पयला पयला प्यार
बा लय खुश व्हता. खारीतली २५ गुंठ रोडटच जमीन ईकलीवती. तीस लाख आलते.
मंगलवारी माजा १७ वा वाडदीवस.
'मिथन्या हिकड ये. हे झे तुज्या वाडदीवसाचे ' बा न बलीवल आन पाच हजार काडून दिल्लं
मी सुसाटलो
९३२२ १७ ३३ १४
सूर्याला मोबाइल लावला. सूरेश म्हात्रे. माजा लंगोटीयार . ईतका लंगोटी क खारीन ऊतराचा आसल न माज्याकड लंगोटी नसल त त्याची लंगोटी घालाचू.
'सूर्या , संद्याकाली भेट, आरजंट हाय.'
सूर्या आला
'क रं बाला क बोल्तोस?
'आर बान मोप पैशे दिल्लन वाडदीवसाला. आपन बलीशेट कड बसू बीयर पीवाला.'
'तूजा वाडदीवस हाय ? वाडदीवस हाय ? मंग बलीशेटकड कनाला बसाचा ? आपन पनवेलला जावाचा.
मिसळपाव