Skip to main content

लेख

सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 16/10/2010 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
(खुप दिवसांपासून माझे वरिष्ठ संपादक मला सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत घेण्यास सांगत होते. गेल्या पंधरवड्यात एके दिवशी तिच्या सेक्रेटरी आहूजाशी फोनाफोनी करून तिची वेळ ठरवून घेतली. गेल्या आठवड्यात गोरेगावात फिल्मीस्तानमध्ये तिच्या आगामी पिच्चर 'तेरी आंखे काली काली - The Black End' याची शुटींग चालू होती. आम्हाला तिने तेथेच बोलावले. गेटवर आमचे नाव सांगीतले. स्टूडीओत अजून इतर चार पिच्चरचे शुटींग असल्याने बर्‍यापैकी गर्दी होती. आम्हास आतमध्ये सोडण्यात आले. स्पॉटवर गेलो तर करूणा कर्पूर अन वहिद कर्पूर यांच्या 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' या गाण्याचे टेक चालू होते.

शाळेतला निबंध .......माझा आवडता पक्षी / प्राणी.

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 16/10/2010 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रमंडळी चला परत शाळॆत जाऊ. तुम्हाला आठवतात तुम्ही लिहिलेले निबंध. काय ते विषय असायचे, एका पेक्षा एक. " माझा आवडता नेता ", " मला पंख असते तर " मी तर असे विषय पाहुनच घाबरुन जायचो. पेपर मधला निबंधाचा पहिला प्रश्न हा माझ्यासाठी नसायचाच. पण तरी कधी कधी एखादा लिहायचो. तसाच तुम्ही सुद्धा लिहित असालच आता परत ते दिवस आठवून निबंध लिहु या. कदाचित तेव्हा नाही जमल ते आता जमेल. मीच सुरुवात करतो. मला नुकताच माझा शाळॆत लिहिलेला एक निबंध मिळाला. तोच इथे लिहितोय.
विषय : माझा आवडता पक्षी / प्राणी.

जाहिरातीरेक!!! (जाहिरातने व्यापून व्यापून थोड्याश्याच उरलेल्या उर्वरीत जगाची गोष्ट!)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 11/10/2010 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
(आजचे युग हे जाहिरातींचे युग आहे हे मान्य. पण जाहिरात करण्याला स्थळ, काळ, वेळ यांचे कसलेच बंधन उरले नाहीए. आजकाल जाहिराती अगदी कुठेही दिसतात. चित्रपटात, त्यातल्या गाण्यांत, वर्तमानपत्रात, बातम्यांच्या ब्रेक मध्ये, सिरियल्सच्या ब्रेकमध्ये, होर्डींग्ज वर, पुलांवर, भिंतींवर, रिक्षेवर, घरांवर, भींतींवरल्या घड्याळांमध्ये, टी शर्टांवर, लहान मुलांच्या चॅनेल्सवर, वाहनांवर, कॅलेंडरवर, मुलांच्या वह्या-पुस्तकांवर, कॅरी बॅग्जवर, बस स्टंण्ड्वर, एस. टी.

अंगठा नुसता दाखवू नका , पाहायला पण शिका .(SCIENCE OF THUMB READING) "शिवंजय": डॉक्टर प्रा.संजय होनकलसे, drsanjayhonkalse@gmail .com / http://drsanjayhonkalse.tripod.com

लेखक dr sanjay honkalse यांनी सोमवार, 11/10/2010 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंगठा नुसता दाखवू नका , पाहायला पण शिका .(SCIENCE OF THUMB READING) "शिवंजय": डॉक्टर प्रा.संजय होनकलसे, drsanjayhonkalse@gmail .com / http://drsanjayhonkalse.tripod.com सामान्यतः अंगठा नुसता दाखवण्यासाठी (thumps up / thumps down ) उपयोगात आणतात असा समज आहे. पण अंगठा विविध दृष्टीने अभ्यासाचं व व्यवहाराचं साधन आहे हे विचारांती लक्षात येते. उदा. हस्ताक्षरशास्त्र, अकयुप्रेषर , धनुर्वेद , ठसे शास्त्रं(Finger Print -Sc .) मानसशास्त्र, ज्योतीर्वेदशास्त्र व अध्यात्मशास्त्र,इ.मध्ये अंगठ्याचा अत्यंत महत्वपूर्ण उपयोग व योगदान असते.

पट्टा उर्फ विश्रामगडावर.....

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 10/10/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिकला एका खाजगी समारंभाचे बोलावणे आले व माझ्या डोक्यात बरेच दिवस मनात असलेला एक किल्ला करण्याचा प्लॅन भिरभिरू लागला. नाशिकला अर्थातच पुणे-मनमाड व्हाया नासिक रेल्वेनेच गेलो कारण २ घाटांतून दिसणारे सह्यपर्वताचे विलक्षण सौंदर्य. शनिवारी नाशिकला पोहोचलो. रविवारचा संध्याकाळचा समारोह आटोपला. तेव्हाच मामेभावाबरोबर सोमवार सकाळचा सिन्नर - घोटी दरम्यान असलेला पट्टा किल्ला पाहायाचा बेत आखून ठेवला. अर्थात इतरही गप्पागोष्टींबरोबर झालेल्या जागरणामुळे एकवेळ ट्रेक करणे रद्द करावे की काय असे वाटून गेले. पण किल्ला पाहायच्या ओढीमुळे आळसावर मात केली.

पुस्तक परिक्षण : "पार्टनर" व.पु. काळे

लेखक सागर यांनी शनिवार, 09/10/2010 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यातच वपुं चे 'पार्टनर' सुन्न मनाने वाचून काढले. भन्नाट पुस्तक आहे. मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या शालेय जीवनात वाचली होती. तेव्हाही 'पार्टनर' मस्त वाटली होती. पण त्यातील दाहकता जाणवली नव्हती. काही संदर्भ, अर्थ व भूमिका कळण्यासाठी लग्नाचा अनुभव गाठीशी (किंवा किमान तेवढी मॅच्युरिटी) असल्याशिवाय 'पार्टनर'मधील दाहकता जाणवणे शक्य नाही. पहिल्या ११ पानांतच मी 'पार्टनर' मध्ये गुरफटलो. कुठे मनसोक्त हसलो ... तर कुठे मनसोक्त रडलोही... होय खोटे कशाला सांगू? 'पार्टनर' वाचल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील रोखठोक पार्टनर चे विचार जळजळीत असले तरी प्रामाणिकपणे पटले.

अकलेचे तारे आणि जावईशोध

लेखक भाऊ पाटील यांनी मंगळवार, 05/10/2010 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
सुमार काँग्रेस्करांनी त्यांच्या आजच्या अग्रलेखात राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेवरुन (काहीच्या )काही तारे तोडलेत आणि जावईशोध लावलेत. त्याची उदाहरणे: १) राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा भरवल्याने रोजगारनिर्मितीतही आपण जी भरारी मारली आहे, ती लक्षात घ्यायला हवी. ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ने या संदर्भात दिलेली आकडेवारी पुष्कळच बोलकी आहे. देशांतर्गत उत्पादनात वाढ होऊन ते एक लाख सतरा हजार कोटी रूपयांवरून एक लाख पंचाहत्तर हजार कोटी रूपयांवर पोहोचणार आहे.