सोसायटी आणि बॅचलर
शनिवारी सकाळी लवकरच भद्रा मारुती दर्शनाला निघालो. गाडी चालवताना फोन वाजला, बघितल तर घरमालकांचा फोन.
घरमालकः- निखिल कुठे आहात??? मुंबई मधे आहात का???
मी:- नाही हो, सध्या मी घरी आलेलो आहे.
घरमालकः- तुमच्याशी थोडे बोलायचे होते.
मी:- सध्या गाडी चालवत आहे, तुम्हाला साधारण तासभरात फोन करतो.
घरमालकः- ठीक आहे पण आठवणीने फोन करा
माझ्या डोक्यात पहिला विचार आला आज तर दोन तारीख आहे ह्यांना लवकर घरभाडे पाहिजे असणार ह्या वेळेस. तसेच सगळे काम आटपुन एक तासाच्या आत घरी पोहचतच होतो तेव्हा परत त्यांचा फोने आला.
मिसळपाव