आज आमच्या शेजारांच्या घरात खूपच गडबड आणि आवाज होत होता.त्यांना दरवाजा खटखटून चौकशी करण्याचा माझा मानस नव्हता.पण काही वेळाने माझाच दरवाजा खटखटून गडकर्यांची भारती आली आणि मला म्हणाली,
"काका,एकदोन खूर्च्या कमी पडतायत,तुमच्या खुर्च्या मिळतील काय?"
मी म्हणालो,
"त्यात विचारायचं काय घे तुला हव्या तेव्हड्या. पण काय गं भारती कसली गडबड चालली आहे बर्यांच बायकांचा आवाज येतोय."
मला म्हणाली,
"आज आमच्या घरी "पॉटलक" आहे."
"म्हणजे ग काय?"
ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता हात करीत म्हणाली "मग सांगते.