Skip to main content

लेख

सद्गुणांचं संचित

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 29/08/2021 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरी अधिवास करून असलेल्या तरल भावना, भावनांच्या वर्तुळात विहार करणाऱ्या सरल संवेदना, कृतीचे किनारे धरून वाहणारा सोज्वळपणा, नीतिसंमत संकेतांना प्रमाण मानणारा सात्विक विचार अन् त्या विचारांना असलेले मूल्यांचे भान, त्यातून जगण्याला लाभलेले नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती असणारी अढळ निष्ठा, विसंगतीपासून विलग राहणाऱ्या विचारांना प्रमाण मानत जीवनाचा नम्रपणे शोध घेऊ पाहणारी नजर अन् नजरेत सामावलेलं प्रांजळपण, या आणि अशा काही आयुष्याला अर्थ प्रदान करणाऱ्या धवल गुणांचा समुच्चय कोण्या एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? नक्की माहीत नाही. पण बहुदा नसावाच.

“दीपशिखा कालिदास”

लेखक नागनिका यांनी गुरुवार, 26/08/2021 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
वैशाखाच्या उष्मादाहानंतर वर्षाऋतूची मोहक चाहूल लागते. आकाशामध्ये ढग दाटीवाटी करतात. कविमन उद्युक्त नाही झाले तर नवलच! पावसांच्या सरींबरोबर कविता, चारोळ्यांच्या सरी देखील बरसू लागतात. पर्वतीय प्रदेशामध्ये जलभारामुळे नभ जणू काही डोंगरावरच उतरले आहेत असा भास होतो. परंतु या नियमित घडणाऱ्या भौगोलिक घटनेकडे पाहून शंभर सव्वाशे श्लोकांचे नितांत सुंदर विरहकाव्य रचणाऱ्या महाकवी कालीदासांची काव्यप्रतिभा हजारो वर्षांपासून रसिक मनांना भुरळ पाडत आली आहे. प्रिय पत्नीच्या “अस्ति कश्चित् वाग्विशेष:?

"कुलूप किल्ली" ....

लेखक kvponkshe यांनी बुधवार, 25/08/2021 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीपाद रात्री धावतच माझ्या कडे आला. "ती आता बोलते आहे, "आई आलीये, मला बोलावते आहे" असं म्हणत हसते आहे." असं तो धापा टाकत सांगत होता. मी थोडा हादरलोच. माझ्या डोळ्यासमोर जवळपास ३७ वर्षांपूर्वीचा प्रसंग आला..... यातील, ती म्हणजे सुलेखा, जन्माला आली तेव्हा तरी नॉर्मलच वाटत होती . ती पुढे "अशी" होईल अशी कोणालाच कल्पना आली नाही. अशी म्हणजे मतिमंद, किंवा हल्लीच्या सोफिस्टिकेटेड भाषेत विशेष मूल! वनमालाबाई आणि गोपाळराव (यांचे आडनाव मी मुद्दाम सांगणार नाहीये) याना लग्नानंतर झालेली पहिलीच मुलगी ! वनमालाबाई, गोपाळराव आणि सुलेखा !

परिमाणे: व्यवस्थेची अन् आयुष्याची

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 22/08/2021 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
जगणं देखणं अन् आयुष्य सुंदर वगैरे होण्यासाठी ज्या काही गोष्टी माणसांना तयार करायला लागतात त्यातील एक आहे व्यवस्था. मुळात ही संकल्पना खूप व्यापक वगैरे आशय आपल्यात सामावून असलेली असली, तरी मर्यादांच्या कुंपणांनीही वेढलेली आहेच. खरंतर काळाचंच ते देखणं-कुरूप वगैरे अपत्य. अनुभूतीच्या कुशीतून ती प्रसवते अन् परिस्थितीचे किनारे धरून प्रवाहित असते. तिचं असणं समजून घेता येतं, तसं नसणंही जाणून घेता येतं. असण्या-नसण्याचे अन्वयार्थ लावता येतात. तिच्या अभावाचे परिणाम पाहता येतात अन् प्रभावाची परिमाणे समजून घेता येतात. त्यांचे असणे आकळले की, आवश्यक आकारही देता येतात.

भारांच्या जगात...५

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 19/08/2021 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
सगळं सगळं ठीक होतं भा. रा. भागवतांची पुस्तकं मिळवता मिळवता कधी सेंचुरी मारली कळलेच नाही. या प्रवासात अनेक लोकांनी सर्वतोपरीने मदत केली. एखादे दुर्मिळ पुस्तक मिळवायला, स्वत:च्या कलेक्शनमधून काढून द्यायला आणि काहींनी चक्क ती मी येत नाही तोपर्यंत अगदी जपून ठेवली होती. अशातच कधी काही पुस्तके गहाळ झाली, काही देतो म्हणून नंतर यू-टर्न घेऊन गेले. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र कळाली. आयुष्य सुंदर आहे. फक्त हवे असणारे पुस्तक कधी ना कधी मिळाले पाहिजे. माझ्या स्नेही मित्रांनी काही पुस्तके माझ्यासाठी घेतली होती, त्यात मला काल भारांचं एक दुर्मिळ पुस्तक मिळालं, ‘सगळं सगळं ठीक होतं’.

अभियांत्रिकीचे दिवस-२

लेखक पाटिल यांनी सोमवार, 16/08/2021 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
"ती मला नाही म्हणाल्यामुळं माझ्या आयुष्यात एक जबरदस्त पोकळी निर्माण झालेली आहे..आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी, तू आम्हाला आणखी एक ओल्ड मंकचा खंबा ताबडतोब आणून दे..!'' अशा विव्हळ स्वरात रात्री-बेरात्री कुणीतरी फोन करायचं.. होस्टेलच्या टेरेसवर आम्हा लोकांचं प्यायला बसणं, हे नेहमीचंच..

स्मरण चांदणे३

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 16/08/2021 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
        स्मरण चांदणे 3    गावात  एक साधुपुरुष ,ब्रम्हाजीबुवां (उच्चारी  बरमजीबाबा)होऊन गेले.त्यांचे मंदिर गावाचे पूर्वेस आहे.त्यांच्यावर लोकांची फार श्रध्दा.आजाराना कंटाळलेले लोक ब्रम्हाजीबुवाला साकडे घालतात. देवळाचे आवारात,राहून सेवा करतात.वेगवेगळ्या कारणांसाठी नवस बोलतात.'बाळगोपाळ घालणे',म्हणजे लहान मुलांना 'वरण भाकरीचे'जेवण देणे,त्यापैकी एक. जेवणात कधी कधी शिरा,नुक्ती पणअसे.मुले आपापल्या घरून ताट वाटी तांब्या घेऊन येत.यजमानाचे घरासमोर रस्त्यावर पंगती उठत. 'बरमजीब्वाच्या विशिष्ट ताला सूरातील,भक्ती रचना (आस्तुक्या) मौखीक स्वरुपात आ

स्मरण चांदणे३

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 16/08/2021 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
        स्मरण चांदणे 3    गावात  एक साधुपुरुष ,ब्रम्हाजीबुवां (उच्चारी  बरमजीबाबा)होऊन गेले.त्यांचे मंदिर गावाचे पूर्वेस आहे.त्यांच्यावर लोकांची फार श्रध्दा.आजाराना कंटाळलेले लोक ब्रम्हाजीबुवाला साकडे घालतात. देवळाचे आवारात,राहून सेवा करतात.वेगवेगळ्या कारणांसाठी नवस बोलतात.'बाळगोपाळ घालणे',म्हणजे लहान मुलांना 'वरण भाकरीचे'जेवण देणे,त्यापैकी एक. जेवणात कधी कधी शिरा,नुक्ती पणअसे.मुले आपापल्या घरून ताट वाटी तांब्या घेऊन येत.यजमानाचे घरासमोर रस्त्यावर पंगती उठत. 'बरमजीब्वाच्या विशिष्ट ताला सूरातील,भक्ती रचना (आस्तुक्या) मौखीक स्वरुपात आ

वर्तन विपर्यास

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 15/08/2021 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. अर्थात, तुम्ही म्हणाल या विधानात नावीन्य ते काय? प्रश्न माणसांसोबत कधी नव्हते? अगदी खरंय, ते आहेतच आणि असतीलही. समजा, तसे ते नसते तर प्रगतीच्या परिभाषा ना त्याने शोधल्या असत्या, ना परिमाणे वापरून परिणाम तपासले असते. एक मात्र खरंय की, काळाच्या ओघात अन् आयुष्याच्या प्रवासात पुढ्यात पडलेल्या प्रश्नांच्या व्याख्या बदलत असतात. कुणी म्हणेल की, बदल नावाचा प्रकार न बदलणारं वास्तव आहे. बदल हीच एक गोष्ट अशी असावी की, जी बदलता नाही येत कुणाला. बदलांना वेग असतो. चेहरा नसतो. तो द्यावा लागतो. मग तो माणूस असो की, अन्य कुणी.

सरगोंड्यांची झिंग

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/08/2021 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे विरगावला पद्मनाभ स्वामींची समाधी आहे. ह्या समाधीकडे जाण्याचा रस्ता अतिशय छान उतारवळणाचा आहे. दर वर्षी आषाढी आमावस्येला वा दीपअमावस्येला (जिला आपल्या भागात गटार अमावशा म्हणतात) तिथं यात्रा भरते. म्हणजे मी लहान होतो तेव्हा भरत असे. यात्रेच्या दिवशी तिथं लळितही साजरं होत असे. ‘लळित’ म्हणजे एक प्रकारचं नाटक असतं. भारूड सादर करायची कला म्हणजे ‘लळित’. आता ते होणं बंद झालं. त्यात भाग घेणारे कलावंतही एकेक करत वारले. दीपअमावस्येच्या आठ दिवस आधीपासून समाधीत भागवत बसायचा.