दोस्तहो,
हर्षद आनंदी ह्यांनी कलादालनमध्ये टाकलेले मढेघाटातले अप्रतिम फोटो बघून आणि त्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेली माहिती आणि त्याला मिळालेले प्रतिसादातील प्रश्न वाचून मला मढेघाटाविषयी ल्याहावेसे वाटले, ते असे,
एक म्हणजे शेवत्या घाट आणि मढे घाट हे दोन्हीही घाट वेगळे आहेत.
केळदमधून को़कणात उतरायला तीन घाटवाटा आहेत.
१. उपांड्याची नाळ,
२. शेवत्या घाट आणि तिसरी
३. मढेघाट,
पैकी मढेघाटाची वाट इतर दोन्ही घाटवाटांपेक्षा जास्त बरी आहे. उर्वरीत दोन वाटा त्यामानाने जरा अवघड आहेत. पण दोन्हीही घाटातला एक ऊत्तम ट्रेक होऊ शकतो.