Skip to main content

लेख

माझ्या यशाची पहिली चव.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 21/11/2008 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणातल्या पिंगुळी गावात जाऊन एका शाळेला भेट देण्याचं कारण,मी माझ्या मावशीच्या मांडकूली गावात गेलो होतो.तिथे पिंगुळी गावचा विषय- नलिनीने- माझ्या एका मावस बहिणीने काढला. ती मला म्हणाली, "अरे पिंगुळी गावात वसुंधरा साने नावाची माझ्या वयाची मुलगी माझ्या जवळ फार पूर्वी आली होती.आणि मी तुझी त्यावेळी तिच्याशी ओळख करून दिल्याचं तुला आठवत असेल.

बंदपीठाचा धसका.

लेखक कपिल काळे यांनी बुधवार, 19/11/2008 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यनगरीतील शनिवारवाड्याच्या आसपासचं एक मराठी वृत्तपत्र बरयापैकी उपक्रमशील आहे. अनेक उपक्रम चालवतात, रोज वेगळी पुरवणी काढतात. अशीच त्यांची एक साप्ताहिक पुरवणी “बंदपीठ”. ह्यात आपले अनुभव लिहून पाठवतात वाचक. गेले पाच सहा महिने बंदपीठात तर थैमान चालू आहे. समाजातील चांगले दाखवून देणारा एखादा तुरळक लेख सोडला तर बाकीचे तर वाचवत नाहीत. एकेका लेखांचे विषय तर पहा. कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी घेताना, प्रत्येक केमोनंतर किती केस गळून पडले? दिवाळीला फिरायला बाहेर गेलो तेव्हा दोन ट्रकांच्या मध्ये सापडून आपल्या मोटारीचा चेंदामेंदा कसा झाला?

कनकालेश्वर - ऐतिहासिक मानबिंदू

लेखक भास्कर केन्डे यांनी मंगळवार, 18/11/2008 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
औरंग्याने महाराष्ट्रातल्या वास्तव्यात हजारो मंदिरे उध्वस्त केली. त्यातली बरीच मशिदींमध्ये बदलवली गेली, काही नामशेष झाली, काही आजही डगडुगीच्या/जिर्नोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत तर थोडी पुन्हा नव्याने उभारी घेऊन उभी राहिली.

जुवळ- भाग २( अंतिम)

लेखक कपिल काळे यांनी सोमवार, 17/11/2008 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
जाउया की नको वरती, काय असेल......? >> पहिला भाग इथे वाचा चलबिचल होउन शेवटी वरती जाउन काय ते बघायचं ठरवलं. पहिली छोटीशी चढाई करुन वर गेलो. समोर बघतो तर काय, एक विलक्षण दॄश्य दिसत होतं. आम्ही देहभान हरपून बघतच उभे राहिलो. शेजारी कोणी उभं आहे ह्याची सुद्धा जाणिव झाली नाही. नजरबंदी झाल्यागत होउन गेलं. त्या छोट्याश्या सपाटीवर दोन तीन बांबूची बेटं होती. दोन तीन वीत भर उंच गवत माजलं होतं.

जुवळ- भाग-१

लेखक कपिल काळे यांनी सोमवार, 17/11/2008 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी नववीत होतो तेव्हा पावसाळ्यात ट्रेक करायचा ठरवला. तेव्हा काही बाही पुस्तकं वगैरे वाचून, नॅट-जिओवर काही फिल्म्स बघून ट्रेकबद्दल एकदम आकर्षण निर्माण झालेलं.आम्ही सगळे मित्र तसे पावसात क्रिकेट खेळता येत नाही म्हणून डोंगरउतारावरुन घसरगुंडी खेळायचो. पावसाळ्यात उतार निसरडा झाला की खाली सरकत यायचं. त्यामुळे दर पावसाळ्यात घसरुन उतरुन पहिली चड्डी फाटली की तो खेळ बंद. पण त्या वर्षी गावातल्या व्हाळातून* चालत ट्रेक करण्याचा घाट घातला. ते भाद्रपदातले दिवस होते. शाळेला गणपतीची सुट्टी नुकतीच लागली होती. ह्या दिवसात कोकणात पाउस जरा खळावतो* आणि थोडी ताप* पडते. त्यामुळे जनावरं* बिळातून बाहेर येतात.

गदर पर्वातील क्रांतिरत्न आणि हिरे-मोती

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 17/11/2008 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
१६ नोह्वेंबर. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामतील एक महान दिवस. या दिवशी एकाच अभियोगात एकाच तुरुंगात एकाच वेळी गदर उत्थानातील सात क्रांतिकरकांना हौतात्म्य प्राप्त झाले! हुतात्मा ’क्रांतिरत्न’ विष्णु गणेश पिंगळे, हुतात्मा सरदार कर्तारसिंग सराबा, हुतात्मा सरदार बक्षिससिंग, हुतात्मा सरदार जगतसिंग, हुतात्मा सरदार सुरायनसिंग भुरसिंग, हुतात्मा सरदार सुरायनसिंग ईश्वरसिंग आणि हुतात्मा सरदार हरनमसिंग हे ते सात हुतात्मे. एकाच पर्वातील एकाच संघट्नेच्या सात क्रांतिकारकांनाएकाच अभियोगात एकत्रित फाशी सुनावली गेल्याचा एकमेवाद्वितिय ऐतिहासीक प्रसंग. गदर संग्राम म्हणजे साक्षात दुसरे १८५७!

"शब्दांवाचून कळले सारे"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 16/11/2008 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी तळ्यावर पुस्तक वाचत प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो तेव्हड्यात एक व्यक्ति माझ्या जवळ येऊन हंसली.मी पण त्याच्याशी हंसलो.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर माला कळलं ही व्यक्ति भाऊसाहेबाना पण ओळखते.त्याच्या बरोबर एक मोठा सफेद रंगाचा कुत्रा होता.तो सतत वळवळ करत होता. मी म्हणालो, "तो तुम्हाला घरी जावूया म्हणून सांगतोय." त्यावर ते गृहस्थ मला म्हणाले, "नाही नाही प्रो.देसाई समोरून येत आहेत ते त्याने लांबून पाहिलंय.त्याना तो चांगलाच ओळखतो.भाऊसाहेब पण त्याच्यावर खूप प्रेम करतात.प्रोफेसर जेव्हा जवळ आले तेव्हा तो जास्तच चूळबूळ करू लागला. भाऊसाहेब जवळ आल्यावर म्हणाले, "ह्या मोत्याच्या मागे गंमतीदार इति

गुरू शिवाय विद्दा कसली?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 16/11/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
नृत्यकलेत योग्यते शारिरीक हावभाव करावे लागतात.त्या नृत्यातून नृत्यकरणार्‍याचं अविर्भावातलं सत्य विशद व्हावं लागतं.आणि त्याचं व्यक्तित्व प्रदर्शीत व्हावं लागतं.हे मी रोहिणीकडून ऐकलं. यशोधरा साखरदांडे आणि हिची मुलगी रोहिणी,जी आता रोहिणी गायतोंडे म्हणून ओळखली जाते ती नृत्यकलेत निपूण असून अलिकडे रंगमंचावर अभिनय करते हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी अंधेरीतल्या एका नृत्यशाळेत तिचा अभिनय पहाण्यासाठी एका मित्रा बरोबर गेलो होतो.रोहणी त्यावेळी आपल्या विद्दार्थिनीबरोबर रियाज करण्यात दंग झाली होती. मी तिच्या आईवडीलांना चांगलाच ओळखतो. तिचे वडील माझ्या बरोबर टाटा इन्सस्टिट्युटमधे माझे सहकारी होते.