Skip to main content

लेख

तूच आहेस तुझ्या र्‍हासाचा शिल्पकार

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 06/02/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कृपया ही बातमी वाचा. आपल्याला काय वाटते? इच्छुकांनी या संदर्भात कृपया येथे चर्चा करावी असा मानस आहे..

नामवंत कवी प्रवीण दवणे यांचा एक आशयगर्भ लेख

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 23/01/2008 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपूर्वी वाचनात आला होता. फारा दिवसांनी काही कारणाने त्याची आठवण जागी झाली. मि.पा.करांनाही त्याचा आस्वाद घेता यावा ह्या कारणाने तो लेख येथे देत आहे.

संकल्प : नव्या वर्षाचा !

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 04/01/2008 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
समीरने बार मध्ये प्रवेश केला तेव्हा जवळजवळ सगळा बार संपूर्ण भरला होता. एक कोपर्‍यावरील टेबल तेवढे रिकामे होते. समीर तेथे जाऊन स्थानापन्न झाला. प्रथेप्रमाणे पाणीवाल्या पोर्‍याने पाण्याचा ग्लास समोर ठेवला आणि तितक्यात हातात नोंदवही घेऊन वेटरदेखील आला. "तीन किंगफिशर स्ट्राँग", समीर उद्गारला. वेटरला वाटले बहुधा ह्याचे दोन मित्र आता येतच असावेत. तो गेला आणि थोड्याच वेळात तीन बाटल्या, तीन ग्लास आणि पापड्-शेंगदाण्याच्या प्लेट घेऊन आला. तोवरही समीर एकटाच होता. "साब, आपका बीयर अभी खोलू की...." "हां हां. तीनो बॉटल खोलो." वेटरने तीनही बाटल्या उघडल्या आणि तीनही ग्लास भरले.

महान इजिप्शियन संस्कृती

लेखक सागर यांनी सोमवार, 24/12/2007 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
महान इजिप्शियन संस्कृती सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते. ह्या संस्कृतीने जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे चक्र. चक्राचे उपयोग किती आहेत हे सांगण्याची गरजच नाही. आजकाल जगातील सर्व वाहने, यंत्रे वगैरे गोष्टी चक्रावरच चालतात. ही सुमेरियन संस्कृती युफ्रेटिस नदीच्या काठी उदयास आली. ज्याप्रमाणे सुमेरियन संस्कृतीचा आधार युफ्रेटिस नदी होती, त्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीचा आधार नाइल नदी होती. यावरुन असे दिसून येते की जगातील बहुतेक प्राचीन संस्कृती नदीकाठी उदयास आल्या होत्या. आपली सिंधू संस्कृतीदेखील नदीकाठीच उदयास आली होती.

नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर

लेखक सागर यांनी सोमवार, 24/12/2007 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
(नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर लिखित पुस्तकाचे परिक्षण बरेच दिवसांपूर्वी लिहिले होते. तेच येथे देत आहे.) मित्रांनो, मी बरीच पुस्तके वाचली आहेत."नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच.

भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)

लेखक सागर यांनी शुक्रवार, 21/12/2007 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्कर यांच्या आर्य चाणक्य यांच्यावरील विष्णुगुप्त या कथेमुळे मला माझ्या एका जुन्या कथेची आठवण झाली. ती संपूर्ण येथे देत आहे... (संपूर्ण) - o भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य o - भाग १: चंद्रगुप्त मौर्य हा आपणा सर्वांना भारतसम्राट म्हणून परिचित आहेच. पण तो भारतसम्राट कसा झाला? त्यासाठी त्याला कोणकोणते कष्ट सोसावे लागले? हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे.

मला आलेले एक सुन्दर इ मेल...

लेखक स्वाती राजेश यांनी शुक्रवार, 21/12/2007 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक मेल आले. ते खूप छान वाटले म्हणून शेअर करत आहे. ते असे.... एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं... असा वाटण्याची जागा मग, मूल झालं की ... मोठं घर झालं की... अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो. मुलांच्या वाढत्या वयात , त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं. आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...

निःश्‍वास

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/12/2007 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
निःश्‍वास दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या फलाटावर कोपऱ्यातल्या गाठोड्याएवढ्या बिऱ्हाडावर नजर ठेवताठेवता सात वर्षांच्या शंकरचा छोट्या सावत्र बहिणीने पकडलेला हात सुटला. तो भानावर आला, तेव्हा आसपास ती कुठेच दिसत नव्हती. आता सावत्र आई मारणार, या भीतीने शंकर शहारला आणि समोरच्या गाडीत लपला. गाडी सुरू झाली. "सुटल्या'च्या जाणीवेनं डब्यातच तो झोपून गेला. गाडी थांबली, तेव्हा तो हरिद्वारला होता. दोनचार दिवस तिथे काढून एका रात्री त्याने दुसरी गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी तो मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर उतरला होता. क्षणभरच, आपल्या बोटाशी धाकटी बहीण आहे, असा भास होऊन आईच्या भीतीनं तो भेदरला.

म टा, "म", "मा", "मि" आणि "उ" - काही सैल विचार

लेखक सुनील यांनी रविवार, 09/12/2007 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
मटाच्या (त्यांच्या दाव्यानुसार) पहिल्या ऑनलाइन दिवाळी अंकावरून जवळपास सर्वच मराठी संकेतस्थळांवर जोरदार चर्चा सुरू आहेत. या निमित्ताने मटाच्या बदललेल्या स्वरूपाविषयी आणि त्यांच्या अतिरंजीत दाव्याविषयी मनात आलेले काही सैल विचार (stray thoughts). बदललेले स्वरूप आमच्या घरी मटा येत असे. मटा वाचण्याची सवय बालपणापासूनच. त्यामुळे आजदेखील जालावर मटा वाचला जातोच पण तो केवळ एक सवय म्हणून. त्यात पूर्वीची मजा नाही. त्यावेळच्या छापील मटाचे स्वरूप आणि भाषा एखाद्या घरंदाज स्त्रीसारखी असे.