"अनपेक्षीत घटनांची गुंतावळ ही माझ्या आयुष्याची एक मोठी खूण झाली आहे.मला वाटतं,माझ्या आयुष्यात आलेल्या योगायोगानी मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवला,कधी धक्का पण दिला आणि तो पण अशातऱ्हेने की मी कदाचीत तो मार्ग पत्करला पण नसता,पण त्यामार्गाने मला जाण्याची जरुरी भासली म्हणून तसं करावं लागलं.
ह्या योगायोगांशी झुंझ देताना मला त्यासाठी अनपेक्षीत ठिकाणी जावून राहण्याची पाळी आली."
मुंबईहून मद्रासला जाताना ट्रेनमधे मला एक बाई भेटली ती सहज बोलता बोलता आपली कथा मला सांगू लागली.
ती पुढे म्हणाली,
" माझी मावशी मद्रासला राहते.तिची परिस्थिती पण यथातथाच होती.