Skip to main content

लेख

काळ्या ढगाभोवतालची चंदेरी किनार

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 17/07/2008 05:11 या दिवशी प्रकाशित केले.
"अरविंदनेच मला चंदेरी किनार दाखवली,आणि आता मी ती अल्यागेलेल्याला दाखवते." असं, ज्यावेळी मला स्मिता अध्यारत बोलली,त्यावेळी मला पण तिची गोष्ट जास्त आत्मीयतेने ऐकावीशी वाटली.

भटका कुत्रा

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 17/07/2008 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
भटका कुत्रा . पाळीव प्राण्यांचा विषय निघाला की आमच्या चंपीची आणि तिच्या पिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.. वेळी मी ५-६ वर्षांची असेन. आमच्या घरा समोरच्या उमराच्या झाडाखाली चंपीने भला मोठा गुहेसारखा खड्डा खणला होता. [ कुत्री स्वतःसाठी गुहा बनवतात का? माहीत नाही! परत कधी कोणत्याच कुत्रीने घर बांधताना पाहील किंवा ऐकलं नाही. ] चंपीने मात्र तिच घर उभारताना आम्हाला पाहायला मिळाल. तिला पिल्ल होणार होती.. आम्ही सगळी बच्चे कंपनी खूप आतुरतेनं त्या येऊ घातलेल्या सवंगड्यांची वाट बघत होतो..

आदर करण्याची कदर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 16/07/2008 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
"आदर नसला की दुसऱ्याची पर्वा नसते,आणि दुसऱ्याची पर्वा न करतां रहाणं म्हणजे एकप्रकारचं उजाड वाळवंटात राहिल्या सारखं आहे." ज्यावेळी मी अगदीच तरूण होतो,त्यावेळी होणारी घटना आणि आजूबाजूचे लोक यांच्याबद्दल माझी समजूत अगदी सरळ होती. एखादी गोष्ट चांगली तरी असते किंवा वाईट असते.ह्या विचारामुळे सभोंवतालच्या जगाशी मला वागायला सोपं जायचं.नंतर मी जेव्हा पोक्त तरूण झालो तेव्हां हे सर्व जरा क्लिष्ट व्हायला लागलं.एक तर पांढरं नाही तर काळं असं पहात असताना मला आता ग्रे पण सर्व ठिकाणी दिसायला लागलं. त्यामुळे माझं जीवन, उद्देश,अर्थ आणि निर्णय ह्या तिन्ही गोष्टीशी जास्त घण झालं आणि तसंच ते जगायला कठीणही होत ग

अज्ञातवासातला एक पांडव..अर्जून (दिगसकर).

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 15/07/2008 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
"अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी?

दाजी "पोष्टमन"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 13/07/2008 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
भास्करभाऊना दाजी धरून सहा मुलं.दोन मुलगे अणि चार मुली.दाजी सर्वांत मोठा.तशी दाजीला आणखी दोन भावंड होती,परंतु ती लहानपणीच निर्वतली. भाऊ एकटे कमविणारे, गुंडू जोश्यांच्या दुकानात कारकूनाची नोकरी करून किती पगार मिळणार.एव्हडी मुलं झाल्यावर गरिबी ठाण मारूनच बसणार. दाजी जेमतेम इंग्रजी ४ थी पर्यंत शिकला.मराठी ४ ईयत्ता आणि इंग्रजी ४ ईयत्ता.खूप झालं असे त्याला वाटलं.पण खरं कारण ते नव्हतं.इंग्रजी शाळेत दीड रुपया मासिक फी होती.आठ,आठ आण्यानी वाढून ४ थीत ती दीड रुपया झाली होती.जस जशी दाजीची भावंड वाढू लागली तस तशी भाऊंच्या खर्चाला मेळ बसणं कठीण होवू लागलं. दाजी वेळेवर फी भरत नाही, म्हणून मास्तर त्याच्यावर

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 11/07/2008 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले. पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला. पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले.

ते पिंपळाचं झाड, चिनारी वृक्षापरी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 11/07/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसानी मी धामापुरला गेलो होतो.धामापुरातला परिसर अत्यंत सुंदर आहे.लहानपणी मी माझ्या मामाच्या टुमदार घराच्या आजुबाजूला शेतीवाडी असलेल्या परिसरात वेडा होऊन जायचो.जवळच्याच उंच डोंगरातून येणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला सुंदर वाट करून डोंगर्‍याच्या उतारावरून पाट बांधून सपाटी आल्यावर लोकांच्या शेतीला मुबलक पाणी देण्याची सोय करून ठेवली होती.त्यामुळे बारमास शेतीला पाणी मिळायचं.त्याच कारणाने हा सर्व परिसर गर्द झाडीने भरलेला असून नारळ, पोफळ,सुपारी,पानवेली आणि इतर रानटी झाडांच्या डोंगरा वरच्या आणि उतारावरच्या जमिनीवर विखूरलेल्या झाडीने भर उन्हात सुद्धा संध्याकाळ निर्माण करण्याचं वेगळंच वातावारण निर्मा

शर्यत

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 09/07/2008 05:37 या दिवशी प्रकाशित केले.
डोंगराला वळसे घालत जाणारा नागमोडी रस्ता चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून

सबनीसांचा वसंता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 06/07/2008 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही त्याला वसंता कधीच म्हटलं नाही.त्याला आम्ही सबनीस म्हणूनच ओळखत होतो.त्यालापण सबनीस म्हणून हांक ऐकण्याची संवय झाली होती. हा सबनीस मडुऱ्याचा.हे एक सावंतवाडी तालुक्यातलं लहानसं खेडं. दहा पांच घरं सबनीसांची होती.लहानपणी जवळच्या मराठी शाळेत शिकून झाल्यावर, सबनीस सावंतवाडीला ईग्रजी शिकायला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहात होता.त्याचे वडील, त्याच्या खर्चाचे पैसे नियमीत पाठवीत असत सबनीसाचं शिक्षणात जास्त मन रमलं नाही.जेमतेम मॅट्रीक झाल्यावर, तो वडीलांची परवानगी घेऊन मुंबईला गेला.

आमची पन्नासावी लग्नगांठ

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 04/07/2008 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पन्नासावी लग्नगांठ "एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं." "गेली पन्नास वर्ष एकाच व्यक्ति बरोबर प्रेमाने राहिलो" असे उद्गार तोंडून यावेत हिच मुळी लगन्नाच्या जीवनाची केव्हडी मोठी देणगी-म्हणजे गीफ्ट- असावी.