी वाक्यं म्हणजे खाणीतनं आत्ताच फोडून काढलेल्या दगडांसारखी टोकदार आणि खुनशी झाली आहेत.. समजा ह्यातलं एकेक वाक्य हातात घेऊन भिरकावून दिलं तर उगाच डोकं-बिकं फुटायचं कुणाचंतरी.. आणि तुझ्या मागं लचांड लागायचं.. त्यातून तू एक नंबरचा पेद्रट मनुष्य असल्यामुळे तुला लचांड वगैरे नकोच असणार ! आणि 'मनुष्य' म्हटल्यावर इकडं तिकडं चमकून बघू नकोस.. 'मनुष्य' म्हणजे माणूस..! होमो सेपियन सेपियन..! असो.. आता एक काम कर... ह्याची धार थोडी मऊ कर... एकेका वाक्यावर हात फिरवून बघ... भिऊ नकोस.. तूच लिहिलंयस ते..आपलाच हात आपल्याला लागत नाही... एकेका शब्दाकडे नीट बघ... पॉलिश कर..

सामान्य लोकांच्या मुक्या संवेदनांचा चित्रकार !

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 17/06/2021 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य लोकांच्या मुक्या संवेदनांचा चित्रकार ! AW001 AW002 साहित्याचा वारसा लाभलेला एक संवेदनशील चित्रकार ! AW003 तुम्ही म्हणाल मी ही काय लिहि

निष्क्रिय सज्जन म्हणजे...

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 15/06/2021 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आपल्यातल्याच काही विभूती दैनंदिन स्तुत्य कृतीतून विकास पावत इतिहासात लोकदेव झाले. कृतीतून त्यांनी लोकांना त्यांच्यातला देवत्वाचा दृष्टांत दिला. परोपकार देवत्वाकडे घेऊन जातो. माणसाला आयुष्यातील कृतीतून देवत्वापर्यंत पोचता येतं. कृतीतून देवमाणूस होत जाणं साधी सोपी गोष्ट नाही. आपण अशा देवमाणसांचा आदर्श न घेता मंदिरं बांधून दानपेट्या ठेवत कधीही मंदी नसलेला व्यवसाय सुरु करतो. माणसाला एकुलतं एक आयुष्य मिळतं. त्यातलं निम्म्याधिक आयुष्य झोपेत निघून जातं. बालपणातलं आयुष्यही बेरजेत नसतं. उरलेल्या आयुष्यात माणूस कष्ट करत दोन वेळचं जेवण कमवतो.